Pigeon pea Phule Rajeshwari 
कृषी सल्ला

सुधारित तंत्राने तूर लागवड

तुरीची पेरणी वेळेवर म्हणजेच ३० जूनपर्यंत होणे आवश्‍यक आहे. पेरणी जसजशी उशिरा होईल त्याप्रमाणे उत्पादनात घट येते. यासाठी जास्तीत जास्त ७ जुलैपूर्वी पेरणी करता येईल.

डॉ. शरद जाधव, डॉ. नंदकुमार कुटे, डॉ. तानाजी वळकुंडे

तुरीची पेरणी वेळेवर म्हणजेच ३० जूनपर्यंत होणे आवश्‍यक आहे.  पेरणी जसजशी उशिरा होईल त्याप्रमाणे उत्पादनात घट येते. यासाठी जास्तीत जास्त ७ जुलैपूर्वी पेरणी करता येईल. तूर लागवडीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी.  जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ व सेंद्रिय कर्ब ०.५ % पेक्षा जास्त असावा. चोपण क्षारयुक्त जमीन मानवत नाही. आम्लयुक्त जमिनीत पिकाच्या मुळांवरील गाठीची योग्य वाढ होत नसल्याने रोपे पिवळी पडतात.  पूर्वमशागत शेवटच्या कुळवणी वेळी हेक्‍टरी १५ ते २० गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. काडीकचरा वेचून जमीन पेरणीसाठी तयार करावी. योग्य वाणांची निवड आय.सी.पी.एल.८७, विपुला, फुले राजेश्‍वरी, बी.डी.एन.७०८(अमोल), बी.एस.एम.आर.८५३ (वैशाली), बी.एस.एम.आर.७३६, बी.डी.एन.७११, बी.डी.एन.७१६, पी.के.व्ही. तारा, बी.डी.एन.१३४१ (गोदावरी),  पेरणीची वेळ तुरीची पेरणी ३० जूनपर्यंत करणे आवश्‍यक आहे. मॉन्सूनचा समाधानकारक पाऊस (७५ ते १०० मि.मी.) पडल्यानंतर वाफसा येताच कुळवणी करावी. तद्नंतर योग्य ओल असताना तुरीची पेरणी करावी. पेरणी जसजशी उशिरा होईल त्याप्रमाणे उत्पादनात घट येते. यासाठी जास्तीत जास्त ७ जुलैपूर्वी पेरणी करता येईल.  बीज प्रक्रिया

  • पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम किंवा थायरम २ ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रति किलो बियाणांस चोळावे. 
  • मुळावरील कार्यक्षम गाठीच्या संख्येत वाढ व हवेतील नत्राच्या स्थिरीकरणासाठी - रायझोबिअम २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे.
  • जमिनीत स्थिर झालेले स्फुरद उपलब्ध होण्यासाठी -पीएसबी २५ ग्रॅम प्रति किलो.
  • तुरीची पेरणी पद्धत व अंतर

  • तुरीचे सलग पीक घ्यावयाचे असल्यास लवकर तयार होणाऱ्या वाणांची पेरणी ४५ × १० सें.मी. अंतरावर करावी.
  • मध्यम कालावधीच्या वाणांची पेरणी ६० × २० सें.मी. किंवा ९० × २० सें.मी. अंतरावर करावी.
  • अलीकडे घेण्यात आलेल्या प्रयोगामध्ये अधिक अंतरावर (१८० × ३० सें.मी. व ९० × ६० सें.मी.) पेरलेल्या तूर पिकाचे आशादायक उत्पादन मिळालेले आहे.
  • आंतरपीक पद्धती  १८० × ३० सें.मी. अंतरावर लागवड करून त्यात सोयाबीनच्या तीन ओळी आंतरपीक म्हणून ४५ × ५ सें.मी. अंतरावर लागवड करावी. सोयाबीन लवकर निघून जाते. तूर व सोयाबीन दोन्ही पिकांतून चांगले उत्पादन मिळते. बियाण्याचे प्रमाण

  • आय.सी.पी.एल.८७ वाणाच्या पेरणीसाठी - हेक्टरी १८ ते २० किलो.
  • मध्यम मुदतीच्या विपुला, फुले राजेश्‍वरी व बी.डी.एन.७११ वाणांसाठी -  हेक्टरी १२ ते १५ किलो. 
  •   उशिरा येणाऱ्या आणि जास्त अंतरावर लागवड करावयाच्या वाणांसाठी - हेक्टरी ५ ते ६  किलो.
  • खत व्यवस्थापन सलग तुरीसाठी हेक्‍टरी २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद म्हणजेच १२५ किलो डीएपी पेरणी वेळी द्यावे. आंतरपीक असल्यास ज्या पिकाच्या ओळी जास्त त्या पिकाची शिफारस केलेली खतमात्रा द्यावी.   आंतरमशागत

  • तुरीचे पीक सुरुवातीच्या काळात अतिशय सावकाश वाढते. त्यामुळे तणांचा प्रादुर्भाव जास्त जाणवतो. पीक ४५ दिवसांचे होईपर्यंत कोळपण्या कराव्यात व खुरपणी करून शेत तणमुक्त ठेवावे.
  • तणनाशकांचा वापर करावयाचा असल्यास, पेरणीनंतर लगेच वाफशावर(पुरेसा ओलावा) पेंडीमिथॅलिन २.५ लिटर प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यातून जमिनीवर फवारावे. 
  • आंतरपिके तूर पिकांमध्ये आंतरपीक पद्धती फायदेशीर ठरते. यासाठी विविध आंतरपीक पद्धतींची शिफारशी करण्यात आली आहे.तूर पिकाची उत्पादक वाढ सुरू होईपर्यंत पक्व होणारी इतर पिके आंतरपीक म्हणून घेतल्यास प्रति हेक्टरी उत्पादन वाढून आर्थिक नफा जास्त होतो.

    आंतरपिकाचा प्रकार...........ओळींचे प्रमाण तूर + बाजरी.........................१:२  तूर + सूर्यफूल.......................१:२ तूर +सोयाबीन.......................१:३ तूर +ज्वारी...........................१:२ किंवा १:४ तूर+ कापूस..........................१:६ किंवा १:८ तूर+ भुईमूग.........................१:३ तूर +मूग..............................१:३ तूर +उडीद..........................१:३ - डॉ. शरद जाधव,  ९९७०९९६८९० (विषय विशेषज्ञ (कृषी विद्या), कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर) डॉ. नंदकुमार कुटे,  ७५८८५१३३९८ (प्रमुख शास्त्रज्ञ, कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Azolla Cultivation: अझोलाचे उत्पादन कसे करावे?

    Indian Agriculture 2025: थंडी यंदा रब्बी पिकांना असह्य होण्याचा धोका; IMDच्या अपडेटनंतर ICAR अलर्टवर!

    APMC Farmer Facility : शेतीमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत जेवणाचे पास ः सूर्यकांत पाटील

    Cabinet Decision: मंत्रिमंडळ बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी भवनांसाठी १३२ कोटींचा निधी तर आधुनिक संत्रा केंद्र उभारणीसाठी मुदतवाढ

    Maharashtra Weather Update : राज्यातील १३ जिल्ह्यांतील ८१ मंडळांत अतिवृष्टी

    SCROLL FOR NEXT