संवर्धित शेतीमध्ये आंतरपीक पद्धतीचा अवलंब फायदेशीर दिसून आला आहे. 
कृषी सल्ला

संवर्धित शेतीची सूत्रे

जमिनीची उत्पादकता प्रामुख्याने अजैविक कारणामुळे कमी होत आहे. याची प्रमुख कारणे म्हणजे जमिनीचा अधिक वापर, सेंद्रिय खतांचा अभाव, रासायनिक खतांचा असंतुलित वापर. यासाठी संवर्धित शेती पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरणार आहे.

डॉ. गोरक्ष वाकचौरे, प्रशांत भोसले

जमिनीची उत्पादकता प्रामुख्याने अजैविक कारणामुळे कमी होत आहे. याची प्रमुख कारणे म्हणजे जमिनीचा अधिक वापर, सेंद्रिय खतांचा अभाव, रासायनिक खतांचा असंतुलित वापर. यासाठी संवर्धित शेती पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरणार आहे. संवर्धित शेती ही कृषी प्रणाली कायमस्वरूपी जमिनीच्या देखभालीस उपयुक्त ठरते. वाढत्या लोकसंख्येसाठी अन्न सुरक्षा, नैसर्गिक संसाधन टिकविणे, पारंपरिक शेतीमुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम कमी करणे, हवामानातील बदल, शेती करण्यासाठी लागणाऱ्या साधनसामग्रीची वाढती किंमत आणि अन्नद्रव्यांच्या अस्थिर किमती यामुळे पारंपरिक शेती जिकिरीची होत आहे. यावर प्रभावी उपाय म्हणून संवर्धित शेतीकडे पहिले जाते. अलीकडील काळात जमिनीच्या आरोग्याकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. जमिनीची उत्पादकता प्रामुख्याने अजैविक कारणामुळे कमी होत आहे. याची प्रमुख कारणे म्हणजे जमिनीचा अधिक वापर, सेंद्रिय खतांचा अभाव, रासायनिक खतांचा असंतुलित वापर. संवर्धित शेतीची तत्त्वे  कमीत कमी मशागत 

  •  जेथे बियाणे व खते पेरणार आहोत तेथेच मशागत.
  •  जमिनीच्या संरचनेची हानी कमी करणे.
  •  पाणी झिरपण्याचा वेग वाढवणे.
  •  सेंद्रिय कर्ब ज्वलनाचा दर कमी करून जमिनीतील प्रमाण वाढवणे.
  •  जमिनीतील उपयुक्त घटकांना कमीत कमी व्यत्यय करणे.
  • कमीत कमी मशागतीमुळे वेळ, पैसा आणि परिश्रम वाचतात.
  • जमीन आच्छादनाचे तत्त्व 

  • पावसाच्या थेंबाचा थेट परिणाम आणि मातीची धूप कमी करण्यात मदत.
  • अधिकाधिक पाणी जमिनीत मुरण्यास मदत.
  • - बाष्पीभवनाचा वेग कमी करून पाण्याची बचत.
  • सेंद्रिय आच्छादनामुळे जमिनीतील सजीवांना फायदेशीर वातावरण, जैविक मशागतीला मदत.
  • गवताची वाढ खुंटते. जमिनीचे तापमान नियंत्रित राहते.
  • मिश्र आणि फिरत्या पिकांचे तत्त्व 

  • नत्र स्थिरीकरण शेंगवर्गीय पिकांद्वारे जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढते, परिणामी जमिनीचा कस भरून निघतो.
  • जमिनीतील अन्नद्रव्यांचा वापर पिके अधिक सक्षमरीत्या करतात.
  • नवनवीन पिकांमुळे तण, रोग आणि किडींचे प्रमाण कमी राखण्यात मदत.
  • दुष्काळ तसेच कीड, रोगांच्या प्रादुर्भावामध्ये पिके वाया जाण्याचा धोका कमी.
  • संवर्धित शेतीसाठी महत्त्वाचे घटक  वेळेवर अंमलबजावणी

  •  पावसाच्या अगोदर जमिनीचे योग्य नियोजन.
  •  योग्य प्रमाणात पाऊस झाल्यानंतर लागवड.
  • योग्य अंतराने खुरपणी.
  • प्रभावी पद्धतीने रोग व किडींचे नियंत्रण.
  • अचूक व्यवस्थापन सर्व व्यवस्थापन वेळेत करावे. शेतामधील रोजची कामे वेळेत करावीत. निविष्ठांचा कार्यक्षम वापर जास्तीत जास्त उपयोग फक्त पिकांना होईल, अशा प्रकारे निविष्ठांचा वापर करावा. यामुळे जास्त उत्पादन येऊन खर्च कमी होतो. संवर्धित शेती व पारंपरिक शेती यामधील फरक 

    पारंपरिक शेती संवर्धित शेती
    निसर्गावर प्रभुत्व मिळवण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करून शेती. नैसर्गिक प्रक्रियेत कमीत कमी हस्तक्षेप.
    अत्याधुनिक यंत्रांद्वारे जमीन नांगरली जाऊन मातीची धूप जास्त होते. जमीन जैविकरीत्या नांगरली जाऊन मातीची धूप होत नाही.
    पिकांचे अवशेष जाळले किंवा काढले जातात. पिकांच्या अवशेषांचा वापर आच्छादनासाठी केला जातो.
    पाण्याचा अतिरिक्त वापर. पाण्याचा योग्य व कार्यक्षम वापर.
     तणांचा प्रादुर्भाव जास्त. तणांचा प्रादुर्भाव कमी.
     मातीचा कठीणपणा जास्त. माती पिकांसाठी उपयुक्त.
     व्यवस्थापनासाठी मजुरांची संख्या जास्त मजुरांची संख्या कमी लागते.
    उत्पादन क्षमता कमी. उत्पादन क्षमता जास्त.
     पर्यावरणास अनुकूल नाही. पर्यावरणास अनुकूल आहे.

      संपर्क : डॉ. गोरक्ष वाकचौरे, ७३५०९१६९८५ प्रशांत भोसले, ८१४९२३०६३० (राष्ट्रीय अजैविक ताण संशोधन संस्था, माळेगाव (खुर्द), बारामती, जि. पुणे)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Ladki Bahin : ‘लाडकी बहीण’मुळे वित्तीय तूट नाही

    Onion Rate Crash : कांद्याचे ट्रॅक्टर थेट कार्यालयासमोर आणून निषेध

    Traditional Fisherman : पांरपरिक मच्छीमारांची मालवण येथील कार्यालयावर धडक

    Wild Vegetables : गावागावांत रानभाजी महोत्सव व्हावा : पाटील

    Crop Loan : बँकांनी सर्व कर्जाचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत पूर्ण करावे

    SCROLL FOR NEXT