सावलीसाठी नारळ रोपाच्या चारही दिशांना उंच वाढणारी केळी, पपई, एरंडी अगर गिरिपुष्प याची लागवड करावी. पावसाळा सुरू झाल्यानंतरच रोपांची लागवड करावी. आळ्यामध्ये आच्छादन करावे. नारळ रोप लागवडीनंतर काळजी घेणे महत्वाचे आहे. लागवड केल्यानंतर लगेच रोपांना आधार देणे आवश्यक आहे. त्यासाठी वाऱ्याची दिशा लक्षात घेऊन रोपाच्या उंचीपेक्षा थोड्या जास्त उंचीच्या दोन काठ्या रोपापासून ४५ सेंमीवर दक्षिणोत्तर बाजूवर पुराव्यात. त्याला एक अगर दोन काठया आडव्या वाऱ्याच्या विरूध्द दिशेला बांधाव्यात. त्याला रोप इंग्रजी आठ आकडयांच्या गाठीने सैलसर बांधावे. जेणेकरून रोप वायामुळे हलून त्याच्या मुळांना इजा होणार नाही. पहिली दोन वर्षे रोपांचे उन्हापासून संरक्षण करणे आवश्यक असते. त्यासाठी विणलेले झाप, झावळी, गवत, झाडाच्या फांद्या याची कृत्रिम सावली करावी. सावलीसाठी रोपाच्या चारही दिशांना उंच वाढणारी केळी, पपई, एरंडी अगर गिरीपुष्प याची लागवड करावी. पावसाळा सुरू झाल्यानंतरच रोपांची लागवड करावी. पहिलाच पावसात पाणी उपलब्ध आहे म्हणून लवकर लागवड करतात. परंतु पहिल्या पावसानंतर होणाऱ्या उघडिपीमुळे रोपांवर सूर्यप्रकाशामुळे इजा होण्यांचा संभव असतो. खत नियोजन
पाणी नियोजन
आच्छादन
पाऊस, ढगाळ वातावरणात बागेची काळजी सततच्या पडणाऱ्या पावसामुळे नारळ बागेत बराच वेळ पाणी साचून राहते. यामुळे झाडाच्या शरीरक्रिया मंदावतात,योग्य अन्नग्रहण करण्यात अडथळे निर्माण होतात. झावळ्या निस्तेज व निष्क्रिय होतात. नवीन झावळी व फुलोरा येण्यास उशिरा होतो. मादी फुलांचे परागीकरण झालेले असले तरी मादी फुले गळतात. उपाययोजना
- डॉ.व्ही.व्ही.शिंदे, ९५१८९४३३६३, (प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटये, जि.रत्नागिरी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.