अळी-कोष-परोपजीवी (Larval-Pupal Parasitoid) या प्रकारातील परोपजीवीची मादी यजमान किडीच्या अळयांवर किंवा आत अंडी घालतात. आतमध्ये पूर्ण वाढ होऊन यजमान किडीच्या कोषावस्थेतुन प्रौढ़ बाहेर पडतात. उदा. आयसोटीमा जावेन्सिस ः यजमान -उसावरिल शेंडा पोखरणारी अळी
कोष-परोपजीवी (Pupal Parasitoid) या प्रकारातील परोपजीवी मादी यजमान किडींच्या कोषामध्ये अंडी घालते. त्यांच्या अळ्या कोषाच्या आत खाऊन वाढ झाल्यानंतर त्यांचे प्रौढ़ यजमान किडींच्या कोषावस्थेतून बाहेर पडतात.
परोपजीवी मित्रकीटक - यजमान कीड ब्राचिमिरिया नेफेनटिडीस , झांटोपिमप्ला पुन्क्टाटा , ट्रायकोस्पिलुस पुपिवोरा , ट्रायकोस्पिलुस इस्रायली -
नारळावरील काळ्या डोक्याची अळी पिल्ले-प्रौढ़-परोपजीवी (Nymphal-Adult-Parasitoid) या प्रकारातील परोपजीवीची मादी यजमान किडींच्या बाल्यावस्थामध्ये शरीराच्या आत किंवा वर अंडी घालता. त्यातून बाहेर पडलेली अळी यजमान किडीला खाऊन टाकतात. मेलेल्या किडीच्या शरीरामधून पूर्ण वाढ झाल्यानंतर प्रौढ़ बाहेर पडतात.
परोपजीवी मित्रकीटक - यजमान कीड एपिरिकॅनिया मेलेनोल्यूका -उसावरिल पायरीला अफेलिनस मॅली -सफरचंदावरील मावा एन्कार्सिया फॉरमोसा अणि एन्कार्सिया फेवोस्कुटेलम - कपाशीवरील पांढरी माशी
अशा प्रकारे करता येईल परोपजीवी मित्रकीटकांचे संवर्धन :
जैविक कीड नियंत्रणातील काही महत्त्वाचे मित्रकीटक ट्रायकोग्रामा :
प्रसारण मात्रा - एका ट्रायकोकार्डवर सुमारे २० हजार अंडी असतात. अशा ट्रायकोकार्डसचे ५ ते १० प्रति हेक्टर या प्रमाणात तर प्रौढांचे ५० हजार प्रौढ प्रति हेक्टर याप्रमाणे प्रसारण करावे. किडीच्या प्रादुर्भावानुसार आठवड्याच्या अंतराने ४ ते ५ प्रसारणे करावीत.
कोटेशिया : (अपेंटॅलीस) ब्रॅकोनिड कुटुंबातली हा परोपजीवी असून, नर पतंग साधारणत: ३ मिलिमीटर लांबीचा असतो. तो झाडाच्या फुलातील रस शोषून जगतो, तर मादी यजमान किडीच्या अळीमध्ये अंडी घालते. या परोपजीवीच्या अळी अवस्थेचा विकास होताना यजमान किडीच्या अळीचा नायनाट करते. अळी नंतर सुप्तावस्थेमध्ये जाते. भाजीपाला पिकातील शेंडा व फळे पोखरणारी अळी, उसावरील खोडकीड, उसावरील कांडी कीड, घाटे अळी किंवा बोंड अळी आदींच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. प्रसारण मात्रा - ५० हजार प्रौढ प्रति हेक्टर.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.