Broad Bed Furrow for Kharif Onion
साधारणपणे मे-जून महिन्यात बी पेरून जुलै-ऑगस्ट महिन्यात कांदा रोपांची लागवड करावी. हा कांदा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात काढणीस तयार होतो. खरीप हंगामात अधिक उत्पादन घेण्यासाठी शिफारशीत जाती, सुधारित तंत्राचा वापर करावा.कांद्याची मुळे २५ सेंमी खोलीपर्यंत वाढतात. मुळांभोवती योग्य प्रमाणात ओलावा आणि हवा असेल तर मुळांची वाढ चांगली होते. उत्तम निचऱ्याची हलकी ते मध्यम भारी जमीन लागते. हलक्या मुरमाड जमिनीत सेंद्रिय खतांचा पुरवठा चांगला असेल तर उत्पादन चांगले येते. भारी जमिनीत पाण्याचा निचरा चांगला होत नाही. अशा जमिनीत खरीप कांद्याची लागवड करू नये. जमिनीचा सामू ६.५ ते ७.० दरम्यान असावा. चोपण, क्षारयुक्त जमिनीत कांदा चांगला पोसत नाही. मे-जून महिन्यात बी पेरून जुलै-ऑगस्ट महिन्यात कांदा रोपांची लागवड केली जाते. हा कांदा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात काढणीस तयार होतो. जाती भीमा डार्क रेड
लागवडीनंतर १०० ते ११० दिवसांत काढणी.सरासरी उत्पादन हेक्टरी २२ ते २४ टन.साठवणुकीत दोन महिन्यांपर्यंत टिकतो.लागवडीनंतर १०० ते १०५ दिवसांत काढणी.सरासरी उत्पादन हेक्टरी २० ते २५ टन.जास्तीत जास्त कांदे एका डोळ्याचे असतात.सरासरी उत्पादन हेक्टरी २० ते २२ टन.लागवडीनंतर१०५ ते ११० दिवसांत काढणी.सरासरी उत्पादन हेक्टरी २४ ते २६ टन.कांदे गोलाकार, परंतु थोडे चपटे असतात.कांद्याचा रंग जांभळट लाल आणि चवीला तिखट.कांदे गोलाकार आणि शेंड्याकडे थोडे निमुळते असतात.रंग आकर्षक लाल असून डेंगळे आणि जोड कांदे यांचे प्रमाण कमी.लागवडीपासून १०० ते ११० दिवसांत काढणी.उत्पादन हेक्टरी २५ टन.खरीप व रांगडा हंगामात लागवडीसाठी शिफारस.कांद्याचा रंग गडद लाल, आकाराने गोलाकार आणि पातळ मान.लागवडीनंतर ९० दिवसांनी काढणी.उत्पादन हेक्टरी २० ते २५ टन.एक हेक्टर लागवडीसाठी ६ ते ७ किलो बी पुरेसे होते.पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणास २ ते ३ ग्रॅम थायरम, कॅप्टन किंवा कार्बेन्डाझिम हे बुरशीनाशक चोळावे.पेरणीपूर्वी ५०० किलो शेणखतासोबत १.२५ किलो ट्रायकोडर्मा व्हिरिडी वापरून जमिनीत मिसळावे.एक हेक्टर कांदा लागवडीसाठी १० ते १२ गुंठे क्षेत्रावर मे-जून महिन्यात बी पेरून रोपवाटिका तयार करावी.रोपवाटिकेत ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धती वापरण्यासाठी जमिनीपासून १५ सेंमी उंच, १.२ मीटर रुंद आणि गरजेनुसार लांब गादीवाफे तयार करावेत. त्यामुळे रोपांची वाढ एकसारखी होते. पाणी फार काळ साचून राहत नाही, त्यामुळे रोपे कुजत किंवा सडत नाहीत. तसेच लावणीच्या वेळी रोपे सहज उपटून काढता येतात. रोपांच्या गाठी जाड व लवकर तयार होतात.वाफे तयार करताना प्रत्येक वाफ्यात २ घमेले चांगले कुजलेले शेणखत आणि २:१:१ किलो नत्र:स्फुरद:पालाश खते द्यावीत. पेरणीनंतर २० दिवसांनी १ किलो नत्र टाकावे.रुंदीशी समांतर ५ सेंमी अंतरावर रेघा पाडून १ ते १.५ सेंमी खोलवर बियाणे पेरावे. पेरणीनंतर झारीने पाणी द्यावे.अति उष्णतेमुळे बियांची उगवण व रोपांची वाढीवर अनिष्ट परिणाम होऊ नये, यासाठी वाफ्यावर दुपारच्या वेळी सावली राहील अशी सोय करावी.तणनियंत्रणासाठी रोपे उगवण्यापूर्वी पेंडीमिथॅलीन २ मिलि प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.फुलकिड्यांचा प्रादुर्भाव जास्त आढळल्यास, फिप्रोनील १ मिलि किंवा प्रोफेनोफॉस १ मिलि किंवा कार्बोसल्फॉन २ मिलि प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.मररोगाच्या नियंत्रणासाठी, मेटॅलॅक्झिल (संयुक्त बुरशीनाशक) व मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात द्रावण करून रोपांच्या ओळीत ओतावे.तपकिरी रोगाच्या नियंत्रणासाठी, मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा ट्रायसायक्लॅझोल किंवा हेक्झाकोनॅझोल १ मिलि या प्रमाणात पानांवर फवारणी करावी.खरिपात रोपे ४० ते ४५ दिवसांत तयार होतात. रोप उपटण्याच्या २ ते ३ दिवस आधी थोड्या प्रमाणात पाणी द्यावे. पानांचा शेंड्याकडील एक तृतीयांश भाग कापून काढावा.काळा करपा, तपकिरी करपा, मर रोग या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्याकरिता रोपांची मुळे कार्बोसल्फॉन २ मिलि व कार्बेन्डाझीम १ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यामध्ये मिसळून त्यामध्ये २ तास बुडवून नंतरच लागवड करावी.पुनर्लागणीपूर्वी किंवा पुनर्लागणीच्या वेळी ऑक्सिफ्लोरफेन १.५ मिलि किंवा पेंडीमेथॅलीन ३ मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणात तणनाशकांचा वापर करावा.दोन ओळींमध्ये १५ सेंमी व दोन रोपांमध्ये १० सेंमी अंतर ठेवून १२० सेंमी रुंद, ४० ते ६० मीटर लांब व १५ सेंमी उंच गादीवाफ्यांवर रोपांची पुनर्लागण करावी.पिकांस हेक्टरी नत्र ११० किलो, स्फुरद ५० किलो, पालाश ५० किलो आणि गंधक ४० किलो देण्याची आवश्यकता असते.रोपांच्या पुनर्लागणीच्या वेळी स्फुरद, पालाश व गंधक यांच्या पूर्ण मात्रा आणि ४० किलो नत्र द्यावे. उर्वरित नत्राच्या मात्रा दोन समान हप्त्यांत पुनर्लागणीनंतर ३० आणि ४० दिवसांनी द्याव्यात.ठिबक सिंचन पद्धती वापरली असल्यास, पुनर्लागणीच्या वेळी ४० किलो नत्र द्यावे. उर्वरित नत्र सहा हप्त्यांत विभागून ठिबक सिंचनाद्वारे दहा दिवसांच्या अंतराने ६० दिवसांपर्यंत द्यावे.अझोस्पिरिलम आणि स्फुरद विरघळणारे जिवाणू प्रत्येकी ५ किलो प्रति हेक्टर या प्रमाणात अजैविक खतांसोबत देण्याची शिफारस आहे.सूक्ष्म द्रव्ये जमिनीतून द्यायची असल्यास, लागवडीनंतर ३० ते ४५ दिवसापर्यंत द्यावीत. फवारणीद्वारे देताना ४५ दिवसांनी आणि ६० दिवसांनी द्यावीत.रोपांची चांगली वाढ होण्याकरिता पुनर्लागणीच्या वेळी व पुनर्लागणीच्या तीन दिवसांनी पाणी द्यावे. पिकाच्या वाढीबरोबर पाण्याची गरज वाढते.पीकवाढीच्या अवस्था, जमिनीचा मगदूर या गोष्टींवर पाण्याचे प्रमाण अवलंबून असते. साधारणपणे १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी देत राहावे. कांद्यांची वाढ पूर्ण होऊन पाने पिवळी पडून माना पडू लागल्याबरोबर काढणीपूर्वी १५ ते २० दिवस आधी पाणी देणे बंद करावे. त्यामुळे कांदा पक्व होण्यास मदत होते. पाणी देण्याच्या ठिबक सिंचन पद्धतीमध्ये पाण्याची बचत कांद्यांची एकसमान वाढ मजुरीच्या खर्चात कपात, रोपांची चांगली रुजवण असे अनेक फायदे आढळून येतात. कीड व रोग व्यवस्थापन काळा करपा
सततच्या पावसामुळे कांदा पिकामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.प्रादुर्भाव टाळण्यासाठी पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी. नियंत्रण ः (फवारणी ः प्रति लिटर पाणी)
कार्बेन्डाझिम २ ग्रॅम.गरजेनुसार पुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतरानेमॅन्कोझेब २.५ ग्रॅम अधिक फिप्रोनील १ मिलि किंवा हेक्साकोनॅझोल अधिक प्रोफेनोफॉस १ मिलि या प्रमाणे करावी. (टीप : लेखातील कीटकनाशके, बुरशीनाशके आणि तणनाशकांना कांदा व लसूण संशोधन संचनालयामार्फत शिफारस करण्यात आली आहे.) - डॉ राजीव काळे, ९५२१६७८५८७ (शास्रज्ञ, कांदा व लसूण संशोधन संचनालय, राजगुरुनगर, जि. पुणे)