मिरचीच्या पिकावर तुडतुड्यांचा झालेला प्रादुर्भाव. 
कृषी सल्ला

मराठवाडा विभाग कृषी सल्ला (कापूस. रब्बी ज्वारी, तूर, गहू, केळी, पालेभाज्या पिके)

मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार परभणी जिल्ह्यात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ ते ढगाळ राहील.

डॉ. कैलास डाखोरे

मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार परभणी जिल्ह्यात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ ते ढगाळ राहील. कापूस

  • वेचणी अवस्था
  • कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये.
  • कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पऱ्हाट्या जमा करून त्यांची योग्य ती विल्हेवाट लावावी.
  • तूर

  • काढणी अवस्था
  • वेळेवर पेरणी केलेल्या तूर पिकाची काढणी व मळणी करून घ्यावी.
  • रब्बी ज्वारी

  • दाणे भरणे अवस्था
  • रब्बी ज्वारी पीक फुलोरा ते दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. या संवेदन काळात उपलब्धता असल्यास एक पाणी द्यावे.
  • रब्बी ज्वारी पिकावर मावा कीडीचा व अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडीच्या व्यवस्थापनासाठी, (फवारणी प्रति लिटर पाणी) डायमेथोएट (३० टक्के ईसी) १.३ मि.लि.
  • लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास, नियंत्रणासाठी (फवारणी प्रति लिटर पाणी) थायामेथोक्झाम (१२.६ टक्के) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (९.५ झेडसी) (संयुक्त कीडनाशक) ०.५ मि.लि. किंवा स्पिनेटोरम (११.७ एस.सी.) ०.४ मि.लि.
  • गहू

  • निसवणी ते दाणे भरणे अवस्था
  • या अवस्थेत गहू पिकात उंदरांमुळे मोठे नुकसान होते. उंदरांचा प्रादुर्भाव दिसून आल्‍यास त्यांच्‍या नियंत्रणासाठी, झिंक फॉस्‍फाइड १ भाग अधिक गूळ १ भाग अधिक ५० भाग गव्‍हाचा भरडा व थोडेसे गोडतेल मिसळून त्याचे छोटे गोळे करावेत. हे गोळे उंदराच्‍या छिद्रांमध्ये टाकून ती बंद करावीत.
  • केळी

  • फळ लागणे अवस्था
  • मृग बाग लागवड केलेल्या केळी बागेत सिगाटोका रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. त्याच्या व्यवस्थापनासाठी, (फवारणी प्रति लिटर पाणी) प्रोपीकोनॅझोल १ मि.लि. अधिक स्टिकर १ मि.लि.
  • केळी बागेत फळाची प्रत चांगली राहण्यासाठी केळीचे घड झाकून घ्यावेत.
  • भाजीपाला

  • वाढीची अवस्था
  • मध्यंतरी बराच काळ ढगाळ वातावरण राहिल्यामुळे मिरची पिकात भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. रोगाचा प्रादुर्भाव असल्यास व्यवस्थापनासाठी, (फवारणी प्रति लिटर पाणी) मायक्लोब्युटॅनिल (१० टक्के डब्ल्यूपी) १ ग्रॅम
  • मिरची पिकात रसशोषक किडींचा (विशेषतः मावा, तुडतुडे) प्रादुर्भाव दिसून येत असल्यास, त्याच्या व्यवस्थापनासाठी (फवारणी प्रति लिटर पाणी) पायरीप्रॉक्सीफेन (१० टक्के ईसी) ०.४ मि.लि. किंवा फेनप्रोपॅथ्रीन (१० टक्के ईसी) ०.४ मि.लि.
  • कांदा पिकात करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी (फवारणी प्रति लिटर पाणी) डायफेनोकोनॅझोल (२५ टक्के ईसी) १ मि.लि. अधिक स्टिकर १ मि. लि.
  • तुती रेशीम उद्योग व्ही-१ हे वाण तुती उत्पादनामध्ये महत्त्वाचे असून, त्यापासून हेक्टरी ६५ टन उत्पादन मिळते. फांद्यांचे उत्पादन त्याच्या दुप्पट म्हणजे १३० टन प्रति हेक्टर प्रति वर्ष मिळते.

  • तुतीची लागवड ही सामू ६.५ ते ७.३ दरम्यान असलेल्या जमिनीत करावी. या जमिनीतील कार्बन : नायट्रोजन प्रमाण ०.५ च्या अधिक असावे.
  • तुती लागवडीसाठी हिरवळीचे खत, गांडूळ खत ५ टन प्रति हेक्टर (२ टन प्रति एकर) प्रमाणे द्यावे.
  • पट्टा पद्धतीने केलेल्या तुतीच्या लागवडीमध्ये वर्षातून दोन वेळा (जून व जानेवारीमध्ये) बोरू किंवा धैंचा बियाणे ८ किलो प्रति एकरी पेरून १.५ महिन्यांनी जमिनीत गाडावे. जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते.
  • संपर्क :   डॉ. कैलास डाखोरे, ०९४०९५४८२०२ (मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Land Survey Protest: ‘शक्तिपीठ’च्या मोजणीचा डाव शेतकऱ्यांनी हाणून पाडला

    Agriculture Production: खानदेशात उडीद, मूग उत्पादन कमी

    Sugarcane Farmers Crisis: थकीत ऊसबिलांमुळे कारखान्यांसमोर ऊस मिळविण्याची मोठी कसोटी

    Sunetra Pawar Visit: शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीसाठी प्रयत्न करणार: सुनेत्रा पवार

    Bhamragad Flood Crisis: भामरागडमध्ये पूर; ५२५ नागरिकांचे स्थलांतर

    SCROLL FOR NEXT