रब्बी भाजीपाला सल्ला 
कृषी सल्ला

रब्बी भाजीपाला लागवड सल्ला

सध्या रब्बी हंगामातील भाजीपाला लागवडीचा कालावधी आहे. भाजीपाला पिकासाठी योग्य वाण निवडून, रोपवाटिका कराव्यात. त्यासाठी शिफारशीत जाती व पद्धतींची माहिती घेऊ.

डॉ. यू. एन. आळसे, प्रा. डी. डी. पटाईत, डॉ. एस. जी. पुरी

१. मिरची

  • जाती ः परभणी तेजस, ज्वाला, पंत सी-१, फुले ज्योती, आणि संकेश्‍वरी.
  • लागवड कालावधी ः १५ ऑक्‍टोबर ते १५ नोव्हेंबर. नियोजित लागवडीपूर्वी २० ते २५ दिवस अगोदर रोपे गादी वाफ्यावर तयार करून घ्यावीत.
  • हेक्टरी बियाणे ः १ किलो
  • लागवड पद्धती ः जमिनीनुसार ६०x६० से.मी. किंवा ६०x४५ से.मी. अंतरावर रोपांची लागवड करावी.
  • खत व्यवस्थापन ः लागवडीवेळी ६० किलो नत्र, ८० किलो स्फुरद व ५० किलो पालाश या प्रमाणात खते द्यावीत. लागवडीनंतर एक महिन्याने ६० किलो नत्राची मात्रा बांगडी पद्धतीने द्यावी. त्यानंतर त्वरित पाणी द्यावे.
  • २. वांगी

  • जाती - वैशाली, प्रगती, कृष्णा, सुवर्णा एबीव्ही-१.
  • बियाणे प्रमाण ः हेक्टरी ६०० ग्रॅम.
  • लागवड पद्धती ः ६० x७५ से.मी. किंवा ६०x६० से.मी. अंतरावर लागवड करावी.
  • खत व्यवस्थापन ः लागवडीवेळी ७५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश ही खतमात्रा द्यावी. लागवडीनंतर ३० दिवसांनी ७५ किलो नत्राची मात्रा द्यावी.
  • ३. टोमॅटो

  • जाती ः देवगिरी, परभणी, यशश्री, पुसारुबी, राजश्री, एटीएच-१.
  • बियाणे प्रमाण ः हेक्‍टरी ५०० ग्रॅम
  • लागवड कालावधी ः १५ ऑक्‍टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत. त्या आधी २० ते २५ दिवस गादी वाफ्यावर रोपे तयार करून घ्यावीत.
  • लागवड पद्धती ः ६०x४५ किंवा ६०x६० से.मी. अंतरावर रोपे
  • खत व्यवस्थापन ः लागवडीवेळी ५० किलो नत्र, ५० किलो प्रत्येकी स्फुरद व पालाश द्यावे. उर्वरित ५० किलो नत्र मात्रा लागवडीनंतर ३० दिवसांनी द्यावी.
  • ४. मेथी

  • जाती ः पुसा अर्लीब्राचिंग, आरएमटी-१, कस्तुरी.
  • बियाणे प्रमाण ः २५ ते ३० कि. बियाणे प्रतिहेक्‍टरी.
  • लागवड पद्धती ः बी फेकून किंवा २५ से.मी. अंतरावर आणि ३x२ मीटर आकाराचे सपाट वाफे करून करावी.
  • खत व्यवस्थापन ः लागवडीवेळी ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद, ५० किलो पालाश द्यावे. मेथी कापणीनंतर ५० किलो नत्राची मात्रा द्यावी.
  • ५. पालक

  • जाती ः ऑल ग्रीन, पुसा, ज्योती परित.
  • बियाणे प्रमाण ः ८ ते १० किलो प्रतिहेक्‍टरी.
  • लागवड पद्धती ः १०x१० से.मी. अंतरावर बी पेरावे. किंवा ३x२ मीटर आकाराचे सपाट वाफे करून पेरणी करावी.
  • खत व्यवस्थापन ः लागवडीवेळी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश द्यावे.
  • ६. फूलकोबी

  • जाती ः फूलकोबी स्नोबॉल-१६, पुसा सिंथेटिक.
  • बियाणे प्रमाण ः ६०० ते ७०० ग्रॅम बियाणे प्रतिहेक्‍टरी.
  • लागवड कालावधी ः १५ ऑक्‍टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत
  • लागवड पद्धती ः ६०x६० किंवा ६०x४५ से.मी. अंतरावर रोपे लावावीत. त्या आधी २१ ते २५ दिवस अगोदर गादी वाफ्यावर रोपे तयार करून घ्यावीत. रोपे लागवडीपूर्वी कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर या द्रावणात बुडवून लावावीत.
  • खत व्यवस्थापन ः १६० किलो नत्र, ८० किलो स्फुरद व ८० किलो पालाश.
  • ७. कोबी

  • जाती ः गोल्डन एकर, प्राइड ऑफ इंडिया, अर्ली ड्रमहैड.
  • बियाणे प्रमाण ः ५०० ते ६०० ग्रॅम प्रतिहेक्‍टरी बियाणे.
  • लागवड पद्धती ः ६०x६० किंवा ४५x४५ से.मी. अंतरावर रोपांची लागवड करावी. त्या आधी २५ दिवस रोपवाटिकेत रोपे तयार करून घ्यावीत. लागवडीपूर्वी कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर या द्रावणात रोपे बुडवून लावावीत.
  • महत्त्वाच्या टिप्स

  • खरीप ज्वारी व बाजरीची कापणी पीक पूर्ण पक्वतेच्या ८ ते १० दिवस अगोदर करावी.
  • रब्बी कोरडवाहू ज्वारीची १५ ऑक्‍टोबरपर्यंत, तर बागायती ज्वारी, करडई व जवसाची पेरणी ३० ऑक्‍टोबरपर्यंत संपवावी.
  • रब्बी हंगामासाठी शिफारशीत जातींचाच लागवडीसाठी वापर करावा.
  • प्रमाणित न केलेल्या बियाण्यास बीज प्रक्रिया करा. शिफारशीप्रमाणे बीज प्रक्रिया करावी.
  • खरिपातील बाजरी, मका, ज्वारी पिकांची काढणी झाल्यानंतर कोणतीही मशागत न करता (शून्य मशागत पद्धतीने) कोरडवाहू करडई व हरभरा यांची पेरणी त्वरित करा.
  • खते व बियाणे दोन चाडी तिफणीने जमिनीत पेरावीत.
  • ओलिताखाली रब्बी पिकाची पेरणी केल्यानंतर पाणी देण्यासाठी सारा यंत्राच्या साह्याने सारे पाडा. सारा यंत्र नसल्यास वखराच्या पासाला दोरी बांधून सारे पाडा.
  • कडधान्य व गळीत धान्य पिकास स्फुरद सिंगल सुपर फॉस्फेटद्वारे द्यावे. त्यामुळे पिकासाठी आवश्यक गंधकाचा पुरवठा होतो.
  • कीड नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन करावे. त्यात प्रकाश सापळे, एचएनपीव्ही विषाणू, निंबोळी अर्क निमार्क इत्यादींचा वापर करा. त्यामुळे रासायनिक कीटकनाशकाचा वापर कमी होण्यास मदत होईल.
  • नवीन लागवड केलेल्या फळझाडांना काडीचा आधार द्या.
  • नवीन लागवड केलेल्या झाडांच्या खोडावर बोर्डोपेस्ट लावा.
  • कलम केलेल्या जोडावरती प्लास्टिकची पट्टी सैल करून बांधा.
  • फळझाडांना ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करा. पाण्याची बचत होते.
  • शेतीविषयक शास्त्रीय माहितीसाठी कृषी विद्यापीठ, कृषी विभाग येथील शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपर्कात राहावे.
  • संपर्क ः ०२४५२-२८०२३८ (कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    CM Women Employment Scheme: बिहार सरकारच्या ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेतून महिलांना मिळणार १० हजार रुपये

    Crop Insurance : पीकविम्याची थकित १६० कोटी भरपाई वाटप करा

    Cashew Crop Insurance : विमा परताव्याची रत्नागिरीत ३६ हजार बागायतदारांना प्रतीक्षा

    Illegal Fishing : अवैध मासेमारीला चालना मिळणार

    Kadba Kutti Machine Scheme: शेतकऱ्यांना सरकारकडून कडबा कुट्टी मशीनवर मिळणार ५० टक्के अनुदान

    SCROLL FOR NEXT