There are various nutritional options for health. They should be included in the diet properly 
कृषी सल्ला

आहाराची पोषकता वाढविण्यासाठी प्रयत्न आवश्यक

सप्टेंबर महिना हा देशपातळीवर ‘राष्ट्रीय पोषण महिना’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत कुपोषणमुक्तीसाठी मोठी मोहीम राबविण्यात येत आहे. लोकांना पोषणाचे महत्त्व समजून देताना, पोषकता वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.

शुभांगी वाटाणे

सप्टेंबर महिना हा देशपातळीवर ‘राष्ट्रीय पोषण महिना’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत कुपोषणमुक्तीसाठी मोठी मोहीम राबविण्यात येत आहे. लोकांना पोषणाचे महत्त्व समजून देताना, पोषकता वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. वाढत्या धकाधकीच्या आणि प्रदूषणाच्या काळात स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देणे अवघड होत चालले आहे. जाता जाता खाता येणाऱ्या बेकरी उत्पादनांना व बिस्किटासारख्या पदार्थांचा वापर वाढला आहे. यातील मैद्यामुळे हे पदार्थ पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. केवळ चविष्ट म्हणजे आरोग्यासाठी चांगले असे होत नाही. अशा स्थितीमध्ये पोषक आणि सुरक्षित आहाराची निर्मिती आणि वापर याकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. आपला आहार कसा असावा हे समजून घेऊन कृतीत आणण्याची वेळ आलेली आहे. अन्न हे शरीराची वाढ होणे, झीज भरून काढणे, ऊर्जानिर्मिती, कार्यशक्ती अशा अनेक कारणांसाठी उपयोगी असते. आहार पोषणदृष्ट्या समतोल असणे गरजेचे आहे. त्यातून योग्य प्रमाणात कर्बोदके, प्रथिने, पाणी, जीवनसत्त्व व खनिज द्रव्ये यांचा आवश्यक तेवढा पुरवठा व्हायला हवा. कोणत्याही एकाच प्रकारच्या खाद्यपदार्थांतून शरीरासाठी आवश्यक त्या सर्व घटकांची पूर्तता होत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे घटक, भाज्या, फळे, मांस, मासे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांचे योग्य प्रमाण आहारात असेल याची खात्री करावी. शरीर, मेंदू आणि स्नायूंच्या योग्य वाढीसाठी संमिश्र व समतोल आहार घ्यावा. कुटुंब प्रमुखांसह स्वयंपाक करणाऱ्या महिलेने घरातील लहानांपासून वयस्करांपर्यंत सर्वांचा आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तशा प्रकारे नियोजन करावे. समतोल आहारासाठी आवश्यक सर्व अन्नगट

  • तृणधान्य व त्यांचे पदार्थ
  • डाळी व कडधान्य
  • दूध व मांस
  • फळे व भाज्या
  • साखर
  • इकडे लक्ष द्या...

  • आजारी व पचनसंस्था खराब असलेल्या व्यक्तींनी हलका परंतु पुरेसा आहार घेतलाच पाहिजे.
  • गर्भवती आणि स्तनदा मातेने दोन ते तीन विभागून भरपूर, संतुलित आणि पोषक आहार घ्यावा.
  • हिरव्या पालेभाज्या, फळे आणि सर्व प्रकारच्या भाज्यांचा भरपूर वापर करावा.
  • तेल व मांसाहारी अन्नपदार्थांचा आहारात मध्यम प्रमाणात वापर करावा.
  • वनस्पती तुपाचा वापर कमी प्रमाणात करावा.
  • मिठाचा वापर अतिरिक्त करू नये. खारवलेले पदार्थ उदा. लोणचे वगैरे प्रमाणातच खावे.
  • अन्न नेहमी स्वच्छ व सुरक्षित असावे.
  • पुरेसे पाणी प्यायला हवे. कार्बोनेटेड शीतपेयांचा वापर शक्यतो टाळावा.
  • अन्न तयार करताना...

  • भाज्या कापण्यापूर्वी धुऊन घ्याव्यात. कापल्यानंतर धुतल्यास त्यातील पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे आणि क्षार नष्ट होतात.
  • तांदूळ खूप चोळून धुऊ नयेत. खूप चोळून धुतल्यास ‘ब’ जीवनसत्त्व पाण्यात वाहून जाते. त्याऐवजी गढूळ झालेले पाणी काढून टाकावे.
  • पोळ्या किंवा भाकरी करण्यासाठी गहू किंवा ज्वारीचे पीठ शक्यतो न चाळताच वापरावे. यातील कोंड्यामुळे पचनसंस्था चांगली राहण्यास मदत होते.
  • अंकुरित धान्ये व आंबवलेले पदार्थ यांचा अन्न शिजवताना वापर करावा. यामुळे पोषणमूल्ये वाढतात. शिजविण्यासाठी वेळ कमी लागतो.
  • अन्न शिजवताना शक्यतो सोड्याचा वापर टाळावा. सोड्यामुळे ‘ब’ जीवनसत्त्वाचा नाश होतो. तेल जास्त शोषले जाऊन अन्न पचनास जड होते.
  • अन्न शिजविण्यासाठी लोखंडी तवा व कढईचा वापर केल्यास लोहाची उपलब्धता वाढते.
  • अन्न शिजवताना चिंच, कोकम यांचा वापर करावा. यामुळे जीवनसत्त्व ‘ब’ आणि ‘क’ मध्ये वाढ होते.
  • - शुभांगी वाटाणे, ९४०४० ७५३९७ (गृहविज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, वाशीम)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

    Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

    Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

    Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

    Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

    SCROLL FOR NEXT