वेळेवर पेरणीसाठी ऑक्टोंबरचा दुसरा आठवडा, तर संरक्षित ओलिताची सोय असल्यास दहा नोव्हेंबरपर्यंत हरभऱ्याची पेरणी करता येते. अपवादात्मक स्थितीत बीटी कपाशीचे शेत खाली झाल्यानंतर डिसेंबर अखेरपर्यंतही काही शेतकरी हरभऱ्याची ओलिताखाली पेरणी करताना आढळतात. या हंगामात पावसाळा लांबल्यामुळे कोरडवाहू हरभरा पिकाची लागवडीसाठी फायदा होऊ शकतो. हरभरा रब्बी हंगामातील महत्त्वाचे कडधान्य पीक आहे. खरिपातील कमी कालावधीच्या पिकांची काढणी झाल्यानंतर कोरडवाहू परिस्थितीत अथवा संरक्षित ओलिताची सोय असल्यास ओलिताखाली हरभऱ्याची लागवड केली जाते. या हंगामात सातत्याने आलेल्या पावसामुळे रब्बी पिकांच्या पेरण्या लांबल्या आहेत. सध्या मुबलक ओलावा असल्यामुळे कोरडवाहू स्थितीतही हरभरा पिकाची पेरणी करू शकतात. वेळेवर पेरणीसाठी ऑक्टोंबरचा दुसरा आठवडा, तर संरक्षित ओलिताची सोय असल्यास दहा नोव्हेंबरपर्यंत हरभऱ्याची पेरणी करता येते. अपवादात्मक स्थितीत बीटी कपाशीचे शेत खाली झाल्यानंतर डिसेंबर अखेरपर्यंतही काही शेतकरी हरभऱ्याची ओलिताखाली पेरणी करताना आढळतात. या हंगामात पावसाळा लांबल्यामुळे कोरडवाहू हरभरा पिकाची लागवडीसाठी फायदा होऊ शकतो. कोरडवाहू तसेच ओलिताखालील हरभरा पेरणीसाठी देशी (सुधारित) वाण : विजय, दिग्विजय, राजविजय-२०२, राजविजय-२०३, जाकी, डॉलर, साकी, आयसीसीव्ही-१०, पीकेव्ही कांचन (एकेजी -११०९), फुले विक्रम, बीडीएनजी-७९७ (आकाश), फुले विक्रांत. ओलिताखालील काबुली हरभऱ्याचे टपोऱ्या दाण्याचे वाण विराट, आयसीसीव्ही-२ (श्वेता), पीकेव्ही काक-२, पीकेव्ही काबुली-४, फुले कृपा, बीडीएनके-७९८. हिरव्या रंगाचे बियाण्याचे टरफल असलेले वाण पीकेव्ही हरिता (एकेजी-९३०३-१२), हिरवा चाफा, एकेजीएस-१ गुलाबी रंगाचे बियाण्याचे टरफल असलेले मध्यम टपोऱ्या दाण्याचे वाण गुलक -१ व डी-८. देशी (सुधारित) हरभरा वाणांसाठी पेरणीचे अंतर ३० सें.मी. x १० सें.मी. एवढे राखावे. बियाण्याच्या आकारानुसार एकरी ३०-४० किलो बियाण्याचा वापर पेरणीसाठी करावा. याद्वारे एकरी दीड लाखपर्यंत झाडांची संख्या राखण्यास मदत होते. काबुली हरभरा वाणांसाठी पेरणीचे अंतर ४५ सें.मी. x १० सें.मी.एवढे राखावे. बियाण्याच्या आकारानुसार एकरी ४०-५० किलो बियाण्याचा वापर पेरणीसाठी करावा. याद्वारे एकरी एक लाखपर्यंत झाडांची संख्या राखण्यास मदत होते. हरभरा पिकाचे काही नवीन वाण हे अधिक उत्पादनक्षम आहेत. या वाणांसाठी संरक्षित ओलिताची सोय असल्यास पेरणीचे दोन ओळीतील अंतर दोन ते सव्वा दोन फुटांपर्यंत वाढवून दोन झाडातील अंतर सारखेच ठेवून (१० सेंमी) ठेवल्यास उत्पादकतेत शाश्वत व हमखास वाढ शक्य होते. या पद्धतीमुळे बियाणे व खर्चात बचत साध्य होते. हरभऱ्यासाठी सुधारित पेरणी पद्धती बीबीएफ प्लँटरने पेरणी सोयाबीन पेरणीसाठी वापरले जाणारे बीबीएफ प्लँटर हरभरा पेरणीसाठीही वापरता येते. याद्वारे पेरणी करतानाच प्रत्येक ४ ओळीनंतर दोन्ही बाजूला सऱ्या पडतात. तुषारसंचाद्वारे किंवा सरीद्वारेही पाणी देणे सोईचे होते. रब्बी हंगामात येणाऱ्या अवकाळी पावसापासूनही पिकाचे नुकसान टाळता येते. यामध्ये प्रत्येक पाचवी ओळ खाली राखल्यामुळे बियाण्याचे प्रमाण व बियाणे खर्च, तसेच रासायनिक खत मात्रा व खत खर्चात २० टक्के बचत शक्य होते. ट्रॅक्टरचलित पेरणीयंत्राद्वारे पट्टा पेर सहा अथवा सात ओळी पट्टापेर सोयाबीन प्रमाणेच हरभऱ्यातही पट्टापेर पद्धती उपयुक्त सिद्ध झाली आहे. हरभरा पेरणीसाठी वापरले जाणारे ट्रॅक्टरचलित पेरणीयंत्र सहा दात्यांचे असते. ट्रॅक्टरने पेरणी करताना प्रत्येक वेळी ट्रॅक्टर पलटून येताना व जाताना सातवी ओळ खाली ठेवावी. यामुळे शेतात सहा - सहा ओळीच्या पट्ट्यात पेरणी होते. प्रत्येक सातवी ओळ खाली राहते. बियाणे, रासायनिक खते व खर्चात सुमारे १५ टक्के बचत होते. चार ओळी पट्टा पेर ट्रॅक्टरचलित सहा दात्याच्या पेरणी यंत्राचे दोन्ही काठावरील प्रत्येकी एक छिद्र बोळा कोंबून बंद करावे. यामुळे पेरणीवेळी आपोआपच काठावरील ओळी खाली राहतील. पेरणी करतेवेळी ट्रॅक्टर पलटून येताना व जाताना खाली ठेवलेल्या ओळीतच पेरणी यंत्राचे शेवटचे दाते ठेवावे. आपोआपच प्रत्येक चार ओळीनंतर पाचवी ओळ रिकामी राहते. तिथे हलकी सरी तयार होते. या पद्धतीत बियाणे, रासायनिक खते व खर्चात २० टक्के बचत शक्य होते. या पद्धतीत बीबीएफ पेरणी यंत्राप्रमाणेच पेरणी शक्य होते. ट्रॅक्टर चलित सात दाती पेरणी यंत्र
लहान ट्रॅक्टर व चार किंवा पाच दाती पेरणी यंत्राने पेरणी
छोट्या ट्रॅक्टर व पाच दाती पेरणी यंत्राने पेरणी पाच दाती पेरणी यंत्राने पेरणी करताना बियाणे व खत कप्प्यातील मधील म्हणजेच तीन नंबरचे छिद्र बंद करावे. पेरणी करताना प्रत्येकवेळी ट्रॅक्टर पलटून येताना व जाताना पेरणीच्या दोन ओळीतील अंतरानुसार एक ओळ खाली सुटेल इतकी जागा मोकळी ठेवावी. त्यातून जोडओळ पद्धतीने पेरणी शक्य होते. यामुळे बियाणे, रासायनिक खत व खर्चात किमान ३३ टक्क्यांपर्यंत बचत शक्य होते. मजुरांद्वारे टोकणीने जोड ओळ
फायदे बीबीएफ प्लँटर अथवा ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राने पट्टापेर अथवा जोड ओळ पेरणी पद्धतीने पेरणी केल्यास हरभरा पिकाला पुढील प्रमाणे फायदे मिळतात.
- जितेंद्र दुर्गे, (सहयोगी प्राध्यापक), ९४०३३०६०६७ (कृषी विद्या विभाग, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.