The use of fertile soil and biofertilizers for strengthening the growth of the crop. 
 नत्र, स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी सक्रिय आणि उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंचा वापर फायदेशीर ठरतो. ही जैविक खते पिकाला आवश्यक असलेली अन्नद्रव्ये मिळवून देण्यासाठी मदत करतात. पर्यायाने जमिनीत उपलब्ध असलेल्या अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर होतो.       जमिनीची सुपीकता केवळ त्यात असलेली अन्नद्रव्ये आणि रासायनिक घटकांवरच अवलंबून नसून त्या जमिनीत कोणत्या प्रकारचे आणि किती सूक्ष्म जिवाणू आहेत यावर अवलंबून आहे. पिकांच्या मुळाभोवती सूक्ष्म जिवाणू मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. कारण पिकांची मुळे सेंद्रिय आम्ल, साखर, जीवनसत्त्वे आणि वाढवर्धक पदार्थ जमिनीत सोडतात, या पदार्थावर हे जिवाणू वाढतात.        सूक्ष्म जिवाणूंचे फायदे 
   स्फुरद विरघळविणारे जिवाणू 
 सेंद्रिय घटक कुजविणारे जिवाणू  
 द्रवरूप जिवाणू खते     उपयुक्त अशा जिवंत किंवा सुप्त अवस्थेतील जिवाणूंचे निर्जंतुक द्रवरूप वाहकामध्ये केलेले मिश्रण होय. या द्रवरूप वाहकामध्ये उपयुक्त असे उच्च प्रतीचे जास्त संख्येने जिवाणू आणि त्यांना लागणारी अन्नद्रव्ये असतात.        वैशिष्ट्ये  
 संपर्क ः डॉ. पपिता गौरखेडे, ८००७७४५६६६, (सहायक प्राध्यापक, मृद् विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)