कोळी किडीच्या प्रादुर्भावामुळे खराब झालेली फळे  
कृषी सल्ला

मोसंबी, संत्र्यांवरील कोळी किडीचे व्यवस्थापन

मोसंबी व संत्रा या लिंबूवर्गीय फळपिकांवर कोळी किडीच्या प्रादुर्भावात वाढ दिसून येत आहे. कोळी किडीचा प्रादुर्भाव वर्षभर असला तरी जून ते ऑगस्ट दरम्यान जास्त असतो. या किडीमुळे फळांचे नुकसान होऊन विकृत फळे तयार होतात.

योगेश मात्रे, डॉ. पी. आर. झंवर

मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद या जिल्ह्यात मोसंबीचे क्षेत्र अधिक असून, मोसंबीवर कोळी किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. परभणी जिल्ह्यात संत्रा बागांचे मोठे क्षेत्र असून, येथे संत्र्यांवर कोळी कीड दिसून येत आहे. अन्य जिल्ह्यातही लिंबूवर्गीय बागेमध्ये या किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून योग्य त्या उपाययोजना कराव्यात. मोसंबी व संत्रा या लिंबूवर्गीय फळपिकांवर कोळी किडीच्या प्रादुर्भावात वाढ दिसून येत आहे. कोळी किडीचा प्रादुर्भाव वर्षभर असला तरी जून ते ऑगस्ट दरम्यान जास्त असतो. या किडीमुळे फळांचे नुकसान होऊन विकृत फळे तयार होतात.  ओळख कोळी ही कीड अष्टपाद वर्गातील असून, आकाराने सूक्ष्म असते. साध्या डोळ्याने दिसणे कठीण जाते. पानांच्या शिराजवळ किंवा बरेचदा फळांच्या सालीवर बारीक खळग्यात ती अंडी घालते. प्रौढ लांबट, पिवळे असून, पिल्ले फिक्कट पिवळसर असतात. पिल्ले व प्रौढ कोळी आकाराचा फरक सोडल्यास सारखेच दिसतात. प्रादुर्भावाची लक्षणे कोळी कीड पाने व फळांचा पृष्ठभाग खरवडतात. त्यातून येणाऱ्या रस शोषतात. परिणामी, पानावर पांढूरके चट्टे पडतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास चट्ट्याचा भाग वाळतो. फळावरील नुकसान तीव्र स्वरुपाचे असते. खरचटलेल्या जागी पेशींची वाढ खुंटते. तपकिरी लालसर किंवा जांभळट रंगाचे चट्टे पडतात. याला शेतकरी ‘लाल्या’ म्हणून ओळखतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास अनियमित आकाराची फळे तयार होतात. आतील फोडींची वाढ बरोबर होत नाही. फळांची प्रत खालावते. व्यवस्थापन कोळी किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने मोसंबी, संत्रा या लिंबूवर्गीय पिकांच्या फळावर होतो. प्रादुर्भाव लवकर लक्षात न आल्यास प्रादुर्भावग्रस्त फळांचा रंग बदलतो. जून ते ऑगस्ट या काळात बागेची निरिक्षणे करून वेळीच उपाय करावेत.

  • पाण्याचा ताण पडू देऊ नये.
  • निंबोळी अर्क (५%) किंवा ॲझाडिरेक्टीन (१० हजार पीपीएम) ३ ते ५ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी.
  • रासायनिक नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी डायकोफॉल (१८.५ ईसी) २ मि.लि. किंवा विद्राव्य गंधक ३ ग्रॅम किंवा इथिऑन २ मि.लि.  
  • आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.
  • - योगेश मात्रे (पीएच. डी. विद्यार्थी ),   ७३८७५२१९५७,  डॉ. पी. आर. झंवर  (सहयोगी प्राध्यापक),   ७५८८१५१२४४,  (कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

    Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

    HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

    Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

    Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

    SCROLL FOR NEXT