Crop Advice
Crop Advice Agrowon
कृषी सल्ला

Crop Advice : द्राक्ष, भाजीपाला, कांदा, वांगी पिकांचा पीक सल्ला

Team Agrowon

फळ पिके

दरवर्षी द्राक्षाच्या काढणीच्या हंगामामध्ये (Grape Harvesting Season) अवकाळी पाऊस व गारपीट होत असल्यामुळे फळांच्या संरक्षणासाठी हेलनेटचा विचार करावा. हेलनेटमुळे गारांच्या माऱ्यापासून फळांचा बचाव होऊ शकतो.

फळ बागांचे सोसाट्याच्या वाऱ्यापासून संरक्षण करण्याकरिता बांबू किंवा लाकडी काठ्याचा आधार द्यावा. प्लॅस्टिक दोरीच्या साह्याने झाडे एकमेकांना बांधून घ्यावीत.

काढणी केलेली पिके

पावसाची शक्यता असल्याने काढणी/ कापणी केलेली पिके शेडमध्ये ठेवावीत किंवा प्लॅस्टिकच्या कागदाने झाकून ठेवावीत.

भाजीपाला पिके

पुढील चार दिवसांमध्ये पावसाची शक्यता असल्याने तोडणीला आलेल्या भाजीपाला पिकांची त्वरीत तोडणी करून घ्यावी.

साठविलेले धान्य

साठविलेल्या धान्यात लिंबाचा पाला १ ते २ टक्के मिसळावा. साठविलेल्या धान्यातील किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने त्यात असलेल्या ओलाव्याच्या प्रमाणावर अवलंबून असतो. साठवणीसाठी धान्यातील ओलावा १० टक्क्यांपेक्षा कमी राहील याची काळजी घ्यावी.

साठवण करावयाच्या कडधान्यांचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी ३ ते ५ मि.लि. एरंडेल/ जवस/ करंज/ कडुनिंबाचे तेल प्रति किलो धान्य या प्रमाणात वापरावे.

कांदा काढणी

पावसाची शक्यता असल्याने परिपक्व झालेल्या कांदा त्वरित काढणी करून घ्यावा. कापणी केलेली पिके शेडमध्ये ठेवावीत किंवा प्लॅस्टिकच्या कागदाने झाकून ठेवावीत.

वांगी

रस शोषक किडींच्या नियंत्रण करण्यासाठी शेतात पिवळे चिकट सापळे लावावेत. तसेच शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी एकरी १६ कामगंध सापळे लावावेत. त्यातील ल्युअर ४० दिवसांनी बदलावेत.

शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव असल्यास, नियंत्रणासाठी स्वच्छ हवामानात फवारणी प्रति लिटर पाणी क्लोरपायरिफॉस (२० ईसी) २ मि.लि. किंवा इमामेक्टिन बेंझोएट (५ एसजी) ०.३ ग्रॅम किंवा क्लोरॲन्ट्रानिलिप्रोल (१८.५ एससी) ०.३ मि.लि. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (५ ईसी) १ मि.लि.

पांढरी माशी नियंत्रणासाठी, स्वच्छ हवामानात फवारणी प्रति लिटर पाणी, डायफेन्थुरॉन (५० डब्ल्यूपी) १ ग्रॅम किंवा एफिडोपायरोपेन (५० डब्ल्यूपी) १ ग्रॅम.

लाल कोळी या किडीच्या प्रादुर्भावामुळे खराब झालेली पाने गोळा करून नष्ट करावीत. स्वच्छ हवामानात फवारणी प्रति लिटर पाणी, प्रोपार्गाइट (५७ ईसी) २ मि.लि. किंवा फेनाक्झाक्विन (१० ईसी) १.७ मि.लि. किंवा स्पायरोमेसिफेन (२२.९ एससी) ०.८ मि.लि.

भेंडी

विषाणू संक्रमित वनस्पती उपटून जाळून टाकावीत. पिवळ्या शिरा मोझॅक विषाणूच्या वाहक असलेल्या पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्यासाठी कडुनिंब आधारित कीटकनाशक (ॲझाडिरेक्टीन १० हजार पीपीएम) ४ मि.लि. प्रति लिटर पाणी याची फवारणी करावी.

सध्याच्या हवामानात, भेंडी पिकावर तुडतुडे सारख्या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असते.

तुडतुड्यांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी फवारणी प्रति लिटर पाणी, निंबोळी आधारित कीटकनाशके (५ ईसी) १ मि.लि. किंवा (०.०३ ईसी) ६ मि.लि. किंवा लेकॅनिसिलिअम लेकॅनी ४ ग्रॅम.

टीप : या फवारण्या संध्याकाळच्या वेळी १० दिवसांच्या अंतराने कराव्यात. तुडतुड्यांच्या प्रादुर्भाव पीकवाढीच्या अवस्थेत जास्त असल्यास, थायामेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) ४ ग्रॅम.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT