weekly weather 
कृषी सल्ला

या आठवड्यात तापमान वेगाने वाढण्याची शक्यता

या आठवड्यात तापमानवाढीचा वेग गुरुवार (ता.१७) पासून अधिक वेगाने होईल. त्यामुळे उष्ण लहरी जाणवतील. या आठवड्यात अरबी समुद्राच्या पृष्ठभागावर चक्राकार वारे वाहतील; त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टीलगत जाणवेल. किमान तापमान सरासरीपेक्षा १.६ अंश ते ३ अंश सेल्सिअसने अधिक राहील.

डॉ. रामचंद्र साबळे

या आठवड्यात तापमानवाढीचा वेग गुरुवार (ता.१७) पासून अधिक वेगाने होईल. त्यामुळे उष्ण लहरी जाणवतील. या आठवड्यात अरबी समुद्राच्या पृष्ठभागावर चक्राकार वारे वाहतील; त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टीलगत जाणवेल. किमान तापमान सरासरीपेक्षा १.६ अंश ते ३ अंश सेल्सिअसने अधिक राहील. महाराष्ट्र व दक्षिण भारतावरील हवेचे दाब १००८ हेप्टापास्कल तर उत्तर भारतातील हवेचे दाब १०१० हेप्टापास्कल इतके कमी होतील. जेव्हा कमाल व किमान तापमानात वाढ होते, तेव्हा हवेचे दाब कमी होतात. आणि वेगाने तापमानवाढ होण्यास सुरुवात होते. उष्ण हवामानाची दाहकता जाणवू लागते. उष्ण लहरी वाढतात. या आठवड्यात तापमानवाढीचा वेग गुरुवार (ता.१७) पासून अधिक वेगाने होईल. त्यामुळे उष्ण लहरी जाणवतील. या आठवड्यात अरबी समुद्राच्या पृष्ठभागावर चक्राकार वारे वाहतील; त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टीलगत जाणवेल. किमान तापमान सरासरीपेक्षा १.६ अंश ते ३ अंश सेल्सिअसने अधिक राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढणे शक्‍य आहे. जेव्हा तापमान वाढते तेव्हा हवेतील सापेक्ष आर्द्रता घटते. हवामान अत्यंत कोरडे राहते. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने आग्नेय व ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेगही सामान्यच राहील. या आठवड्यात हवामान बदल जाणवणार नाहीत. मात्र, महाराष्ट्रातील बऱ्याच भागात आकाश अंशतः अल्पशा प्रमाणात ढगाळ राहील. कोकण  कमाल तापमान पालघर व ठाणे जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस, रायगड जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. किमान तापमान पालघर व ठाणे जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात ते २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. पालघर, रायगड व ठाणे जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ३४ ते ३८ टक्के तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात ५० ते ५८ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता १९ ते २३ टक्के इतकी कमी राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ७ कि.मी. आणि दिशा ईशान्येकडून राहील. उत्तर महाराष्ट्र  कमाल तापमान नाशिक व धुळे जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस तर नंदूरबार जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस, जळगाव जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. धुळे व नंदूरबार जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. नाशिक व जळगाव जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २५ ते ३० टक्के, तर दुपारची १३ ते १७ टक्के इतकी कमी राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ कि.मी. व दिशा ईशान्येकडून राहील. मराठवाडा  उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील. कमाल तापमान जालना जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस आणि औरंगाबाद जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस तर नांदेड व बीड जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. उर्वरित परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यात किमान तापमान २२ अंश सेल्सिअस तर औरंगाबाद जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. जालना व औरंगाबाद जिल्ह्यात आकाश निरभ्र राहणे शक्‍य आहे. उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता २३ ते ३० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७ ते १२ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याची दिशा ईशान्य आणि आग्नेयेकडून राहील. पश्‍चिम विदर्भ  कमाल तापमान बुलडाणा जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस तर अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. अकोला जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. तर बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता २२ ते २४ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १२ ते १३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ कि.मी. व दिशा ईशान्येकडून राहील. मध्य विदर्भ  वर्धा जिल्ह्यात कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस तर यवतमाळ व नागपूर जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान यवतमाळ जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ, नागपूर व वर्धा जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २३ ते २४ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १२ ते १३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १२ ते १३ कि.मी. आणि दिशा ईशान्येकडून राहील. पूर्व विदर्भ  कमाल तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ३८ व ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात २० ते २१ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. भंडारा जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २५ ते २९ टक्के, तर दुपारची ११ ते १२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ कि.मी. व दिशा ईशान्येकडून राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र  कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस तर सांगली, सोलापूर, पुणे आणि नगर जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस तर सांगली, पुणे व नगर जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. तर सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ४३ टक्के व उर्वरित जिल्ह्यात २८ ते ३२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत १३ ते १७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १४ कि.मी. आणि दिशा आग्नेयेकडून राहील. कृषी सल्ला 

  • हळद पिकाची काढणीची कामे पूर्ण करावीत. हळकुंडे शिजवून, वाळवून, पॉलिश करून सुरक्षित ठिकाणी साठवण करावी.
  • आंबा मोहराचे वेळीच संरक्षण करावे.
  • उन्हाळी हंगामात शेडनेटमध्ये कोथिंबीर, मेथी, पालक ही पिके घ्यावीत.
  • वेलवर्गीय भाजीपाला लागवड करावी.
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

    Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

    Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

    November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

    Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

    SCROLL FOR NEXT