wheat variety- samadhan (NIAW 1994) 
कृषी सल्ला

कृषी सल्ला (कापूस, हरभरा, गहू)

या वर्षी रब्बी हंगामात हरभरा पिकांची पेरणी जास्त झाल्याचे दिसून येते. काही ठिकाणी जमिनीत वापसा स्थिती न मिळाल्याने पेरणीस उशीर झाला. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे, त्यांच्याकडे उशिरा बागायती गहू पिकांची पेरणी चालू आहे.

डॉ. के. के. डाखोरे, वाय. ई. कदम

या वर्षी रब्बी हंगामात हरभरा पिकांची पेरणी जास्त झाल्याचे दिसून येते. काही ठिकाणी जमिनीत वापसा स्थिती न मिळाल्याने पेरणीस उशीर झाला. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे, त्यांच्याकडे उशिरा बागायती गहू पिकांची पेरणी चालू आहे.  मराठवाड्यात या वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात कोरडे हवामान झाले होते, त्यामुळे थंडीत वाढ झाली. किमान तापमानात सरासरीपेक्षा साधारण २ ते ७ अंश सेल्सिअस पर्यंत घट झाली. मात्र काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘निवार’ चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी सतत ढगाळ वातावरण, जोरदार वारे, रात्रीच्या तापमानात चढ-उतार अशी स्थिती अनुभवास आली. सध्या पिकांसाठी हवामान पोषक असून पीक परिस्थिती समाधानकारक दिसते. पुढील काळात पिकांच्या आवश्यकतेनुसार पिकात आंतर मशागतीची कामे, पाण्याचे नियोजन, तणनियंत्रण योग्य प्रकारे करावे.  एकंदरीत या वर्षी मराठवाड्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे जमिनीत भरपूर प्रमाणात ओलावा आहे. रब्बी पिकाची पेरणी तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे झाल्याचे दिसते. खरीप हंगामाच्या अखेरीला पाऊस झाल्यामुळे जमिनीत ओलावा असल्याने या वर्षी रब्बी हंगामात हरभरा पिकांची पेरणी जास्त झाल्याचे दिसून येते. काही ठिकाणी जमिनीत वापसा स्थिती न मिळाल्याने पेरणीस उशीर झाला. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे, त्यांच्याकडे उशिरा बागायती गहू पिकांची पेरणी चालू आहे.  कापूस 

  • सध्या कापूस पीक वेचणी अवस्थेत असून कपाशीची जातवार स्वच्छ वेचणी करावी.
  • कापूस वेचताना त्यात काडीकचरा येणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. 
  • कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पऱ्हाट्या जमा करून त्यांची योग्य ते विल्हेवाट लावावी.
  •  पाणी बचतीसाठी...

  • पाण्याची कमतरता असल्यास पिकांना एक सरी आड पाणी द्यावे.
  • पिकात किंवा फळबागेत आच्छादनाचा वापर करावा. यामुळे बाष्पीभवन कमी होते व तणाची उगवण कमी होते. 
  • पिकात किंवा फळबागेत तणाचा प्रादुर्भाव झाला असल्यास तण नियंत्रण करून घ्यावे. 
  • शक्यतो पिकांना पाणी तुषार सिंचनाद्वारे व फळ बागेला ठिबक द्वारे द्यावे, त्यामुळे पाणी बचत होते.    
  • पिकात पाणी व्यवस्थापन करत असताना पिकात पाणी साचणार नाही, यांची काळजी घ्यावी. 
  • गहू  गहू हे एक रब्बी हंगामातील मुख्य पीक आहे. समशितोष्ण हवेच्या पट्ट्यात गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणात आढळून येते. गव्हाला थंड, कोरडे आणि स्वच्छ सूर्य प्रकाशित हवामान चांगले मानवते.

  • गहू पिकासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी. गव्हाची पेरणी केली नसल्यास उशिरा बागायती गव्हाची पेरणी १५ डिसेंबरपर्यंत करता येते.
  • उशिरा बागायती गहू पिकांच्या पेरणीसाठी निफाड-३४, एचडी-२५०१, एचडी-२८३३ किंवा समाधान या वाणाची निवड करावी. उशिरा बागायती गहू पिकांच्या पेरणीसाठी ८०:४०:४० किलो नत्र, स्फुरद व पालाश खताची शिफारस आहे. त्यापैकी पेरणी वेळी अर्धे नत्र व पूर्ण स्फुरद, पालाश यांची खत मात्रा द्यावी.
  • सकाळी पडणारे दव पिकाच्या वाढीसाठी अनुकूल असते. 
  • हरभरा 

  • हरभरा हे एक रब्बी हंगामातील मुख्य पीक आहे.
  • हरभरा पीक फुलोऱ्यात किंवा घाटे भरण्याच्या वेळेस धुके पडल्यास पिकाचे फार नुकसान होते.
  • सध्या पीक फांद्या लागणे अवस्थेत असून या काळात हरभरा पिकात घाटे अळी खूप क्रियाशील असते. घाटे अळीच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी २ कामगंध सापळे व २० पक्षी थांबे लावावेत.
  • जमिनीत ओलावा पाहून व पिकांच्या आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
  • घाटे लागणे ते घाटे भरणे या मुख्य अवस्था आहेत. या कालावधीत योग्य पाणी व्यवस्थापन केल्यास उत्पादनात वाढ होते. 
  • संपर्क : डॉ. के. के. डाखोरे, ९४०९५४८२०२  (अखिल भारतीय समन्वयक संशोधन कृषी हवामानशास्त्र योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

    Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

    First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

    Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

    Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

    SCROLL FOR NEXT