Availability of fuel depletion due to improved biogas
Availability of fuel depletion due to improved biogas 
कृषी सल्ला

सुधारित बायोगॅसमुळे इंधन अन् खताची उपलब्धता

डॉ. सुरेंद्र काळबांडे

सामान्य रचना असलेल्या संयंत्राच्या तुलनेत ताज्या ओल्या शेणापासून स्थिर घुमटाच्या संयंत्रातून ३० टक्क्यांपेक्षा जास्त जैववायूचे उत्पादन होते. सुधारित बायोगॅस संयंत्राच्या कार्यकुशलतेचे परीक्षण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. अपारंपरिक ऊर्जा स्रोत मंत्रालयातर्फे जैववायू विकासासाठी जैववायू संयंत्राची उभारणी सुरू आहे. यामध्ये विविध आकाराच्या संयंत्रांची उभारणी केली जाते.यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारे वर्गीकरण करण्यात आले आहे. यामध्ये तरंगते वायुपात्र असलेले (केव्हिआयसी) आणि स्थिर घुमट असलेले (जनता किंवा दीनबंधू) संयंत्र आहे. कौटुंबिक पद्धतीच्या जैववायू संयंत्रामध्ये जनावरांच्या शेणाचा वापर करतात. जनावरांचे शेण व पाणी समप्रमाणात घेऊन त्याचे मिश्रण करून संयंत्रात टाकतात. पाचन झालेले शेण संयंत्रामधून मळी म्हणून पाण्याइतक्या पातळ रूपात बाहेर येते. ही मळी ४५ दिवस मोकळ्या खड्ड्यात सुकविली जाते. त्यांनतर खत म्हणून त्याचा वापर केला जातो. परंतु बऱ्याचशा भागात उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईमुळे बरेचसे सयंत्र अकार्यक्षम राहतात. त्यामुळे जैववायू तंत्रज्ञान देशात पाणी टंचाईग्रस्त भागात स्वीकारलेले नाही. स्थिर घुमट असलेले जनता प्रकारच्या कौटुंबिक आकाराच्या बायोगॅस संयंत्राच्या रचनेमध्ये ओले शेण पाचन करण्याबाबतचे संशोधन झाले. सुधारित बायोगॅस संयंत्राच्या कार्यकुशलतेचे परीक्षण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. सुधारित जैववायू संयंत्र 

  •  स्थिर घुमट असलेले जनता तसेच दीनबंधू संयंत्राच्या सध्याच्या रचनेत प्रवेश मार्ग आणि निकासमार्ग हे जनावरांचे ताजे ओले शेण भरण्यास योग्य व्हावे व पाचीत मळी बाहेर येण्यासाठी संशोधन करण्यात आले. यासाठी पाचक यंत्राच्या रचनेत तसेच निर्माण साहित्य बांधकाम पद्धतीमध्ये थोडेफार बदल केले आहेत.
  •  सामान्य रचना असलेल्या संयंत्राच्या तुलनेत ताज्या ओल्या शेणापासून स्थिर घुमटाच्या संयंत्रातून ३० टक्क्यांपेक्षा जास्त जैववायूचे उत्पादन होते.
  •  सुधारित संयंत्राचा धारणाकाळ सामान्य संयंत्रापेक्षा जास्त असल्यामुळे जैववायूमध्ये वाढ झाली.
  • मिश्रणाकरिता शेणासोबत पाण्याची समप्रमाणात आवश्यकता नाही. कमीत कमी पाणी लागते. त्यामुळे ताजे ओले घनरूप शेण सहजतेने संयंत्रात भरता येते.
  •  सुधारित संयंत्रातून निघणारी मळी (स्लरी) ही एक आठवड्यामध्ये वाळते. त्यामुळे शेतात वाहून नेण्यासाठी कमी जागा व कष्ट लागतात.
  •  बांधकामाचा खर्च हा सामान्य रचना असलेल्या संयंत्राइतकाच आहे.
  • सुधारित संयंत्राच्या प्रवेश पाइपचा कोन ठरवून दिलेल्या (७५ अंश) मापापेक्षा कमी नसावा. कोन कमी झाल्यास जनावरांच्या शेणाचा प्रवेश मार्गातील प्रवाह हळू होईल. सुधारित संयंत्राच्या निर्मितीकरिता अनुभवी आणि कुशल कारागिरांची निवड करावी.
  • केंद्राने दोन घनमीटर क्षमतेचे बायोगॅस संयंत्र विविध गावांमध्ये बसविलेले आहे. शेण, कचरा, कुजलेला पालापाचोळा, सडलेले अन्न, मानवी विष्ठा आणि पाण्याचे मिश्रण यापासून बायोगॅस संयंत्रात मिथेन वायू तयार केला जातो. बायोगॅस संयंत्रात तयार झालेल्या जैववायूवर सहजरीत्या दैनंदिन स्वयंपाक करता येतो, याशिवाय वीजनिर्मितीसुद्धा होते. त्यामुळेच गॅस सिलिंडर आणि रॉकेलला बायोगॅस सक्षम पर्याय आहे.
  • सुधारित संयंत्राचे फायदे 

  •  ३० टक्के जादा जैववायू (बायोगॅस) निर्माण होतो.
  •  शेण व पाणी यांचे मिश्रण समप्रमाणात असणे आवश्यक नाही.
  •  ताजे घनरूप शेण वापरता येत असल्यामुळे सयंत्र भरणे सोपे झाले.
  •  मळी लवकर वाळते. त्यामुळे वाहतुकीचा त्रास नाही.
  •  बांधकामाचा खर्च सामान्य रचनेच्या संयंत्राएवढाच येतो.
  • संयंत्राची घ्यावयाची काळजी 

  •  ओले घनरूप शेण संयंत्राच्या क्षमतेनुसार दररोज टाकावे.
  •  शेण ओले असणे आवश्यक आहे.
  •  मळी दररोज बाहेर काढावी.
  • संपर्क ः डॉ. सुरेंद्र काळबांडे, ९४०५८८०९७६ (विभाग प्रमुख, अपारंपरिक ऊर्जा स्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

    Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    SCROLL FOR NEXT