आठवड्याचे हवामान 
कृषी सल्ला

आठवड्याचा अंदाज : ढगाळ हवामानासह पावसाची शक्‍यता

महाराष्ट्रावर हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतके राहतील. पूर्व किनारपट्टी लगतच्या भागावर १००८ हेप्टापास्कल इतके कमी राहतील. त्यामुळे वारे मोठ्या प्रमाणावर पूर्व किनारपट्टी भागावर ढग वाहून आणतील. त्यातूनच मराठवाडा, विदर्भ, दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्राचे दक्षिणेकडील व उत्तरेकडील जिल्ह्यात व दक्षिण कोकणातील जिल्ह्यात पावसाची शक्‍यता आहे. पाऊस होण्यापूर्वी ढगांचा गडगडाट व विजांचे कडकडानंतर पाऊस सुरु होईल.

डाॅ. रामचंद्र साबळे

महाराष्ट्रावर हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतके राहतील. पूर्व किनारपट्टी लगतच्या भागावर १००८ हेप्टापास्कल इतके कमी राहतील. त्यामुळे वारे मोठ्या प्रमाणावर पूर्व किनारपट्टी भागावर ढग वाहून आणतील. त्यातूनच मराठवाडा, विदर्भ, दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्राचे दक्षिणेकडील व उत्तरेकडील जिल्ह्यात व दक्षिण कोकणातील जिल्ह्यात पावसाची शक्‍यता आहे. पाऊस होण्यापूर्वी ढगांचा गडगडाट व विजांचे कडकडानंतर पाऊस सुरु होईल. एप्रिल महिन्यातील पाऊस हा थोड्याशा कालावधीत होतो. विदर्भातील अकोला व अमरावती जिल्ह्यात, मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी व जालना जिल्ह्यात, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात तर पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे व नगर जिल्ह्यासह कोकणात सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची शक्‍यता आहे. काही काळ ढगाळ हवामान तसेच सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० टक्केचे जवळपास तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ ते ३० टक्के इतकी कमी म्हणजे कोरडे हवामान राहील. वाऱ्याची दिशा कधी वायव्येकडून, काही भागात ईशान्येकडून प्रामुख्याने राहील. सध्याचे काळात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्रावर राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किलोमीटर राहील. मात्र याच काळात कमाल तापमानात वाढ होऊन ते ३८ ते ४० अंश सेल्सिअस राहण्यामुळे दुपारी उष्ण हवामान राहील.  कोकण सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील. ठाणे जिल्ह्यात ते ४० अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. तर रायगड व ठाणे जिल्ह्यात ते २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. रायगड व ठाणे जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६८ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३७ टक्के व उर्वरित सर्वच जिल्ह्यात ती २२ ते २७ टक्के राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक ५ व ६ एप्रिल रोजी २० ते ३२ मि.मि. व रत्नागिरी जिल्ह्यात ३ ते ६ मि.मी. राहील.  उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात दिनांक ५ एप्रिल रोजी पावसाचा जोर राहील व ४ ते ११ मि.मी. पावसाची शक्‍यता राहील. जळगाव जिल्ह्यात दिनांक ६ एप्रिल रोजी ४ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील. धुळे व नंदुरबार जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस व नाशिक जिल्ह्यात ते ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. जळगाव जिल्ह्यात ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५६ ते ६१ टक्के तर दुपारची २४ ते ३१ टक्के राहील.  मराठवाडा  हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. पावसाची शक्‍यता या जिल्ह्यात कमी राहील. सर्वच जिल्ह्यात किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६४ ते ६९ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २८ ते ३७ टक्के राहील.  पश्‍चिम विदर्भ  बुलढाणा व वाशिम जिल्ह्यात पावसाची शक्‍यता कमी आहे. अकोला व अमरावती जिल्ह्यात ३ ते ६ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. अमरावती, अकोला व बुलढाणा जिल्ह्यात कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस राहील. तर वाशिम जिल्ह्यात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अकोला व अमरावती जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस तर बुलढाणा व वाशिम जिल्ह्यात किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६१ ते ६७ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३६ टक्के राहील.  मध्य विदर्भ  यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यात पावसाची शक्‍यता कमी राहील. यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस राहील. तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ६५ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २३ ते २९ टक्के राहील.  पूर्व विदर्भ  पूर्व विदर्भात या आठवड्यात पावसाची शक्‍यता कमी आहे. पूर्व विदर्भात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. गोंदिया व भंडारा जिल्ह्यात कमाल तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ ते ३० टक्के राहील.  दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र  कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, नगर या सर्वच जिल्ह्यात पावसाची शक्‍यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दिनांक ५ ते ७ एप्रिल या कालावधीत प्रतिदिनी २८ ते ३४ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. सांगली जिल्ह्यात १६ ते ३४ मि.मी., सातारा जिल्ह्यात १६ ते २२ मि.मी., सोलापूर जिल्ह्यात १५ ते २२ मि.मी., पुणे जिल्ह्यात ३ ते १२ मि.मी. व नगर जिल्ह्यात ६ ते १२ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात कमाल तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअस, सांगली व सोलापूर जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस तर पुणे व नगर जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान पुणे व नगर जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, सांगली व सातारा जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस तर सोलापूर जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस व कोल्हापूर जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५९ ते ६७ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २७ ते ३६ टक्के राहील. 

कृषी सल्ला

  • नवीन लागवड केलेल्या कलमांना काठीचा आधार द्यावा. 
  • नवीन लागवड केलेल्या नारळांच्या रोपांना किलतानाच्या मंडपाची सावली करावी. 
  • सुरु आणि खोडवा उसात खुरपणी करुन तण नियंत्रण करावे. 
  • जनावरांसाठी पुरेसा हिरवा चारा उपलब्ध व्हावा, यासाठी मक्याच्या आफ्रिकन टॉल जातीची लागवड करावी.
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, संशोधन परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व सदस्य, प्रवृत्त पर्जन्य कृती दल सुकाणू समिती)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Election Commission: 'तृणमूल काँग्रेस'चं नाव, चिन्ह गोठवलं; ममतांच्या पक्षाला ‘फुटबॉलपटू’ चिन्ह; निवडणूक आयोगाचा निर्णय

    Ahilyanagar District Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी ३,८३६ मतदार

    Farmers Protest : पीक पंचनामा मुद्द्यावर सटाण्यात तहसीलदारांना घेराव

    Mohapada Encroachment : मोहपाडा अतिक्रमणप्रश्नी उपग्रह प्रतिमांचा आधार

    Dried Sugarcane Crops : करपलेल्या उसात जनावरे सोडण्याची वेळ

    SCROLL FOR NEXT