राज्यात ‘स्पोडोप्टेरा’च्या नव्या जातीचा धोका 
कृषी सल्ला

राज्यात ‘स्पोडोप्टेरा’च्या नव्या जातीचा धोका

डॉ. अंकुश चोरमुले

स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा (फॉल आर्मी वर्म) ही मूळ अमेरिकेतील मका पिकावरील पाने खाणारी कीड आहे. तिने नुकताच भारतात प्रवेश केल्याचे दिसून आले. कर्नाटक राज्यातील शिमोरा येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर या किडीचा प्रादुर्भाव प्रथम दिसून आला. शास्त्रज्ञांनी परिसराचे सर्वेक्षण केले असता चीकमंगळुर, चित्रदुर्ग, दावनगिरे, बेल्लारी, बेळगाव, हसन या जिल्ह्यांत ४० ते ७० टक्क्यांपर्यंत या किडीचा प्रादुर्भाव दिसून आला. २० ते २५  दिवसांच्या मका पिकावर कणसे लागणीच्या अवस्थेत या किडीचा प्रादुर्भाव अधिक आढळला. नुकत्याच हाती आलेल्या अहवालानुसार ही कीड तामिळनाडू आणि तेलंगणाच्या काही भागाही आढळून येत आहे. ३० जुलै २०१८ रोजी भारतीय कृषी अनुसंधान या संस्थेने या किडीबाबत अलर्ट जारी केला आहे.

ही कीड इतकी धोकादायक का? या किडीचे पतंग हे ताकदवान असून, एका रात्रीत सुमारे १०० किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकतात. त्याचबरोबर या किडीची प्रजनन क्षमताही जास्त आहे. मादी तिच्या जीवनक्रमात सुमारे १ ते २ हजार अंडी घालू शकते. ही कीड झुंडीने आक्रमण करत असल्यामुळे काही दिवसातच पीक फस्त करून टाकते.

यजमान वनस्पती ः

  •  प्रामुख्याने मका या पिकावर उपजीविका करत असली तरी सुमारे ८० पिकावर उपजीविका करू शकते.
  •  भात, भुईमूग, ऊस, ओट, ज्वारी, शुगर बीट, सोयाबीन, तंबाखू, गहू आणि कापूस पिकावरही उपजीविका करू शकते.
  • भारतात ही कीड आतापर्यंत दुर्लक्षित का राहिली? भारतात आढळणारी व मका पिकावर येणारी लष्करी अळी (मायथेम्ना सेपरेटा) आहे. या दोन्ही किडी जवळपास सारख्या दिसत असल्याने आतापर्यंत फॉल आर्मी वर्मचा प्रादुर्भाव प्रकाशझोतात आला नाही. ही कीड मागील काही वर्षांपासून भारतात असण्याची शक्यता शास्त्रज्ञ व्यक्त करतात. ही कीड भारतात आफ्रिकेतून मानवी साहित्य वाहतुकीतून आली असण्याची शक्यता आहे.

    जीवनक्रम

  • अंडी ः अंडी घुमटाच्या आकाराची असून, ती पुंजक्‍यात घातली जातात. अंडी अवस्था सुमारे दोन ते सात दिवसांची असते
  • अळी ः अळी अवस्था ही सुमारे सहा अवस्थेमधून पूर्ण होते. अंड्यातून बाहेर पडणारी अळ्या अन्नाच्या शोधात विखुरल्या जातात.
  • अ) प्रथम अवस्थेतील अळी - आकाराने लहान, रंगाने हिरवी असून, त्यांचे डोके काळ्या रंगाचे असते.
  • ब)     दुसऱ्या अवस्थेपासून डोके नारंगी रंगाचे होते.
  • क) तिसऱ्या अवस्थेत अळी तपकिरी रंगाची होते. शरीराच्या दोन्ही बाजूने पांढऱ्या रेषा दिसण्यास सुरवात होते.
  • ड)     चौथ्या ते सहाव्या अवस्थेत अळीच्या शरीरावर उंचवट्यासारखे ठिपके दिसू लागतात. अळी अवस्था १४ ते ३० दिवसांत पूर्ण होते.
  • कोष ः पूर्ण वाढ झालेली अळी २ ते ८ सेंटिमीटर खोलीवर जमिनीत जाऊन मातीचे आवरण करते. या आवरणात ती कोषावस्थेत जाते. कोष लालसर तपकिरी रंगाचा असतो. वातावरणानुसार कोषावस्था ८ ते ३० दिवसांपर्यंत पूर्ण होते ही लष्करी अळी आपला जीवनक्रम वातावरणानुसार ३० ते ९० दिवसात पूर्ण करते
  • ओळखण्याची खूण

  • अळीच्या डोक्याच्या पुढच्या बाजूस उलट ‘Y’ आकाराची खूण असते.
  • अळीच्या शेवटून दुसऱ्या बॉडी सेगमेंट वर चौकोनी आकारात चार ठिपके दिसून येतात. त्या चार ठिपक्‍यात केस देखील आढळून येतात. अळीच्या  शरीरावर इतरत्र कुठेही अशी ठेवण दिसत नाही.
  • अळीच्या शरीरावर फोडी आल्यासारखे काळे ठिपके दिसून येतात, त्या ठिपक्यामध्ये लहान केस देखील दिसतात.
  • महाराष्ट्राच्या दृष्टीने या किडीचे महत्त्व महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील काही भागांत (रायबाग, बेळगाव, अथणी, विजापूर) मक्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तसेच, महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हळद पिकात मका हे पीक आंतरपीक म्हणून देखील केले जाते. या भागात या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याबाबत शेतकऱ्यांनी सजग राहणे आवश्यक आहे. मक्यासोबत ज्वारी, बाजरी, ऊस, भुईमूग या पिकांवरदेखील या किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

    नियंत्रणाचे उपाय ः   शिमोगा कृषी विद्यापीठ (कर्नाटक) येथील कीटक शास्त्रज्ञ डॉ. सी. एम. कल्लेश्वरा स्वामी आणि डॉ. शरणबसाप्पा यांनी दिलेल्या माहितीनुसार,

    किडीच्या नियंत्रणासाठी, फवारणी     लॅंबडा सायहॅलोथ्रीन (५ ईसी) १ मि.लि. प्रति लिटर पाणी. (प्रक्षेत्रावरील चाचण्यांमध्ये या कीटकनाशकाची जैव परिणामकारकता अभ्यासली गेली आहे.)     नोमुरिया रिलेयी (जैविक कीटकनाशक) ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणीदेखील उपयुक्त ठरली आहे.

    (लेखक सिक्स्थ ग्रेन ग्लोबल या खासगी कंपनीत कार्यरत आहेत.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Assembly Election Result 2024 : छत्रपती संभाजीनगर, बीड, जालन्यात महायुतीच सरस

    Solapur Assembly Election Result : सोलापूर जिल्ह्यात भाजपची सरशी

    Maharashtra Vidhansabha Election Result : परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश

    BJP Dominance : महाराष्ट्रावरील भाजपची मांड पक्की

    Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

    SCROLL FOR NEXT