आच्छादनासाठी प्लॅस्टिक फिल्म, काडीकचरा, धसकटे, गवत किंवा पाचट यांचा वापर करावा. 
कृषी सल्ला

अवर्षणाचा पिकांवरील ताण कमी करण्यासाठी व्यवस्थापन

जमिनीतील ओलावा हा पडणाऱ्या पावसावर आणि जमिनीच्या खोलीवर अवलंबून असतो. ओल टिकवण्याच्या दृष्टीने खालील उपाययोजना महत्त्वाच्या ठरतात.

डॉ.आदिनाथ ताकटे, डॉ. नितीन उगले

जमिनीतील ओलावा हा पडणाऱ्या पावसावर आणि जमिनीच्या खोलीवर अवलंबून असतो. ओल टिकवण्याच्या दृष्टीने खालील उपाययोजना महत्त्वाच्या ठरतात. जून ते जुलै महिन्यात कमी अधिक पाऊस झाल्यामुळे काही ठिकाणच्या पेरण्या उशिरा तर काही ठिकाणी लवकर झाल्या आहेत. काही ठिकाणी पाऊस न झाल्यामुळे पेरण्या होऊ शकल्या नाहीत. याउलट पेरण्या झालेल्या ठिकाणी पिके अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडली आहेत. पावसाचा खंड पडल्यामुळे पिके कोमेजून गेली आहेत. काही ठिकाणी दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. अधिक काळ लांबलेल्या पावसाच्या पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. अशा परिस्थितीमध्ये पुढील उपाययोजनांचा अवलंब करावा. संरक्षित पाणी 

  • पिकांच्या संवेदनशील अवस्थेमध्ये एक तरी संरक्षित पाणी द्यावे.
  • सरी वरंबा पद्धतीमध्ये लावलेल्या पिकांना एक आड एक सरी भिजवून पाणी द्यावे.
  • हंगामी पिकांसाठी तुषार सिंचन, बारमाही पिके व फळबागांसाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. यामुळे पाण्याची बचत शक्य होते.
  • पीकवाढीच्या काळात पाण्यामध्ये खंड पडला तर फवारणीद्वारे पिकास अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा. त्यासाठी डीएपी (२%) तसेच पोटॅशिअमयुक्त खते (उदा. पोटॅशियम नायट्रेट किंवा पोटॅशिअम क्लोराईड किंवा म्युरेट ऑफ पोटॅश) (२%) या प्रमाणे फवारणी करावी. यामुळे पिकाची अवर्षणामध्ये तग धरण्याची शक्ती वाढते.
  • पीक फुलोऱ्यात असताना अथवा दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना संरक्षित पाणी दिल्यास पीक उत्पादनात दुपटीने वाढ होते.
  • कोळपणी करणे  पिकामध्ये २ ते ३ वेळा कोळपणी करावी. यामुळे मातीमध्ये हवा खेळती राहते. कोळपणीचा मुख्य उद्देश तण नष्ट करणे आणि वाया जाणारी ओल थोपवणे हा असतो. याशिवाय कोळपणीमध्ये माती हलवून ढिली केली जाते. त्यातून जमिनीच्या पृष्ठभागावर एक पोकळ थर तयार होतो, त्यामुळे उडून जाणारी ओल थोपवता येते. आच्छादनाचा वापर 

  •  बाष्पीभवनाद्वारे जमिनीतील उडून जाणारे पाणी थोपवून धरण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा.
  • आच्छादनासाठी प्लॅस्टिक फिल्म, शेतातील काडीकचरा, धसकटे, गवत किंवा पाचट हे पिकांच्या दोन ओळींत पसरावे. आच्छादनासाठी २ टन काडीकचरा पुरेसा असतो.
  • आच्छादनाच्या वापराने २५ ते ३० मिमी ओल्याव्याची बचत होते.
  • रोपांची विरळणी करणे 

  •  जास्त गर्दी झालेल्या रोपांची विरळणी केल्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्ये आणि पाण्याची बचत होते. ही अन्नद्रव्ये आणि पाणी रोपांना उपलब्ध होतात.
  • अवर्षणाच्या काळात पिकांद्वारे बाष्पोत्सर्जन कमी करण्यासाठी पानांची संख्या मर्यादित करावी. त्यासाठी खालील बाजूची पाने कमी करून वरील ४-५ कार्यक्षम पाने ठेवावीत.
  • परावर्तकांचा वापर 

  •  केओलीन, पांढरा रंग, खडूची भुकटी यांपैकी कोणतेही एक ८ टक्के ( ८० ग्रॅम प्रतिलिटर) या प्रमाणात फवारणीमुळे बाष्पीभवन कमी होऊन पिकांस अवर्षणाचा ताण सहन करण्यास मदत होते.
  • तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार युरिया दोन टक्के (२० ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणात) फवारणीद्वारे करावी.
  • अन्य कामांमध्ये खतांचा वापर, पीक संरक्षण याकडेही लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे पिके ताण सहन करण्यास सक्षम होतात.
  • वारा प्रतिबंधक झाडांचे/वनस्पतींचे शेताभोवती कुंपण घालावे. शेवरी, सुबाभूळ सारख्या वनस्पती लावल्यास चारा आणि लाकूड मिळते. या कुंपणामुळे वाऱ्याची गती रोखली जाते. पर्यायाने २० ते ३० मि. मी. ओलाव्याची बचत होते.
  • -  डॉ.आदिनाथ ताकटे,९४०४०३२३८९ (मृद शास्त्रज्ञ, कृषी विद्यावेत्ता एकात्मिक शेती पद्धती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी)  

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Diesel Sales Restriction: दर दिवशी मिळणार २०० लिटरच डिझेल: केंद्र सरकारचा निर्णय

    Horticulture Production: फलोत्पादनाचा उच्चांक

    Maharashtra Dairy Sector: गोरस भंडार संकटावर तोडगा; दूध उत्पादकांनी उभारली पर्यायी वितरण व्यवस्था

    Onion Procurement Falters: नाशिक जिल्ह्यात कांदा खरेदी अवघी १०० टन

    Farm Loan Waiver: चाळीस लाख शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    SCROLL FOR NEXT