Infestation of stem fly on soybean 
कृषी सल्ला

सोयाबीनवर खोड माशीचा प्रादुर्भाव

सोयाबीन उगवणीपासून ७ ते १० दिवसांपर्यंत खोड माशीचा प्रादुर्भाव दिसून येतो. पानाच्या शिरांद्वारे अळी खोडांमध्ये प्रवेश करून गाभा पोखरून खाते. दुर्भावग्रस्त रोपे पिवळी पडून सुकतात. प्रादुर्भाव लक्षात घेऊन नियंत्रणाचे उपाय करावेत.

डॉ. एस. बी. महाजन, डॉ. डी. के. कठमाळे

सोयाबीन उगवणीपासून ७ ते १० दिवसांपर्यंत खोड माशीचा प्रादुर्भाव दिसून येतो. पानाच्या शिरांद्वारे अळी खोडांमध्ये प्रवेश करून गाभा पोखरून खाते. प्रादुर्भावग्रस्त रोपे पिवळी पडून सुकतात. प्रादुर्भाव लक्षात घेऊन नियंत्रणाचे उपाय करावेत. सध्या काही भागात सोयाबीन पीक रोपावस्थेत आहे. या अवस्थेत खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. प्रादुर्भाव झाल्यास रोपांच्या संख्येवर विपरीत परिणाम होऊन पुन्हा पेरणी करावी लागते. सध्याच्या काळात पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये. पाण्याचा ताण पडल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव वाढतो. ओळख 

  • प्रौढ माशी घरमाशी सारखी परंतु, आकाराने फक्त २ मि. मी. व चमकदार काळ्या रंगाची असते.
  • प्रौढ मादी माशी झाडाच्या देठावर व पानावर फिक्कट पिवळसर अंडी घालते. अंड्यातून २ ते ७ दिवसांत पांढऱ्या रंगाची पाय नसलेली अळी बाहेर पडून पानाच्या देठातून झाडाच्या मुख्य खोडात किंवा फांदीत छिद्र करून आतील भाग पोखरून खाते.
  • पूर्ण विकसित अवस्थेत अळी हलक्या पिवळ्या रंगाची व साधारणतः ३ ते ४ मि. मी. लांबीची असते.
  • प्रादुर्भावाची लक्षणे

  • उगवणीपासून ७ ते १० दिवसांपर्यंत किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो.
  • पानाच्या शिरांद्वारे ही अळी खोडांमध्ये प्रवेश करून गाभा पोखरून खाते. प्रादुर्भावग्रस्त रोपे पिवळी पडून सुकतात.
  • खोडापासून शेंड्यापर्यंत झाड पोखरल्यामुळे अन्नद्रव्यांचा पुरवठा कमी होऊन पाने पिवळी पडून पानांवर लालसर काळे ठिपके दिसतात. पानाचा अर्धा भाग सुकून वरच्या बाजूस मुडपला जातो. झाडे वाळून मरून जातात.
  • पिकाच्या नंतरच्या अवस्थेमध्ये प्रादुर्भाव झाल्यास रोपे सुकत नाहीत. परंतु, खोड पोखरल्यामुळे शेंगांची संख्या आणि बियांचे वजन कमी होते. तसेच काही शेंगांमध्ये दाणे भरत नाहीत.
  • जीवनचक्र 

  • किडीच्या अंडी, अळी, कोष व माशी अशा चार अवस्था दिसून येतात. त्यापैकी अळी अवस्था हे प्रत्यक्ष पिकाचे नुकसान करते. माशी अंडी घालते.
  • साधारणतः १० ते १२ दिवस किडीची अळी अवस्था असते. अळी खोडाला छिद्र बनविते; खोडाचा आतील भाग खाऊन आपली उपजीविका करते. त्यानंतर खोडातच कोषामध्ये रूपांतरित होते. थोड्या दिवसांनंतर कोषामधून प्रौढ माशी बनते. खोडावरील छिद्रातून बाहेर पडून पुन्हा आपले जीवनचक्र सुरू करते.
  • खोड माशी पिकावर ४ ते ५ पिढ्या पूर्ण करते.
  • आर्थिक नुकसान पातळी  १० ते १५ टक्के प्रादुर्भावग्रस्त रोपे शेतात दिसू लागली की, या किडीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असे समजावे. नियंत्रण

  • भारी जमिनीत पेरणीचे आंतर ४५ बाय ५ सें.मी. आणि मध्यम जमिनीत ३० सें.मी. बाय १० सें. मी. ठेवावे. जेणेकरून पिकात जास्त दाटी होणार नाही.
  • बीजप्रक्रिया-  प्रति किलो बियाणास थायामेथोक्झाम (३० टक्के एफ एस) १० मिली
  • कीटकनाशकांचा वापर (ॲग्रेस्को शिफारसी) फवारणी - प्रति १० लिटर पाणी 

  • क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ एस सी) २.५ मि.ली. किंवा
  • इथिऑन (५० ई सी) ३० मि.ली. किंवा
  • इंडोक्झाकार्ब (१५.८ ई सी) ६.६६ मि.ली. किंवा
  • लँबडा सायहॅलोथ्रीन (४.९ सी एस) ६ मि.ली. किंवा
  • थायामिथोक्झाम (१२.६० टक्के) + लँबडा सायहॅलोथ्रीन (९.५० झेड सी) (संयुक्त कीटकनाशक) २.५ मि.ली.
  • ( टीप  - फवारणीचे प्रमाण नॅपसॅक पंपासाठी आहे) संपर्क - डॉ. एस. बी. महाजन, ९४२११२८३३३ (कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

    Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

    Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

    Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

    Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

    SCROLL FOR NEXT