कांद्यावरील फुलकिडीचे व्यवस्थापन
कांद्यावरील फुलकिडीचे व्यवस्थापन 
कृषी सल्ला

कांद्यावरील फुलकिडीचे व्यवस्थापन

डॉ. पी. आर. झंवर, योगेश मात्रे, विलास खराडे

कांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात घेतले जाते. या पिकाच्या उत्तम वाढीसाठी १० ते २५ अंश सेल्सिअस तापमान आणि ७० ते ८० टक्के आर्द्रता पोषक असते. मात्र, दमट आणि ढगाळ हवामानामध्ये पिकावर प्रामुख्याने फुलकिडे, खोड कुरतडणारी अळी, वाळवी आणि हुमणी या किडींचा प्रादुर्भाव आढळतो. सध्या फुलकिड्याचा (थ्रिप्स) चा प्रादुर्भाव राज्यातील बहुतांश भागात आढळून येत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. प्रामुख्याने रब्बी हंगामात फुलकिडे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. कोरडी हवा आणि पंचवीस ते तीस अंश सेल्सिअस तापमानात ही कीड झपाट्याने वाढते.

  • आकाराने अत्यंत लहान. पूर्ण वाढ झालेल्या फुलकिडीचा आकार सुमारे १ मिलिमीटर पर्यंत असतो.
  •  रंग पिवळसर तपकिरी असून, शरीरावर फुलीच्या आकाराचे गर्द चट्टे असतात.
  •  मादी पानावर पांढऱ्या रंगाची ५० ते ६० अंडी घालते. त्यामधून चार ते सात दिवसांत पिले बाहेर पडतात. पिल्लांचा जगण्याचा कालावधी साधारणपणे सहा ते सात दिवसांचा असतो. डिसेंबर महिन्यात २३ दिवसांपर्यंत असू शकतो.
  •  पिले आणि प्रौढ रात्रीच्या वेळी पाने खरडून पानातून येणारा रस शोषतात. परिणामी पानांवर पांढरे ठिपके दिसतात, त्यालाच शेतकरी 'टाक्या' म्हणून ओळखतात. नंतर पाने वाकडी होऊन वाळतात.
  •  पिकाच्या सर्वच अवस्थेत किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. रोपावस्थेत फुलकिडीचा तीव्र प्रादुर्भाव झाल्यास पाने वाळून कांदे पोसत नाहीत. पानावर झालेल्या जखमांमधून काळा करपा, जांभळा करपा अशा बुरशीचा पानात सहज शिरकाव होतो
  •  कोरडी हवा आणि २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमानात फुलकिडे वेगाने वाढतात.
  • रब्बी हंगामात कांदा पिकावर प्रादुर्भावाचे प्रमाण अधिक राहून, पिकाचे ३० ते ४० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते.
  • नियंत्रण उपाययोजना

  •  कांदा पिकाची तृणधान्य किंवा गळीत पिकासोबत फेरपालट करावी.
  •  लागवडीपूर्वी पंधरा दिवस अगोदर शेताच्या कडेने मक्याच्या दोन ओळी लावाव्यात, त्यामुळे फूलकिडीचा उपद्रव कमी होतो.
  •  लागवड करतेवेळी रोपांची मुळे कार्बोसल्फान २ मि.लि. प्रतिलिटर पाणी या द्रावणात २ तास बुडवून लागवड करावी.
  •  सुरवातीच्या काळात पाच टक्के निंबोळी अर्क किंवा कडुनिंब आधारित कीटकनाशक अॅझाडिरेक्टिन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रतिलिटर या प्रमाणात फवारणी करावी.
  •  लागवडीनंतर ३० दिवसांनी ६५ ते ७० टक्के आर्द्रता असताना, व्हर्टिसिलियम लेकॅनी ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणे ८ ते १० दिवसांच्या अंतराने एक ते दोन फवारण्या कराव्यात.
  • तीव्र प्रादुर्भाव असल्यास रासायनिक नियंत्रण (फवारणी प्रतिलिटर पाणी) फिप्रोनिल (५ एस. सी.) २ मि.लि. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ ई.सी.) १ मि.लि. टीप : फवारणी करतेवेळी प्रतिलिटर द्रावणामध्ये १ मि.लि. उत्तम दर्जाच्या चिकट द्रव्य मिसळावे. डॉ. पी. आर. झंवर (सहयोगी प्राध्यापक), ७५८८१५१२४४ योगेश मात्रे (आचार्य पदवी विद्यार्थी), ७३८७५२१९५७ (कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

    Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

    Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

    Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

    Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

    SCROLL FOR NEXT