शेवगा पीक संरक्षण
शेवगा पीक संरक्षण 
कृषी सल्ला

शेवगा पीक संरक्षण

अंबादास ना. मेहेत्रे, डॉ. उल्हास सुर्वे

शेवगा पिकांमध्ये उत्तम शेंगा उत्पादनासाठी संजीवकांचा वापर आणि वेळेवर रोग व कीडनियंत्रण याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पीक संजीवकाची फवारणी ः पीक फुलोऱ्यात असताना फूलगळ टाळण्यासाठी व भरपूर शेंगा लागण्यासाठी नॅप्थील ॲसेटिक ॲसिड (एन.ए.ए.) ४ मि.लि. प्रति १० लिटर (१० पीपीएम ) याप्रमाणे फवारावे. पीक संरक्षण : १) पाने खाणारी अळी :

शा. नाव - स्पोडोप्टेरा लिट्यूरा सुरवातीस कोवळ्या पानांवर प्रादुर्भावास सुरवात होते. हळूहळू ८ ते १० दिवसांत संपूर्ण पाने, कोवळे शेंडे व झाडाची कोवळी साल खाऊन टाकते. ही अळी खादाड असल्याने थोड्याच दिवसात संपूर्ण झाडाचे नुकसान करते. पानाच्या शिरावरील हरित द्रव्य खाते व पानाची जाळी तयार होते. नियंत्रण : फवारणी प्रति लिटर पाणी क्लोरपायरीफॉस (५०%) अधिक सायपरमेथ्रीन (५%) संयुक्त कीटकनाशक १ ते १.५ मिलि किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन १ ते १.५ मिली किंवा मोनोक्रोटोफॉस १ ते १.५ मिली २) फळमाशी :

शा.नाव ः Gitona distiema ही माशी कोवळ्या व तयार शेंगावर अंडी सोडते. ३ ते ४ दिवसांत अंड्यातून अळ्या बाहेर येतात. त्या शेंगात शिरून आतील गर खातात. शेंगातून डिंक व फेस बाहेर पडतो, शेंगा वाळून जातात व सडतात. याला अनेक शेतकरी डिंक्या म्हणून ओळखतात. नियंत्रण : फवारणी प्रति लिटर पाणी स्पिनोसॅड (४५ एससी) ०.३ ते ०.४ मिली. रोग १. करपा : पानावर काळपट ठिपके येतात. फांद्या करपतात. पाने पिवळी पडून गळतात. करपा रोगामुळे झाडे पिवळे पडून करपल्यासारखे दिसते. नियंत्रण : फवारणी प्रति लिटर पाणी कार्बेन्डाझीम १ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब १ ग्रॅम २. मररोग (मुळकुज): पाण्याचा निचरा न होणारी जमीन, पावसाचे पाणी दीर्घकाळ साचून राहणे यामुळे झाडांच्या मुळा पाण्यात राहिल्यामुळे सुरवातीला झाडे पिवळे पडतात व नंतर ४ ते ५ दिवसांनी झाड वरून पूर्ण वाळत जाते व पिवळे पडून मरतात. याला आपण मररोग किंवा मुळकुज म्हणतो. उताराची व उत्तम निचरा होणाऱ्या जमिनात मररोग होत नाही. उपाययोजना : आळवणी (ड्रेंचिंग) प्रति लिटर पाणी कार्बेन्डाझीम किंवा कॉपर ऑंक्सिक्लोराईड १ ते १.५ ग्रॅम. काढणी व उत्पादन : शेवग्याच्या शेंगा जातीनुसार लागवडीनंतर ५ ते ६ महिन्यांत तोडायला येतात व पुढे ३ ते ४ महिने तोडणी चालते. शेंगा मांसल व मध्यम अवस्थेत तोडाव्यात. एक वर्षांनंतर चांगल्या झाडापासून २५ ते ५० किलो शेंगा मिळतात. संपर्क ः अंबादास ना. मेहेत्रे, ९५४५३२३९०६ डॉ. उल्हास सुर्वे, ९८२२६०६५११ (कृषि विद्या विभाग, पदव्युत्तर महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT