Perfect period for grafting in the vineyard 
कृषी सल्ला

द्राक्ष बागेत कलम करण्यासाठी योग्य कालावधी

काही ठिकाणी नवीन द्राक्षजातींचे तर काही ठिकाणी जुन्याच द्राक्ष जातींचे क्षेत्र वाढवले जाते. या करिता बागायतदार खुंट रोपांची लागवड जानेवारी -फेब्रुवारीमध्ये करतात. सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात कलम करून घेतात. लागवड यशस्वी करण्याकरिता खालील गोष्टींचा विचार करणे गरजेचे असते.

डॉ. आर. जी. सोमकुंवर

काही ठिकाणी नवीन द्राक्षजातींचे तर काही ठिकाणी जुन्याच द्राक्ष जातींचे क्षेत्र वाढवले जाते. या करिता बागायतदार खुंट रोपांची लागवड जानेवारी -फेब्रुवारीमध्ये करतात. सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात कलम करून घेतात. लागवड यशस्वी करण्याकरिता खालील गोष्टींचा विचार करणे गरजेचे असते. दरवर्षी द्राक्ष लागवडीखालील क्षेत्रात वाढ होत आहे. यामध्ये एक तर जुनी द्राक्ष बाग काढून त्या ठिकाणी उपलब्ध खुंटावर नवीन फुटी वाढवून नवीन बाग उभारली जाते. तर काही ठिकाणी नवीन क्षेत्रामध्ये द्राक्षजातींची लागवड केली जाते. यामध्ये काही नवीन द्राक्षजाती असतात, काही जुन्याच द्राक्ष जातींचे क्षेत्र वाढवले जाते. या करिता बागायतदार खुंट रोपांची लागवड जानेवारी -फेब्रुवारीमध्ये करतात. सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात कलम करून घेतात. लागवड यशस्वी करण्याकरिता खालील गोष्टींचा विचार करणे गरजेचे असते. वातावरण व द्राक्ष बागेतील परिस्थिती 

  • कलम यशस्वी होण्यासाठी बागेतील तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअस असावे.
  • आर्द्रता ८० टक्क्यांच्या पुढे असावी. अशी परिस्थिती असल्यास कलम जोड सहजरीत्या जुळतो.
  • खुंट रोपांची परिस्थिती  खुंट लागवड केल्यानंतर रोपांची मुळे व्यवस्थितरीत्या जमिनीत पसरत जाते. मुळांचा विकास झाल्यानंतर खुंट रोपाची वाढ होत असते. कलम करण्यासाठी खुंट रोपाची काडी रसरशीत असावी. यासाठी खुंट काडी अर्ध परिपक्व किंवा कोवळी असावी. त्यामध्ये रसनिर्मिती चांगल्या प्रकारे होते. जून महिन्यामध्ये खुंट रोपांचा रिकट घेतलेल्या ठिकाणी या वेळी काडीत रस असेल. मात्र ज्या ठिकाणी रिकट घेतला नव्हता, अशा बागेत जर काड्या परिपक्व असल्यास बागेत कलम करण्याच्या तीन ते चार दिवस आधी पाणी द्यावे. यामुळे काडीमध्ये रसनिर्मितीस चालना मिळेल. कलम करण्यासाठी उशीर असल्यास एकरी पाच किलो युरिया ठिबकद्वारे एकदा द्यावा. रिकट न घेतलेल्या बागेत कलम करतेवेळी तीन ते चार सरळ, सशक्त अशा काड्या असाव्यात. काड्याची विरळणी कलम करण्यापूर्वी १० ते १२ दिवस आधी करावी. यामुळे काडीत रसनिर्मिती पूर्ववत होऊन कलम जोडामध्ये कॅलस तयार होण्यास मदत होईल. जमिनीपासून एक ते सव्वा फूट अंतरावर कलम केले जाते. या ठिकाणी कलम करतेवेळी खुंट रोपाची काडी ८ ते १० मिमी असावी. सायन काडीसुद्धा तितक्याच जाडीची असल्यास खुंट व कलम यशस्वी होण्यास चांगली मदत मिळते. बऱ्याच वेळा बागायतदार खुंट काडी जमिनीपासून दोन फूट अंतरावर काप घेतात. त्यानंतर त्या काडीतून बराच रस निघून गेलेला असतो. शेवटी कलम केल्यानंतर सायन काडीसाठी आवश्यक असलेली अन्नद्रव्ये रसातून मिळत नाही. त्यामुळे कलम यशस्वी होण्यात अडचणी येतात. तेव्हा वर काप न घेता बगलफुटी काढाव्यात. किंवा कलम करतेवेळी आवश्यक त्या फुटी निवडून कलम करावे. सायन काडीची परिस्थिती  आपण ज्या द्राक्ष जातीचे कलम करणार आहोत, त्याला सायन काडी म्हटले जाते. ही सायन काडी निवडण्याकरिता काही गोष्टींची खबरदारी घेणे महत्त्वाचे असेल. ज्या बागेतून आपण सायन काडी निवडणार आहोत, ती बाग रोग व कीड मुक्त, अधिक उत्पादनक्षम आणि दरवर्षी सूक्ष्मघड निर्मिती करणारी असावी. निवडलेली काडी पूर्ण परिपक्व असावी. अशा काडीमध्ये अन्नद्रव्यांचा आवश्यक तितका साठा असतो. कलम केल्यानंतर कॅलस तयार होईपर्यंत निघालेल्या नवीन फुटीच्या वाढीकरिता आवश्यक ती अन्नद्रव्ये या परिपक्व झालेल्या दोन पेऱ्यांतून वापरली जातात. काडी कच्ची असल्यास कलम केल्यानंतर डोळा लवकर फुटेल. मात्र काही दिवसातच अन्नद्रव्यांच्या अभावामुळे सुकायला सुरुवात होईल. कलम यशस्वी होण्यासाठी कलम करणाऱ्या व्यक्तीचे कौशल्य महत्त्वाचे आहे. कलमजोडावर प्लॅस्टिकची पट्टी बांधणे, ही सुद्धा कला आहे. कलम जोड थोडाही उघडा राहिल्यास त्यामध्ये हवा जाऊन केलेली पाचर सुकून जाईल किंवा पाऊस असल्यास पाणी जाऊन ही पाचर कुजेल. द्राक्ष बागेत पाचर पद्धतीने कलम करतो. तेव्हा ही पाचर पूर्णपणे उघडी झाली असेल व त्या सायन काडीमधील पीथ पूर्ण तपकिरी रंगाचा असल्याची खात्री करावी. पाचर केल्यानंतर काडीचा पीथ दुधाळ किंवा हिरव्या रंगाचा असल्यास कलम यशस्वी होणार नाही. अशा सायन काड्या आधीच बाजूला कराव्यात. बऱ्याचशा बागेत कलम करतेवेळी पावसाळी वातावरण असते. यामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव काडीवर झालेला दिसतो. तेव्हा कलम करतेवेळी सायन काडी कार्बेन्डाझिम ३ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे तयार केलेल्या द्रावणात दोन ते तीन तास बुडवून ठेवावी. असे केल्यामुळे काडी रोगमुक्त होण्यास मदत होईल. सध्या बऱ्याच ठिकाणी पाऊस नसल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत बागेत कलम केल्यानंतर लगेच बोद भिजेल अशा प्रकारे पाणी द्यावे. यामुळे बागेत आर्द्रता वाढेल व काडीमध्ये रसनिर्मितीही होईल. कलम केल्याच्या पाच ते सहा दिवसानंतर जर उन्हे पडत असल्यास कलमजोडाच्या वर पाण्याची फवारणी करणे गरजेचे असेल. डोळे फुगत असताना उडद्या या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येईल. कलम करण्यासाठी फक्त दोन डोळ्याची सायन काडी वापरली जाते. उडद्या किडीने डोळे पोखरल्यास पूर्ण नुकसान होऊ शकते. उडद्यापासून बचावासाठी पाच ते सहा दिवसापासून शिफारशीत कीडनाशकांची फवारणी करावी. - डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

    Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

    Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

    Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

    Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

    SCROLL FOR NEXT