शेतकरी : पंकज भिमगोंडा पाटील, गाव : वसगडे, ता. पलूस, जि. सांगली. एकूण क्षेत्र : चार एकर सोयाबीन क्षेत्र : १ एकर माझी वसगडे (ता. पलूस) येथे चार एकर बागायत शेती आहे. शेत जमीन काळी, मध्यम भारी प्रकारची आहे. मी गेल्या ५ ते ६ वर्षांपासून खरीप सोयाबीनचे उत्पादन घेत आहे. यंदा उन्हाळी सोयाबीनचा प्रथमच प्रयोग केला होता. उन्हाळी सोयाबीन लागवडीसाठी फुले संगम (केडीएस-७२६) या वाणाची निवड केली होती. यातून एकरी १८ क्विंटल उत्पादन मिळाले. उत्पादित सोयाबीनची बियाणे म्हणून विक्री केली. त्यासाठी खटाव (ता. पलूस) येथील प्रगतशील शेतकरी तात्यासो नागावे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याच क्षेत्रात एक महिन्याची विश्रांती देऊन खरीप हंगामासाठी जमीन तयार केली. केडीएस-७२६ हे वाण माझ्यासाठी फायद्याचे वाटत असल्याने खरीप हंगामासाठीही तीच जात निवडली आहे. लागवड टोकण पद्धतीने केली आहे. सध्या टोकण करून १४ ते १५ दिवसांचा कालावधी झाला आहे. मागील कामकाज
पुढील १५ दिवसांचे कामकाज
- पंकज पाटील, ९३२१९११००८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.