weekly weather by dr. ramchandra sabale
weekly weather by dr. ramchandra sabale 
कृषी सल्ला

सकाळी सौम्य थंडी; दुपारी उष्ण हवामान

डॉ. रामचंद्र साबळे

महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब आठवडाभर राहण्याची शक्‍यता आहे. कमाल व किमान तापमानात वाढ होते, त्या वेळी हवेचे दाब कमी होतात. हवा विरळ होते. साधारणपणे मकर संक्रांतीनंतर कमाल व किमान तापमानात वाढ होण्यास सुरुवात होते. मागील २ ते ३ वर्षांच्या तुलनेत या वर्षी थंडीची तीव्रता व प्रमाण कमी आहे. भारतावर मार्चपर्यंत मध्यम स्वरूपाचा ला निना हवामानविषयक परिणाम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ढगाळ हवामान, अवकाळी पावसाची शक्यता निर्माण होत आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावापेक्षा हाच प्रभाव अधिक आहे. या प्रभावामुळे वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहून ढगाळ वातावरण राहत आहे. कोकण  कोकणातील सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. दुपारी उष्ण हवामान जाणवेल. सकाळचे किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४८ ते ५४ टक्के, तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ६७ ते ८० टक्के इतकी राहील. ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३२ टक्के राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३७ ते ४१ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ किमी इतका कमी राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. उत्तर महाराष्ट्र  नाशिक, धुळे, नंदूरबार जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसपर्यंत, तर जळगाव जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. किमान तापमान नाशिक व धुळे जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस, तर नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. सकाळच्या थंडीची तीव्रता कमी होऊन दुपारी उष्ण हवामान जाणवेल. आकाश निरभ्र राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४० ते ४५ टक्के, तर दुपारची २४ ते २७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ किमी राहील. नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. मराठवाडा  नांदेड, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. त्यामुळे दुपारी उष्ण हवामान जाणवेल. उस्मानाबाद, लातूर व जालना जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस, तर औरंगाबाद जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, लातूर व बीड जिल्ह्यांत किमान तापमान २० अंश सेल्सिअस, तर नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस, औरंगाबाद जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ४६ ते ४९ टक्के, तर उस्मानाबाद, लातूर, नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यांत ५१ ते ५७ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २४ ते २९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १० किमी आणि दिशा प्रामुख्याने आग्नेयेकडून राहील. जालना जिल्ह्यात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून व औरंगाबाद जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून राहील. पश्‍चिम विदर्भ  कमाल तापमान अमरावती जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, तर वाशीम, अकोला व बुलडाणा जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४१ ते ४६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २६ ते २८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ किमी राहील. वाशीम जिल्ह्यात वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून, तर उर्वरित बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. मध्य विदर्भ  यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान यवतमाळ जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २४ ते २६ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ किमी आणि दिशा ईशान्येकडून राहील. पूर्व विदर्भ  भंडारा जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. कमाल तापमान गडचिरोली जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस, तर भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस, गडचिरोली जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४६ ते ५७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १९ ते २४ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किमी राहील. वाऱ्याची दिशा भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ईशान्येकडून तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत आग्नेयेकडून राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र कमाल तापमान कोल्हापूर जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, सांगली, पुणे, सातारा जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर नगर व सोलापूर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नगर, पुणे व सातारा जिल्ह्यांत २१ ते २२ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४८ ते ५२ टक्के, तर सांगली व सातारा जिल्ह्यांत ६१ ते ६२ टक्के, कोल्हापूर जिल्ह्यांत ८१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २८ ते ३६ टक्के इतकी कमी राहील. हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ९ किमी आणि दिशा आग्नेयेकडून राहील. कृषी सल्ला 

  • सुरू उसाची लागवड करताना ॲसेटोबॅक्‍टर १० किलो + स्फुरद विरघळवणारे जिवाणू १.५ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. तयार द्रावणात टिपरी १० मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी.
  • कलिंगड लागवडीसाठी शुगर बेबी, अर्का माणिक, अर्का ज्योती या जातींची निवड करावी. लागवड सपाट वाफ्यात २ बाय ०.५ मीटर अंतरावर करावी. लागवडीसाठी हेक्‍टरी २.५ ते ३ किलो बियाणे लागते.
  • हरभरा पिकावरील घाटे अळीच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात.
  • - (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व सदस्य, अॅग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

    Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

    Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

    Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

    Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

    SCROLL FOR NEXT