Maharashtra Weather: राज्यात अद्यापही मॉन्सूनची प्रतीक्षा असतानाच, विदर्भासह कोकण, मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे. आज (ता. १२) कोकणात उष्ण व दमट हवामान, मध्य महाराष्ट्रात उष्ण लाटेची शक्यता आहे. तर विदर्भासह उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे..गुरुवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पंजाबमधील भतिंडा येथे देशातील उच्चांकी ४६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हंगामी कमी दाबाचा पट्टा पंजाब ते बांगलादेशपर्यंत विस्तारला आहे. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्याची स्थिती असून, पूर्व-मध्य अरबी समुद्रापासून कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, तेलंगणा पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे..Maharashtra Heatwave Update: ब्रह्मपुरी जगातील दुसरे सर्वाधिक उष्ण शहर.गुरुवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४५.५ अंश तापमानाची नोंद झाली. वर्धा, नागपूर आणि गोंदिया येथे ४३ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ येथे ४२ अंशांपेक्षा अधिक, तर धुळे, जळगाव, मालेगाव आणि वाशीम येथे ४१ अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १८.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. आज (ता. १२) कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड येथे उष्ण व दमट हवामानाची तर नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यांत उष्ण लाटेची शक्यता आहे. तसेच विदर्भासह उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे..Maharashtra Heatwave Update: उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता.मॉन्सूनची वाटचाल सुरूचनैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरुवारी (ता. ११) संपूर्ण तमिळनाडूसह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. तर पूर्व भारतातील पश्चिम बंगालसह बिहारच्या काही भागात प्रगती केली आहे. महाराष्ट्रातील मॉन्सूनची वाटचाल ‘जैसे थे’ आहे. पुढील तीन ते चार दिवसांत मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्राच्या काही भागांसह, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा उर्वरित भाग, पश्चिम बंगाल, बिहारचा आणखी काही भाग, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..उष्ण व दमट हवामान, उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, चंद्रपूर.वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.