Brown fruit rot control in citrus fruits 
कृषी सल्ला

लिंबूवर्गीय फळपिकांतील तपकिरी फळकूज नियंत्रण

सद्यःस्थितीत पावसाची रिमझिम, अपुरा सूर्यप्रकाश, थंड हवा, वाढलेली आर्द्रता, कमी तापमान यामुळे आंबिया बहराच्या संत्रा व मोसंबी फळांवर फायटोप्प्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यातून वाढणाऱ्या तपकिरी फळकुजीची लक्षणे जाणून वेळीच उपाययोजना कराव्यात.

डॉ. योगेश इंगळे, डॉ. दिनेश पैठणकर

सद्यःस्थितीत पावसाची रिमझिम, अपुरा सूर्यप्रकाश, थंड हवा, वाढलेली आर्द्रता, कमी तापमान यामुळे आंबिया बहराच्या संत्रा व मोसंबी फळांवर फायटोप्प्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यातून वाढणाऱ्या तपकिरी फळकुजीची लक्षणे जाणून वेळीच उपाययोजना कराव्यात. लक्षणे

  • पावसाळ्यात जमिनीलगतच्या फांद्यावरील पाने व फळांना फायटोप्थोरा या बुरशीचे संक्रमण सर्वप्रथम होते. यामुळे पाने टोकाकडून करपल्यासारखी व मलूल होतात. अशी पाने हातात घेऊन चुरा करण्याच्या प्रयत्न केल्यास घडी होते, मात्र पाने फाटत नाहीत. 
  • टोकाकडून झालेले संक्रमण पूर्ण पानावर पसरून पाने तपकिरी काळी होतात. नंतर अशी पाने गळून झाडाखाली त्यांचा खच पडतो. फांद्या पर्णविरहित होतात. झाड जणू खराट्यासारखे दिसते. पानावरील चट्टे संक्रमण रोपवाटिकेमधील कलमे आणि नुकत्याच लागवड केलेल्या कलमांवरसुद्धा दिसून पडतात. 
  • पानांवरील प्रादुर्भावानंतर जमिनीलगतची हिरव्या फळांवर तपकिरी किंवा करडे डाग दिसू लागतात. फळे एका बाजूने करपण्यास सुरुवात होते. पूर्ण फळ हे तपकिरी काळ्या रंगाचे होते. फळे सडून गळतात.  
  • अधिक आर्द्रता असल्यास फळांवर पांढरकी तंतुमय बुरशीची वाढ दिसून येते. 
  • फळे खाली पडल्यानंतर फळांच्या पृष्ठभागावर पांढ‍ऱ्या बुरशीची वाढ दिसून येते. तोडणीवेळी करड्या रंगाची फळे निरोगी फळात मिसळल्यास निरोगी फळेही सडतात.
  • व्यवस्थापन

  • सर्वप्रथम खाली पडलेल्या पानांची व फळांची विल्हेवाट लावावी. ती शेतात तशीच राहू देऊ नयेत. अन्यथा, या रोगाची तीव्रता वाढते. वाफा स्वच्छ ठेवावा.
  • बागेच्या उताराच्या बाजूने शेतातील पाणी बाहेर काढावे. पाणी साठून राहणाऱ्या भागात फायटोफ्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव अधिक होतो.
  • फायटोफ्थोरा बुरशी किंवा फळावरील तपकिरी कूज (ब्राऊन रॉट)मुळे होणारी फळगळ व्यवस्थापनासाठी संपूर्ण झाडावर फवारणी करावी. 
  • प्रति लिटर पाणी फोसेटिल एएल* २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्ल्यूपी)* ३ ग्रॅम.  (* लेबल क्लेम नाही, ॲग्रेस्को शिफारस.) चांगले परिणाम मिळण्यासाठी या बुरशीनाशकांमध्ये अन्य कोणतीही रसायने (बुरशीनाशक/कीटकनाशक/विद्राव्य खते) मिसळू नयेत.  फवारणी करतेवेळी वाफ्यावरही द्रावणाची फवारणी करत पुढे जावे. - डॉ. योगेश इंगळे,  ९४२२७६६४३७ डॉ. दिनेश पैठणकर,  ९८८१०२१२२२ (अखिल भारतीय समन्वीत संशोधन प्रकल्प (फळे), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

    Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

    Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

    Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

    Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

    SCROLL FOR NEXT