फवारणी, मातीतून सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर 
कृषी सल्ला

फवारणी, मातीतून सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर

डॉ. पपिता गौरखेडे

फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर

  • फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्ये देताना द्रावणातील अन्नद्रव्यांचे प्रमाण अत्यंत कमी असणे आवश्यक आहे. त्यामुळेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचे पोषण पिकांना नेहमी नियमित व वारंवार दिले गेले पाहिजे.
  • सूक्ष्म अन्नद्रव्यांचा फवारणीद्वारे वापर हा फळ पिकांना उपयुक्त ठरतो.
  • सूक्ष्म अन्नद्रव्ये फवारणीद्वारे देताना द्रावणाचा सामू आम्ल किंवा अल्कधर्मी असू नये. त्यासाठी द्रावणात चुना योग्य प्रमाणात वापरणे आवश्यक आहे. उदा. जस्त या अन्नद्रव्याच्या फवारणीसाठी ०.५ टक्के जस्त सल्फेटच्या द्रावणात ०.२५ टक्के चुना मिसळतात. ज्यामुळे द्रावणाचा सामू अल्क किंवा आम्लधर्मी होत नाही.
  • फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्ये वापरासाठी द्रावणाची तीव्रता पिकांच्या गरजेनुसार असणे आवश्यक आहे.
  • सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आटोक्यात आणण्यासाठी लेखात दिलेल्या तक्त्यानुसार तीव्रतेचे द्रावण १५ ते २१ दिवसाच्या अंतराने आवश्यकतेनुसार २ ते ३ वेळा किंवा शिफारशीनुसार पिकांवर विविध संवेदनशील वाढीच्या काळात फवारावे.
  • सूक्ष्म अन्नद्रव्ये खतांचे फवारणीद्वारे द्यावयाचे प्रमाण सूक्ष्म अन्नद्रव्य खत प्रमाण........................प्रमाण जस्त सल्फेट.............................................0.5 ते 1.00 टक्के लोह सल्फेट...............................................0.5 ते 1.00 टक्के मॅंगनीज सल्फेट.........................................0.5 ते 1.00 टक्के कॉपर सल्फेट.............................................0.5 ते 1.00 टक्के बोरक्स/ बोरिक ॲसिड.................................0.2 ते 0.5 टक्के सोडियम/ अमोनियम मोलाब्द......................0.05 ते 0.01 टक्के

     सूक्ष्म अन्नद्रव्ये खते व त्यांचा वापर

    सूक्ष्म अन्नद्रव्य खताचे नाव वापर
    जस्त जस्त सल्फेट/ चिलेट जस्त लागवड/ पेरणी सोबत, अन्यथा पिकांच्या सुरवातीच्या वाढीच्या कालावधीत किंवा शिफारशीनुसार जमिनीद्वारे व फवारणीकरिता.
    लोह फेरस सल्फेट/ चिलेटेड लोह प्रामुख्याने जमिनीवर देण्याऐवजी पिकांवर 2 ते 3 फवारणी योग्य, जमिनीद्वारे द्यावयाचे झाल्यास अन्न सेंद्रिय खतात मिसळून घ्यावे.
    मंगल  मॅंगनीज सल्फेट/ चिलेटेड मॅंगनीज लोहाप्रमाणेच फवारणी योग्य परंतु फवारणीचा कालावधी शिफारशीनुसारच.
    तांबे   मोरचूद (कॉपर सल्फेट) शिफारशीनुसार जमिनीद्वारे द्यावे 4 ते 8 वर्ष प्रतिसाद मिळू शकतो.
    बोरॉन  बोरक्स/ बोरिक ॲसिड  जमिनीद्वारे व फवारणीद्वारे देण्यात योग्य.
    मोलाब्द  सोडियम मोलाब्द/ अमोनियम मोलाब्द बीज प्रक्रिया करणे सर्वात योग्य, इतर खतासोबत मिसळून जमिनीद्वारे किंवा फवारणीद्वारे योग्य.
         

                डॉ. पपिता गौरखेडे, ८००७७४५६६६ (मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Cold Season : राज्यात थंडीचा कडाका टिकून; पुढील काही दिवस राज्यात थंडी कायम राहण्याचा अंदाज

    LPG Cylinder Prices: घरगुती गॅस सिलिंडर खरंच महाग होईल का?; अनुदानाचं सूत्र बदलण्याचा सरकारचा विचार

    Mango Flowering: आंबा पिकाने धरला बहर

    Animal Nutrition: पशुआहारातील स्टार्चचे महत्त्व

    Agriculture Electricity: खंडित वीजपुरवठ्याने शेतकरी मेटाकुटीस

    SCROLL FOR NEXT