Hydroponics fodder production 
कृषी सल्ला

जनावरांसाठी हायड्रोपोनिक्स चारा

चाराटंचाईच्या काळात हिरवा चारा व पशुखाद्य देणे व्यावसायिक व आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.अशा परिस्थितीत उत्तम व्यवस्थापन करून कमी दिवसात, कमी वेळेत, कमी पाण्यावर, कमी जागेत हायड्रोपोनिक्स चारा चांगला पर्याय आहे.

डॉ. सी. व्ही.धांडोरे, डॉ. रवींद्र सिंग

चाराटंचाईच्या काळात हिरवा चारा व पशुखाद्य देणे व्यावसायिक व आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.अशा परिस्थितीत उत्तम व्यवस्थापन करून कमी दिवसात, कमी वेळेत, कमी पाण्यावर, कमी जागेत हायड्रोपोनिक्स चारा चांगला पर्याय आहे. हायड्रोपोनिक्स चारा उत्पादन तंत्राचा वापर केल्याने वर्षभर हिरवा चारा उत्पादन शक्य आहे. कमी जागेत, कमी पाण्यात, कमी कालावधीत चारा उपलब्ध होतो. उन्हाळ्यातदेखील हिरव्या चाऱ्याची उपलब्धता होते.तयार झालेला चारा मुळासकट जनावरांना खाऊ घालता येत असल्यामुळे बहुतांश पाणी व जास्तीत जास्त अन्नद्रव्ये जनावरांना मिळतात. चारा चवदार असतो. प्रथिने, सूक्ष्म अन्नद्रव्ये, जीवनसत्त्वाचे प्रमाण भरपूर असतात. वर्षभर हिरव्या चाऱ्याचे उत्पादन घेता येत असल्यामुळे यावर वातावरणाचा विशेष फरक पडत नाही. जनावरांच्या आहारात पशुखाद्य वापरण्याच्या खर्चाचा विचार केला तर त्यापेक्षा कमी खर्चात जास्त प्रमाणात चारा जनावरांना देता येतो. यामुळे पशुखाद्यावरील २० ते ३० खर्च कमी होतो. दुधाच्या प्रमाणात वाढ होते. हा चारा अत्यंत पौष्टिक असतो. यामध्ये प्रथिने, सूक्ष्म अन्नद्रव्ये, जीवनसत्त्वाचे प्रमाण भरपूर असते. या तंत्राने कमी कालावधीत चांगल्या दर्जाचा हिरवागार सकस चारा जनावरांच्या आहारात देता येतो. या पद्धतीमध्ये माती विना मका, बाजरी या तृणधान्ये पिकांची वाढ करून पोषक चारानिर्मिती करता येते.  खाद्यावरील खर्चात बचत  

  • पारंपरिक चारा उत्पादनासाठी ४५ ते ६० दिवसांचा कालावधी लागतो. परंतु या तंत्रज्ञानाने ७ ते ८ दिवसांत चारा तयार होतो.
  • हायड्रोपोनिक्स पद्धतीने १ किलो चाऱ्यासाठी २ ते ३ लिटर पाणी लागते. तर पारंपारिक पद्धतीने ६० ते ८० लिटर पाणी लागते.
  • कमी तंतुमय पदार्थ आणि अधिक पिष्टमय पदार्थ यामुळे पारंपरिक मका चाऱ्यापेक्षा हायड्रोपोनिक्स चारा अधिक रुचकर लुसलुशीत, पौष्टिक, चवदार व पचनीय असतो.
  • चारा बनविण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या रसायनांचा वापर नसल्यामुळे पूर्णपणे नैसर्गिक चारा तयार होतो.
  • चाराटंचाईच्या काळात हिरवा चारा व पशुखाद्य देणे व्यावसायिक व आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.अशा परिस्थितीत उत्तम व्यवस्थापन करून कमी दिवसात, कमी वेळेत, कमी पाण्यावर, कमी जागेत हिरवा चारा उत्पादनासाठी चांगला पर्याय आहे.
  • चारा उत्पादनाचे तंत्र 

  • हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानामध्ये ट्रेचा वापर आवश्यक आहे. चारानिर्मितीसाठी चांगल्या प्रतीचे मका बियाणे निवडावे. बियाण्याची उगवणक्षमता चांगली असावी.
  • दोन लिटर कोमट पाण्यात एक किलो मका दिवसभर भिजत ठेवावा. त्यानंतर भिजविलेल्या मक्यातून पाणी निथळून गेल्यानंतर बियाणे ओल्या गोणपाटात गुंडाळून ठेवावे. यामुळे बियाणांची उगवण चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते.
  • गोणपाटावर सकाळ, संध्याकाळी पाणी शिंपडून सतत ओलसर ठेवावे. अशा पद्धतीने मका बियाणास सुमारे दोन दिवसांनंतर मोड फुटतात. मोड आलेले बियाणे ट्रे मध्ये पसरावे. ट्रे चा आकार तीन फूट लांब, दोन फूट रुंद आणि तीन इंच उंच असावा.
  • प्रत्येक ट्रे साठी एक किलो मका लागतो. आपल्याकडील जनावराच्या संख्येनुसार ट्रे ची संख्या ठरवावी. लाकडी पट्या किंवा बांबूच्या फ्रेमवर ट्रे ठेवावेत.  
  • ट्रे वर दिवसातून ४ ते ५ वेळेस झारीने पाणी फवारावे. एका ट्रे ला दोन लिटर पेक्षा जास्त पाणी लागत नाही. पंधरा दिवसांत चारा तयार होईपर्यंत प्रति ट्रे साठी तीस लिटर पाण्याची गरज असते.
  • सुमारे १२ ते १५ दिवसांमध्ये मका चारा साधारणपणे एक फुटांपर्यंत वाढतो. एक किलो बियाण्यापासून सुमारे १० ते १२ किलो चारा तयार होतो.
  • गाई,म्हशींसाठी  फायदे 

  •   दूध व फॅट प्रमाणात वाढ.
  •   पचन क्रिया सुधारते, आरोग्य चांगले राहाते.  
  •   क्षार मिश्रण, पशू खाद्यामध्ये बचत.
  •   दुभती जनावरास प्रती दिन १०-१२ किलो आणि भाकड जनावरे ६-८ किलो द्यावे.
  • शेळ्यांसाठी फायदे 

  • वजन चांगले वाढते.
  • रोगप्रतिकार शक्ती वाढते.
  • काही प्रमाणात खाद्य व क्षार मिश्रणात बचत.
  • केसांची चमक वाढते.
  • - डॉ. सी.व्ही.धांडोरे,  ९३७३५४८४९४, (श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र, कणेरी मठ, कोल्हापूर)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Farmer ID Block: अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांचा ‘फार्मर आयडी’ ब्लॉक करा: राज्यमंत्री आशीष जयस्वाल

    Seed Fertilizers Black Market: बियाणे, खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा: मेघना साकोरे-बोर्डीकर

    Pre Monsoon Preparation: शेतकऱ्यांनी पर्यायी पिकांचे आतापासूनच नियोजन करा: जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

    Sindhudurg Water Storage: सिंधुदुर्गातील लघुप्रकल्पांमध्ये केवळ २६.९४ टक्के पाणीसाठा शिल्लक

    Sugarcane Crushing: खानदेशात २३ लाख टनांवर ऊस गाळप

    SCROLL FOR NEXT