Millpede Control Agrowon
कृषी सल्ला

पैसा किडीचे नियंत्रण कसे कराल ?

पैसा किंवा वाणी या किडीच्या नियंत्रणासाठी प्रभावी दिर्घ मुदतीचे उपाय योजावेत.

Team Agrowon

सध्या सोयाबीन(Soybean), कापूस (Cotton) , तूर, मूग, उडीद पिकावर मिलीपेड्स (Millipede) म्हणजेच पैसा किंवा वाणी या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. नियंत्रणासाठी प्रभावी दिर्घ मुदतीचे उपाय योजावेत आणि लक्षणे ओळखून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने सुचविलेल्या पुढील उपाययोजनांचा अवलंब करावा.

नुकसान

मिलीपेड्स हे निशाचर असुन सामान्यतः सडणारी पाने, कुजलेले लाकूड आणि इतर प्रकारच्या ओलसर, किडणा-या वनस्पती खातात. साधारणपणे त्यांची भुमिका कुजलेल्या झाडाचे विघटन करण्यास मदत करणारी आहे. परंतु जेव्हा ते असंख्य होतात तेव्हा ते जमिनीवर संपर्कात येणा-या रोपटे, बियाणे जसे कापूस, सोयाबिन या सारख्या पिकाचे नुकसान करतात. जमिनीलगत रोपे कापून टाकतात कालांतराने रोपावर जाउन पाने कुरतडतात.

व्यवस्थापन कसे करावे ?

मिलीपेडचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रभावी दिर्घ मुदतीचा उपाय म्हणजे शेतातील आर्द्रता आणि लपण्याची ठिकाणे कमी करुन बांधावरिल गवत, दगड, जमिनीवर ठेवलेल्या वस्तू काढाव्यात. ब-याचदा आर्द्र, घनदाट पिकात जास्त पाणी दिल्यामुळे किंवा संध्याकाळी पिकात पाणी चालू ठेवल्यास मिलीपेड्सचा प्रादुर्भाव वाढतो. शेतातील पालापाचोळा किंवा वाळलेले कुजलेले पदार्थ गोळा करुन नष्ट करावेत. पैसा रात्री जास्त सक्रीय असल्याने रात्रीच्या वेळी शेतात गवताचे ढिग करुन ठेवावेत आणि सकाळी गवताच्या ढिगाखाली जमा झालेले मिलीपेड्स जमा करून मिठाच्या किंवा साबणाच्या द्रावणात टाकावेत. जास्त आर्द्रता व अन्नाचा पुरवठा नसल्यास काही दिवसातच मिलीपेड्स मरतात. ज्याठिकाणी शेतक-यांनी पेरणीपुर्वी बियाण्याला बिजप्रक्रीया केली आहे तेथे प्रादुर्भाव कमी आढळून आलेला आहे. पिकामध्ये वेळेवर कोळपणी करावी त्यामुळे जमिनीतील अंडी व लपून बसलेल्या पैसा किडी उघडया पडून नष्ट होतील. चांगला पाऊस पडल्यास या किडींचे नैसर्गीक नियंत्रण होते.

रासायनिक नियंत्रण

किड संपूर्ण शेतात पसरलेली असल्यास क्लोरपायरीफॉस (२० ईसी) ३ मिली किंवा क्लोरपायरीफॉस ५० टक्के + सायपरमेथ्रीन (५ टक्के एसपी) १.५ मिली प्रति लीटर या प्रमाणे फवारणी करावी. सद‍र कीडनाशकाची शिफारस मिलीपेड साठी नाही, मात्र कापूस पिकामध्ये आहे.

कार्बोसल्फान (६ टक्के दानेदार) किंवा क्लोरपायरीफॉस (१० टक्के दानेदार) किंवा फिप्रोनिल (०.३ टक्के) ५ किलो प्रति १०० किलो शेणखतात मिसळून ओळीने शेतातील रोपा जवळ वापरावे. सदरील कीटकनाशके परिणामकारक आहेत परंतु लेबल क्लेम नाहीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wildlife Protection: वाहनांसह बचाव साहित्य वन विभागाकडे सुपूर्द

Kharif Season Planning: खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी शासन कटिबद्ध : शंभूराज देसाई

HTBT Seeds Illegal Sale: एचटीबीटी कपाशी बियाणे विक्री विरोधात कारवाई करा

Paddy Procurement Process: धान खरेदी प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी

Fertilizer Linking: खताबरोबर अन्य सह-उत्पादनांची सक्ती केल्यास कारवाई

SCROLL FOR NEXT