कृषी सल्ला
कृषी सल्ला  
कृषी सल्ला

कृषी सल्ला : मिरची, लसूण, भेंडी, वांगी, गुलाब, हरभरा, गहू

कृषी विद्या विभाग, राहुरी

सध्या व येत्या पाच दिवसांत कमाल तापमान ३० ते ३३ अंश सेल्सिअस, तसेच किमान तापमान ०६ ते ०९ अंश सेल्सिअस राहील. कमाल आर्द्रता ७७ ते ७९ टक्के, तर किमान आर्द्रता २८ ते ३३ टक्के राहील. अशा प्रकारे रात्री थंडी वाढली असून, दिवसाचे तापमानही वाढत आहे. यामुळे भाजीपाला पिकावर रस शोषणाऱ्या किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. मिरची ः अवस्था - वाढीची या पिकावर रसशोषक फुलकिडे, पांढरी माशी व कोळी यांच्या प्रादुर्भावामुळे चुरडा मुरडा (लीफ कर्ल), फळसड किंवा डायबॅक - फांद्या वाळणे, पानावरील ठिपके इत्यादी रोग आढळून येतात.

रोग आढळल्यास फवारणी प्रति लिटर फिप्रोनील १.५ मिलि किंवा फेनपायरॉक्झिमेट (५ ईसी) १ मिली किंवा फेनाक्झाक्विन (१० ईसी) २ मिलि या पैकी एक कीटकनाशक अधिक मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड २.५ ग्रॅम किंवा डायफेनोकोनॅझोल १ मिलि. पुढील फवारणी कीटकनाशक आणि बुरशीनाशक बदलून १० दिवसांच्या अंतराने घ्यावी. लसूण ः अवस्था - वाढीची लसूण पिकास हलकीशी खुरपणी करुन तणांचा बंदोबस्त करावा. लसूण पिकाच्या लागवडीपासून ४५ ते ५० दिवसांनी अर्धा नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. लसूण पिकावर फुलकिडे आणि पांढरट लांबट कोळी (इरिओफाइड माइट) या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. असा प्रादुर्भाव आढळल्यास, फवारणी प्रतिलिटर पाणी डायमेथोएट १.५ मिली अधिक पाण्यात विरघळणारे गंधक ३ ग्रॅम. भेंडी अवस्था ः फळे लागणे फळे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी, फवारणी निंबोळी अर्क (४ टक्के) ५०० लिटर प्रति हेक्टरी फवारावे किंवा अॅझाडिरॅक्टीन (५ टक्के) (१० हजार पीपीएम) २ मिली प्रति लिटर किंवा बॅसिलीस थुरिंन्जिएन्सीस २ ग्रॅम प्रति लिटर पाणी. वांगी अवस्था ः फळे लागणे फळे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी प्रोफेनोफॉस २ मिलि किंवा स्पिनोसॅड ३ ते ४ मिली किंवा इंडोक्झाकार्ब १ मिलि. गुलाब पांढरी माशी या किडींच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी अॅसिटामिप्रिड ०.४ ग्रॅम. हरभरा अवस्था ःफुलोरा/ घाटे हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी क्लोरअॅंट्रानिलिप्रोल (१८.५ टक्के प्रवाही) ०.२५ मिलि. किंवा एच.ए.एन.पी.व्ही. १ मिलि. करडई अवस्था ः वाढ मावा किडीच्या नियंत्रणासाठी, फवारणी अॅसिटामिप्रिड (२० टक्के पाण्यात मिसळणारी पावडर) २ ग्रॅम प्रति १० लिटर. गहू अवस्था ः वाढ मावा व तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीस दिसून येताच, फवारणी प्रति लिटर थायामिथॉक्झाम (२५ डब्लू.जी.) ०.१ ग्रॅम. फळ पिके ः किमान तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्याने फळ बागाना रात्रीच्या वेळेस पाणी द्यावे. डाळिंब अवस्था ः वाढीची मावा किडीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १ मिलि. आंबा आंबा मोहोराचे तुडतुडे आणि भुरी रोगांपासून संरक्षण करण्यासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी इमिडाक्लोप्रिड (१७.८ एस.एल.) ०.३ मिली व हेक्झाकोनॅझोल (२० ईसी) १ मिलि. बोर फळ पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी अॅझाडिरॅक्टीन ५ टक्के (१० हजार पीपीएम) २ मिली प्रति लिटर पाणी. संपर्क ः ०२४२६-२४३२३९ (ग्रामीण कृषी हवामान सेवा आणि कृषी विद्या विभाग, महात्मा पुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT