मराठवाड्यातील पावसाची स्थिती मुळात बेभरवशाची. पावसावर आधारित ज्वारीसारख्या पिकांचे नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांची संघर्ष काही चुकत नाही. अशा वेळी रब्बी ज्वारींची हुरड्यासाठी नियोजन करणे फायद्याचे ठरू शकते. कारण एका टप्प्यातच ज्वारीचे पीक हुरड्यावर येते. शेतात आगोटीमध्ये भाजलेल्या हुरड्याची गावरान चव अगदी शहरी झालेल्या माणसांनाही खेचून घेते. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांसह व्यावसायिक पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या बहुतांश कृषी पर्यटन केंद्रामध्ये हुरडा पार्ट्यांचे आयोजन सुरू होते. ज्वारीच्या तुलनेमध्ये हुरड्याला दरही (१२० ते २०० रुपये प्रति किलो) चांगला. त्यामुळे शेतकऱ्यांनी हुरडा या घटकावर लक्ष केंद्रित करून ज्वारीची लागवड करावी. हुरडा ज्वारी नियोजनाचे फायदे
मशागत
पेरणीचा कालावधी
बीजप्रक्रिया काणी रोग प्रतिबंधासाठी, गंधक (३०० मेश) ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे, खोडमाशी, खोडकिडा प्रतिबंधासाठी इमिडाक्लोप्रीड (४८ टक्के एफएस) १४ मि.लि. प्रति किलो बियाणे या प्रमाणात प्रक्रिया करावी. ताटांची योग्य संख्या व रुंद पेरणी
हुरड्यासाठी ज्वारीचे सुधारित वाण एसजीएस-८-४ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेला वाण. हुरड्याची प्रत उत्तम असून, चवीला रुचकर व गोड. कणसातून दाणे सहज वेगळे होतात. अन्य हुरडा वाणापेक्षा दाणे टपोरे. प्रतिहेक्टरी १५-१६ क्विंटल हुरडा आणि ७०-७५ क्विंटल कडब्याचे उत्पादन. फुले उत्तरा महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला वाण. हुरडा गोड आणि रुचकर, दाणे सहजरीत्या वेगळे होतात. प्रतिहेक्टरी २० ते २२ क्विंटल हुरडा आणि ६० ते ६५ क्विंटल कडब्याचे उत्पादन. फुले मधुर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला वाण पश्चिम महाराष्ट्र, रब्बी हंगामातील हुरडा लागवडीसाठी प्रसारित. हुरडा गोड व रुचकर, दाणे कणसापासून सहजरीत्या वेगळे होतात. अवर्षणप्रवण स्थितीत लागवडीस योग्य. खोडमाशी, खोडकिडा व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम. हेक्टरी ३० ते ३२ क्विंटल हुरडा आणि ६५ ते ७० क्विंटल कडब्याचे उत्पादन. अन्य वाण : सुरती, गूळभेंडी, कुची कुची, काळी दगडी, वाणी हे स्थानिक वाणसुद्धा हुरड्यासाठी उपलब्ध आहेत. रासायनिक खतांचा वापर
आंतरमशागत
काढणी अंगठा व बोटाच्या मध्ये ज्वारीचा दाणा दाबून पाहिल्यास दुधासारखा द्रव किंचित बाहेर येते. दाणे मऊसर लागतात. झाड फुलोऱ्यात आल्यानंतर १५ ते २५ दिवसांत ही अवस्था येते. या टप्प्यावर दाण्यामध्ये स्टार्च वेगाने साचत असते. या अवस्थेत एकूण धान्य वजनाच्या ५० टक्के एवढे असते. पुढे हुरड्याच्या अवस्थेत दाण्यामध्ये ते प्रमाण ६५ ते ६८ टक्के एवढे असते. हुरडा अवस्थेमधील कणसे आणल्यानंतर कणसे खुडून ती हाताने चोळावेत. हाताने चोळल्यानंतर त्यामधील दाणे सहज वेगळे होऊ शकतात. साठवणूक हुरडा ४ अंश सेल्सिअस तापमानात साठवल्यास ३० दिवसांपर्यंत चांगला राहू शकतो. - प्रीतम भुतडा, (सहायक कृषिविद्यावेत्ता), ९४२१८२२०६६ डॉ. एल. एन. जावळे, (ज्वारी पैदासकार) , ७५८८०८२१५७ (ज्वारी संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.