शेतकरी उत्पादक कंपन्यांची सुरवात शेतकऱ्यांना पर्यायी बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने झाली आहे. त्यामुळे शेतकरी कंपनीकडे आधुनिक तंत्रज्ञान असणे गरजेचे आहे. गेल्या दोन वर्षांचा अनुभव पाहता अल्प भूधारक शेतकरी आणि इतर मूल्य साखळीतील सभासद यांना बळकट करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाची आवश्यकता आणि भूमिका पूर्वीपेक्षा अधिक स्पष्ट झाली आहे. २०२० मध्ये कोरोना साथीचा प्रारंभ होताना, सर्वसामान्यांच्या व समाजातील सर्व स्तरावरील घटकांच्या हालचालींवर बंधने आणली गेली. वेगवेगळ्या देशातील लॉकडाउनच्या चक्रामुळे शेतकरी आणि इतर भागीदारांमधील प्रगतीमध्ये अडथळा तयार झाला. यामुळे जवळपास सर्व स्तरातील घटकांनी विक्री व वितरण व्यवस्था ऑनलाइन पद्धतीने राबविण्यास सुरवात केली. यास शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या व महिला बचत गटांबरोबरच महिला गटांचे संघ यांनी आघाडी घेण्यास सुरवात केली आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांनी उत्पादन वाढीबरोबरच संशोधन व विक्री व्यवस्थेमध्ये डिजिटल तंत्रज्ञान वापरण्यास प्रकर्षाने सुरवात झाली आहे . अविकसित देशाचे उदाहरण घ्यावयाचे झाल्यास, केनियातील बटाटा शेतीचे देता येईल. आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्र (सीआयपी) आणि त्याचे भागीदार यांनी प्रोत्साहन दिलेले नवीन डिजिटल तंत्रज्ञान व निगडित साधने, बटाटा शेती व इतर खाद्य प्रणालीच्या बाजारपेठेत बदल घडवून आणत आहेत. शेतकऱ्यांना व कृषी विस्तार अधिकारी यांना तसेच बाजारपेठांना तांत्रिक माहिती वेळेवर उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने डिजीटायझेशनच्या माध्यमातून प्रयत्न केले गेले. केनियामध्ये, आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राने एका खासगी कंपनीबरोबर भागीदारी केली. रताळे पिकासाठी सध्याच्या चांगल्या कृषी पद्धतींचे डिजिटायझेशन केले. यामुळे शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाद्वारे माहिती मिळू शकली. एका आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे अनुदानित “बायोफोर्टिफाइड पिकाचा विकास व वितरण” प्रकल्पांतर्गत २०२० पासून आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्र आणि एका कंपनीने १५,००० शेतकऱ्यांना दोन भाषांमध्ये (इंग्रजी आणि स्वाहिली) विनामूल्य डिजिटल प्रशिक्षण दिले आहे.यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसोबतच गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळाले. माहिती तंत्रज्ञानाचा वापर
- प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०. (कृषी व्यवसाय पणन व्यवस्थापक, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या,साखर संकुल,शिवाजीनगर, पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.