PM Fasal Bima Yojana: राज्यात यंदाही (२०२६-२७) पंतप्रधान पीकविमा योजना मागील वर्षीप्रमाणे म्हणजे पीक कापणी प्रयोगावर आधारितच राबविण्यात येणार आहे. त्यानुसार यंदाच्या खरीप आणि रब्बी हंगामासाठी कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्या असून २२ जून रोजी निविदा उघडल्या जाणार आहेत. .या योजनेत १२ विभाग आणि ३४ जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये अधिसूचित पिके घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. ही योजना ‘कप आणि कॅप मॉडेल’ म्हणजे ८०:११० या नियमानुसार राबविण्यात येणार आहे. या मॉडेलनुसार विमा कंपन्यांचा नफा आणि जोखीम मर्यादित राहणार आहे. तसेच राज्य शासनावरील अतिरिक्त आर्थिक भारही कमी होणार आहे..Akola Crop Insurance: अकोला पीकविमा प्रकरणाचा तपासणी अहवाल सादर करा : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे.मागील हंगामाप्रमाणे खरिपात अन्नधान्य व गळितधान्य पिकांसाठी शेतकऱ्यांना २ टक्के तर रब्बी हंगामातील पिकांसाठी १.५ टक्के हप्ता भरावा लागणार आहे. कापूस आणि कांदा या नगदी पिकांसाठी ५ टक्के विमा हप्ता भरावा लागेल. उर्वरित विमा हप्ता केंद्र आणि राज्य सरकारकडून समप्रमाणात भरला जाईल. निविदेमध्ये तक्रार निवारण आणि पारदर्शकतेसाठी तसेच शेतकऱ्यांच्या सोयीसाठी प्रत्येक जिल्हा आणि तालुका पातळीवर विमा कंपन्यांना पीकविमा सुविधा केंद्र सुरू करणे बंधनकारक करण्यात आले आहे..Crop Insurance Compensation: विमा कंपन्यांचे अहवाल नेहमीच शेतकरीविरोधी का?.मागील वर्षी १९ विमा कंपन्या निश्चित करण्यात आल्या होत्या. खरीप हंगामात ९३ लाख ८१ हजार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला होता. २४०७ कोटी ९२ लाखांचा एकूण विमा हप्ता भरण्यात आला होता. त्यापैकी १४६१ कोटी ६२ लाख रुपयांची भरपाई निश्चित करण्यात आली होती. त्यापैकी मेअखेर ९७६ कोटी ९४ लाख रुपये वितरित केले आहेत. तर ४८४ कोटी ६८ लाख रुपये अद्याप भरपाई वितरित झालेली नाही. .रब्बी हंगामात १४ लाख ८३ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. १० लाख ३७ हजार विमा संरक्षित क्षेत्राची ४२९१ कोटी विमा संरक्षित रक्कम होती. यापोटी ४६ कोटी ६१ लाख रुपये विमा हप्ता भरण्यात आला आहे. मात्र, विमा भरपाई आणि वितरित रकमेचा तपशील कृषी विभागाकडे नाही..अधिसूचित पिकेखरीप, रब्बीसाठी : सोयाबीन, कापूस, भात, नाचणी, गहू, ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, तीळ, कारळे, कांदा, उडीद, भुईमूग.रब्बी हंगामासाठी : हरभरा, उन्हाळी भात, भुईमूग, रब्बी ज्वारी, रब्बी कांदा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.