जास्त प्रमाणात रासायनिक खतांच्या वापराचे अनेक दुष्परिणाम दिसून येतात. रासायनिक खतांच्या बरोबरीने सेंद्रिय खतांचा वापरही तितकाच आवश्यक आहे. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी हिरवळीची खतपिके फायद्याची ठरू शकतात. मातीतील सेंद्रिय कर्ब वाढीसाठी हिरवळीची पिके उपयुक्त असतात. हिरवळीच्या पिकांची मिश्रपीक, आंतरपीक किंवा मुख्य पीक म्हणूनही लागवड करता येते. जमिनीचा पोत टिकवणे आणि उत्पादन वाढीसाठी हिरवळीच्या खतांना फार महत्त्व आहे. रासायनिक खतांच्या अयोग्य आणि अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता आणि उत्पादनक्षमता कमी होत चालली आहे. रासायनिक खतांना पर्याय म्हणून सेंद्रिय खतांचा वापर फायदेशीर ठरतो. हिरवळीच्या खतांचे प्रकार शेतात लागवड करण्यायोग्य हिरवळीची पिके ज्या शेतात हिरवळीचे खत गाडावयाचे आहे, तिथेच या हिरवळीच्या पिकांची लागवड केली जाते. हे पीक फुलोऱ्या येण्यापूर्वी नांगरट करून जमिनीत गाडतात. किंवा मुख्य पिकासोबत आंतरपीक म्हणूनही यांची वाढ करून ती जमिनीत गाडली जातात. उदा. धैंचा, चवळी, मूग, गवार, मटकी, वाटाणा व उडीद इ. हिरव्या कोवळ्या पानांचे खत या पद्धतीत वनस्पतीची हिरवी कोवळी पाने, फांद्या यांचा वापर केला जातो. अशा झाडांची लागवड बांधावर करून किंवा परिसरातील जंगलातून फांद्या व पाने गोळा करून शेत नांगरणी किंवा चिखलणीच्या वेळी जमिनीत गाडतात. उदा. शेवरी, गिरिपुष्प, सुबाभूळ, करंज, टाकळा आणि हदगा इ. हिरवळीच्या खतांसाठी उपयोगी पिके ताग
चवळी
धैंचा
गिरिपुष्प (ग्लिरिसिडीया)
हिरवळीचे पिके लागवड तंत्र लागवडीसाठी योग्य वेळ मृगाचा पहिला पाऊस पडल्यानंतर हिरवळीच्या पिकाची पेरणी करावी. ही वेळ प्रदेशनिहाय वेगळी असू शकते. पेरणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा. त्यामुळे पिकाची उगवण आणि वाढ जोमाने होते. जमिनीत गाडण्याची योग्य वेळ हिरवळीचे पीक फुलोऱ्यात असताना जमिनीत गाडावे. साधारणपणे पेरणीनंतर ६ ते ८ आठवड्यांमध्ये पीक फुलोऱ्यात येते. हिरवळीचे पिके गाडल्यानंतर मुख्य पिकांची पेरणी जमिनीमध्ये पिकांना कुजण्यासाठी किती वेळ लागतो, यावर मुख्य पिकांच्या पेरणीचे नियोजन करावे. हलक्या जमिनीमध्ये योग्य आर्द्रता असताना हिरवळीची पिके गाडल्यानंतर २ ते ७ दिवसांनी मुख्य पिकाची पेरणी करावी. हिरवळीच्या पिकांनी निवड
हिरवळीच्या खतांचे फायदे
- संजय बडे, ७८८८२९७८५९ (सहायक प्राध्यापक, कृषी विद्या-दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय दहेगाव, जि. औरंगाबाद)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.