द्राक्ष सल्ला
द्राक्ष सल्ला 
कृषी सल्ला

द्राक्ष सल्ला

डॉ. एस. डी. सावंत

येत्या आठवड्यामध्ये सर्व द्राक्ष विभागामध्ये कमी-जास्त प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे. पाऊस कमी-जास्त प्रमाणामध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत येण्याची शक्यता आहे.

  • सांगली विभागामध्ये शुक्रवारपासून पाच सहा दिवस चांगला पाऊस बऱ्याच ठिकाणी होऊ शकतो. कवठेमहांकाळ, पळशी, खानापूर, विटा, तासगाव या सर्व भागामध्ये हा पाऊस आठवडाभर चालेल.
  • सोलापूर विभागामध्ये सोलापूर, नानज, काटी, कारी, बार्शी, उस्मानाबाद, तुळजापूर, लातूर या सर्व भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे.
  • पुणे विभागामध्ये जुन्नर, नारायणगाव व जवळपासचा भाग शनिवारपासून तीन चार दिवस पावसाची शक्यता आहे. यवत, उरुळी कांचन, पारगाव, पाटस, बारामती या भागामध्ये गुरुवारपासूनच पुढील आठवडाभर हलक्या ते चांगल्या पावसाची शक्यता आहे.
  • नाशिक विभागामध्ये शनिवार, रविवारनंतर पावसाची शक्यता आहे. पिंपळगाव बसवंत, ओझर, वणी, निफाड या भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. हा पाऊस दोन तीन दिवसानंतर वाढू शकेल.
  • उपाययोजना ः

  • पावसाची शक्यता पाहिल्यानंतर ज्यांच्या छाटण्या झालेल्या नसतील, त्यांनी बागेतील छाटण्या सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत लांबणीवर टाकण्यास हरकत नाही. येत्या आठवड्यामध्ये असलेला पाऊस सर्व साधारणपणे सप्टेंबरच्या पहिला पंधरवडा संपेपर्यंत चालू राहील. त्यानंतरचा पाऊस अधूनमधून व हलका राहण्याची शक्यता आहे. म्हणून सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये छाटणी केलेल्या बागेमध्ये नवीन फुटी व पोंगा स्थिती येण्यास ऑक्टोबरचा पहिला आठवडा संपेल. त्यानंतर पाऊस संपूर्णपणे थांबण्याची शक्यता असल्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव व फुलोऱ्यातील गळ ही समस्या राहणार नाही.
  • सांगली विभागातील पलुस, येळावी आणि वाळवा हे भाग व नाशिकच्या दिंडोरी, वणी भागामध्ये तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी दिसत आहे. इथून पुढे येणाऱ्या पावसामध्ये तांबेरा वाढण्याची शक्यता आहे. तांबेरा नियंत्रणासाठी पावसाच्या दिवसामध्ये बोर्डो मिश्रण अर्धा टक्के सर्वात चांगले काम करेल. ज्या बागांमध्ये वाढत्या फुटी आहेत, किंवा कोवळी पाने आहेत अशा बागांमध्ये तांबेरा नियंत्रणासाठी ट्रायअझोल वर्गातील बुरशीनाशके चांगले काम करू शकतील. (फवारणी प्रति लिटर पाणी) टेब्युकोनॅझोल अर्धा मि.लि. किंवा ट्रायफ्लॉक्सिस्ट्रॉबीन अधिक टेब्युकोनॅझोल (संयुक्त बुरशीनाशक) अर्धा मि.लि.
  • पावसाळी वातावरणामध्ये जैविक नियंत्रण वापरल्यास त्याचे सर्वात जास्त चांगले परिणाम मिळू शकतील. सध्याच्या पावसात न छाटलेल्या बागामध्ये डाऊनी व पावडरी यांच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा ५ मि.लि. प्रति लिटर किंवा बॅसिलस सबटिलीस २ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे फवारणीसाठी वापरल्यास चांगले परिणाम मिळतील.
  • छाटणीपूर्व काळामध्ये ट्रायकोडर्मा व बॅसिलस सबटिलीस ठिबकद्वारे प्रति एकर एक लिटर प्रमाणात सोडल्यास छाटणीनंतर फुटणाऱ्या फुटी रोगास चांगला प्रतिकार करू शकतील. हे छाटणीपूर्व काळामध्ये उपयुक्त ठरेल.
  • संपर्क ः डॉ. एस. डी. सावंत, ०२०-२६९५६००१ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

    Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

    Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

    Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

    Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

    SCROLL FOR NEXT