हरभऱ्याचे बहरललेले पीक. 
कृषी सल्ला

शेतकरी नियोजन : पीक हरभरा

आमची एकत्रित कुटुंबाची ८५ एकर शेती असून, त्यातील सुमारे ४० ते ४५ एकरांमध्ये हरभरा लागवड असते. त्यात ८ ते ९ वाणांची लागवड करतो. लागवडीसाठी प्रामुख्याने जाड दाण्याचे, कमी कालावधी आणि कमी पाण्यात येणारे, कीड-रोगास प्रतिकारक असे आणि हार्वेस्टरने काढणी करणे शक्य असे वाण निवडतो.

Gopal Hage

आमची एकत्रित कुटुंबाची ८५ एकर शेती असून, त्यातील सुमारे ४० ते ४५ एकरांमध्ये हरभरा लागवड असते. त्यात ८ ते ९ वाणांची लागवड करतो. लागवडीसाठी प्रामुख्याने जाड दाण्याचे, कमी कालावधी आणि कमी पाण्यात येणारे, कीड-रोगास प्रतिकारक असे आणि हार्वेस्टरने काढणी करणे शक्य असे वाण निवडतो. शेतकरी :  प्रफुल्ल साहेबराव सुलताने गाव :  गुंजखेड, ता. लोणार, जि. बुलडाणा एकूण क्षेत्र :  ८५ एकर हरभरा क्षेत्र :  ४५ एकर आमच्या भागात जमीन, हवामान आणि पाण्याची उपलब्धता या सर्व बाबींमुळे रब्बी हंगामात हरभरा पिकास जास्त प्राधान्य दिले जाते. सोयाबीन काढणीनंतर वेळेत पेरणी करण्यासाठी रोटाव्हेटर, वखरणीद्वारे शेत तयार करतो. आवश्‍यकतेनुसार तणनाशकांचा वापर केला जातो. कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेण्यावर विशेष भर असतो. आमची एकत्रित कुटुंबाची ८५ एकर शेती असून, त्यातील सुमारे ४० ते ४५ एकरांमध्ये हरभरा लागवड असते. त्यात ८ ते ९ वाणांची लागवड करतो. लागवडीसाठी प्रामुख्याने जाड दाण्याचे, कमी कालावधी आणि कमी पाण्यात येणारे, कीड-रोगास प्रतिकारक असे आणि हार्वेस्टरने काढणी करणे शक्य असे वाण निवडतो. दरवर्षी साधारण १४ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत हरभऱ्याची पेरणी केली जाते. हा काळ हरभरा पेरणीसाठी पिकास उत्तम असतो. ही वेळ साधण्यासाठी बियाण्याची उपलब्धता, पूर्वमशागतीच्या कामांचे नियोजन आधीच केले जाते. या वर्षीचे नियोजन 

  • या वर्षी पाऊस जास्त काळ राहिल्यामुळे मशागतीच्या कामांना उशीर झाला. जमिनीत ओलावा जास्त काळ राहिल्यामुळे वाफसा येण्यास विलंब झाला. जमिनीत वाफसा येताच पूर्वमशागतीची कामे करून घेतली.
  • पेरणी साधारण ३ नोव्हेंबरला सुरू करून ११ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात आली. पेरणीसाठी घरचे बियाणे वापरले.
  • हरभरा पिकामध्ये मर रोग, मूळकूज रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास रासायनिक बुरशीनाशकांनंतर ट्रायकोडर्मा आणि जिवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करतो.
  • टोकण पद्धतीने पेरणीसाठी साधारण २२ ते २५ किलो आणि पारंपरिक पद्धतीसाठी ३० किलो प्रतिएकर बियाणे लागले. त्यामुळे प्रामुख्याने पेरणीसाठी टोकण यंत्राचा वापर करतो. बियाण्याच्या आकारानुसार यंत्रामध्ये आवश्‍यक बदल केले जातात. यंत्रामुळे योग्य अंतरावर पेरणी होते आणि आंतरमशागतीचे कामे करणे सोपे होते. टोकणीमध्ये सामान्यपणे दोन ओळींत ३० सेंमी आणि दोन रोपांत १० सेंमी अंतर ठेवले आहे.
  • पुढील २० दिवसांचे नियोजन 

  • हरभरा लागवड करून एक महिना झाला आहे. सिंचनासाठी विहीर आणि बोअरवेलच्या पाण्याचा वापर केला जातो. सिंचनासाठी तुषार सिंचन आणि रेनगनचा वापर केला जातो. यामुळे पिकांस मोजके आणि आवश्‍यक तेवढेच पाणी देणे शक्य होते.
  • सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे पिकात मर रोगाचा तुरळक प्रमाणात प्रादुर्भाव दिसत आहे. त्यासाठी पुढील ३-४ दिवसांत फवारणीचे नियोजन आहे.
  • पीकवाढीच्या सुरुवातीच्या काळात तणनियंत्रणाकडे लक्ष द्यावे लागते. सद्यःस्थितीत निंदणीची कामे पूर्ण झाली आहेत. पुढील आठवड्यात कोळपणीचे नियोजन आहे.
  • - प्रफुल्ल सुलताने, ९७६४३३९२५१

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Nanded Crop Insurance : नांदेडमधील पीकविमा परतावा वितरणासाठी मुहूर्त ठरेणा

    Fish Farming : कृषी विभागातर्फे शेती, मत्स्यपालनाचे धडे

    Paddy Plantation : पावसामुळे मुरूड तालुक्यातील भात लावणीचे काम पूर्ण

    Crop Insurance Scheme : सांगली जिल्ह्यात ८१ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

    Banana Crop Insurance : केळीविमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य

    SCROLL FOR NEXT