Musturd sawfly 
कृषी सल्ला

मोहरीवरील काळी माशी नियंत्रण 

सध्याचे थंड व मध्येच ढगाळ वातावरणराहत असून, ते विविध किडींच्या वाढीसाठी पोषक आहे. मोहरी पिकामध्ये काळी माशीचा प्रादुर्भाव दिसत असल्यास एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा.

डॉ. संजोग बोकन, डॉ. बसवराज भेदे

सध्याचे थंड व मध्येच ढगाळ वातावरण राहत असून, ते विविध किडींच्या वाढीसाठी पोषक आहे. मोहरी पिकामध्ये काळी माशीचा प्रादुर्भाव दिसत असल्यास एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा.  काळी माशी (Mustard sawfly)  ओळख   प्रौढ माशीचे डोके गडद काळे, पोटाचा भाग केशरी रंगाचा, पंख काळसर. अळी मृदू काळसर रंगाची असून ८ पायांची जोडी असते. अळीला थोडा त्रास झाल्यास खाली जमिनीवर पडून शरीर गोल आकारात करून मेल्याचे ढोंग करते. त्यालाच ‘फेगनिंग डेथ’ असे म्हणतात.  जीनवक्रम  एक मादी जवळपास एक-एक अशी ६० अंडी पानाच्या शिरांमध्ये देते. अंड्यांची उबवण ६ ते ८ दिवसांत होऊन अळी बाहेर येते. अळी अवस्था १४ ते १८ दिवसांची असते. अळी मातीमध्ये १० ते १५ दिवसांसाठी कोष अवस्थेत जाते. या किडीचा जिवनक्रम ३० ते ३५ दिवसांत पूर्ण होतो. नोव्हेंबर ते मार्च या कालावधीमध्ये २-३ पिढ्या पूर्ण होतात.  नुकसानीचा प्रकार  अळ्या कोवळ्या पानाच्या कडेने खातात. नंतर पानांना छिद्र पाडून त्यातील हरितद्रव्य खातात.  एकात्मिक व्यवस्थापन 

  • प्रादुर्भावग्रस्त पाने दिसल्यास तोडून टाकावीत. 
  • सुरुवातीला ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडीरॅक्टीन (३०० पीपीम) ५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. 
  • रासायनिक नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी) 

  • डायामिथोएट (३० ईसी) १.३ मि.लि. किंवा 
  • क्विनॉलफॉस (२५ ईसी) २.४ मि.लि. 
  • संपर्क- डॉ. संजोग बोकन, ९९२१७५२०००  डॉ. बसवराज भेदे,  ७५८८०८२०२८  (कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.) 

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

    Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

    Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

    Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

    India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

    SCROLL FOR NEXT