Paddy Advisory Agrowon
कृषी सल्ला

Paddy Advisory : भात सल्ला

या काळात पिकावर खोडकीड, तपकिरी तुडतुडे, पेऱ्यावरील माइट्स, पर्णकोष कुज, कटवर्म आदी किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.

टीम ॲग्रोवन

भात पिकाच्या (Rice Crop) पुनर्लागणीनंतर (Crop Sowing) ६० ते ९० दिवसांचा काळ हा पेर वाढ, लोंबी निसवण ते फूल अवस्थेचा असतो. या काळात पिकावर खोडकीड, तपकिरी तुडतुडे, पेऱ्यावरील माइट्स, पर्णकोष कुज, कटवर्म आदी किडींचा प्रादुर्भाव (Worm Damage) होण्याची शक्यता असते. तर पुनर्लावडीनंतर ९० ते १२० दिवस (पीक पक्वतेपासून काढणीपर्यंत) या कालावधीत पिकावर लोंबीतील ढेकण्या, पेऱ्यावरील करपा, रंगहीनता, पर्णकोष करपा, आभासमय काजळी इत्यादींचा प्रादुर्भाव दिसून येतो. पिकातील कीड-रोगांचा प्रादुर्भाव वेळीच ओळखून योग्य उपाययोजनांचा अवलंब करणे आवश्यक आहे.

अ) पुनर्लागवडीनंतर ६०-९० दिवस (पेर वाढ, लोंबी निसवणे ते फूल अवस्था) ः

१) खोड कीड ः

(फवारणी ः प्रतिलिटर पाणी)

- कारटॅप हायड्रोक्लोराइड (५० डब्ल्यूपी) २ ग्रॅम किंवा

क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मिलि

२) तपकिरी तुडतुडे ः

-किडीच्या नियंत्रणासाठी अधूनमधून शेतातील पाण्याचा निचरा करवा. १-२ दिवसांसाठी शेत कोरडे ठेवावे.

(फवारणी ः प्रतिलिटर पाणी)

पायमेट्रोझीन (५० टक्के डब्ल्यूजी) ०.६ ग्रॅम किंवा

डायनोटेफ्युरान(२० एसजी) ०.३ ग्रॅम

३) पेऱ्यावरील कोळी (माइट्स) ः

(फवारणी ः प्रतिलिटर पाणी)

- प्रोफेनोफॉस (५० ईसी) २ मिलि किंवा

डायकोफॉल (१८.५ ईसी) ५ मिलि किंवा

स्पायरोमेसीफेन (२४० एससी) १ मिलि

४) पर्णकोष कुज किंवा पेऱ्यांची रंगहीनता किंवा मानेवरील करपा ः

(फवारणी ः प्रतिलिटर पाणी)

प्रोपीकोनॅझोल १ मिलि

५) कटवर्म ः

(फवारणी ः प्रतिलिटर पाणी)

- क्लोरपायरिफॉस (२० ईसी) २ मिलि किंवा

फिप्रोनील (५ एससी) २ मिलि

-----------------------

पुनर्लागवडीनंतर ९० ते १२० दिवस (पीक पक्वतेपासून काढणीपर्यंत)

१) लोंबीतील ढेकण्या ः

- नियंत्रणासाठी कुजलेला खेकडा किंवा बेडकाचे आमिष तयार करून ठेवावे.

- मेलॅथीऑन (५० इसी) २.५ मिलि प्रतिलिटर पाण्यातून फवारणी

२) पेऱ्यावरील करपा ः (फवारणी ः प्रतिलिटर पाणी)

- ट्रायसायक्लॅझोल (७५ डब्ल्यूपी) ०.६ ग्रॅम किंवा

- आयसोप्रोथीओलीन १ मिलि

३) पेऱ्याची रंगहीनता ः

- प्रोपीकोनॅझोल १ मिलि

प्रतिलिटर पाण्यातून सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करावी.

- पीक फुलोऱ्यात असताना फवारणी करणे टाळावे.

४) पर्णकोष करपा ः (फवारणी ः प्रतिलिटर पाणी)

हेक्साकोनॅझोल (५ ईसी) २ मिलि

५) आभासमय काजळी ः

पीक पोटरीत असताना, (फवारणी ः प्रतिलिटर पाणी)

- क्लोरोथॅलोनिल (७५ डब्ल्यूपी) २ मिलि किंवा

- प्रोपीकोनॅझोल १ मिलि किंवा

- टेब्युकोनॅझोल ०.४ ग्रॅम

- डॉ. किरण रघुवंशी, ९४०५००८८०१

(कृषी संशोधन केंद्र, लोणावळा, जि. पुणे)

- डॉ. नरेंद्र काशीद, ९४२२८५१५०५

(भात संशोधन केंद्र, वडगाव मावळ, जि. पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture University : कृषी विद्यापीठे सेवाप्रवेश मंडळ वाऱ्यावर

Kharif Sowing : खेड तालुक्यात खरिपाच्या ६७ टक्के पेरण्या

Rain Alert Maharashtra : विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता

Farmer Felicitation : ‘सीसीआरआय’च्या वर्धापन दिनी प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT