ज्वारीवरील खोडकिडीचा प्रादुर्भाव. 
कृषी सल्ला

कृषी सल्ला (कापूस, रब्बी ज्वारी, सूर्यफूल, करडई, वांगी)

कापसाची फरदड (खोडवा) घेणे टाळावे. कापूस पिकास १८० दिवस पूर्ण झाले असल्यास शेवटची वेचणी करून पालापाचोळा, पऱ्हाट्या गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी.

डॉ. कैलास डाखोरे, प्रा. डी. डी. पटाईत

कापूस

  • कापसाची फरदड (खोडवा) घेणे टाळावे.
  • कापूस पिकास १८० दिवस पूर्ण झाले असल्यास शेवटची वेचणी करून पालापाचोळा, पऱ्हाट्या गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी.
  • रब्बी ज्वारी रब्बी ज्वारी पिकावर खोड किडा आणि लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास, व्यवस्थापनासाठी थायामेथोक्झाम (१२.६ टक्के) +‍ लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (९.५ झेडसी) ०.५ मिलि किंवा स्पिनेटोरम (११.७ एससी) ०.४ मिलि प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रब्बी सूर्यफूल पानांवरील काळे ठिपके (अल्टरनेरीया) आढळून आल्यास, नियंत्रणासाठी (फवारणी प्रतिलिटर पाणी) मॅन्कोझेब २.५ ग्रॅम करडई (फवारणी प्रतिलिटर पाणी)

  •  माव्याचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, डायमिथोएट (३० टक्के) १.३ मिलि
  • पानावरील ठिपके रोगाचा प्रादूर्भाव दिसून आल्यास, नियंत्रणासाठी, मॅन्कोझेब अधिक कार्बेन्डाझीम (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम.
  • आंबा  मोहोरावरील तुडतुडे यांच्या व्यवस्थापनासाठी, फवारणी (प्रति लिटर पाणी)

  • डायमिथोएट (३० टक्के) १.३ मिलि किंवा
  • बुप्रोफेंजीन (२५ टक्के) २ मिलि किंवा
  • थायामेथोक्झाम (२५ टक्के) ०.२ ग्रॅम.
  • वांगी  शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, एकरी २ कामगंध सापळे उभारावेत. रासायनिक नियंत्रण (फवारणी ः प्रतिलिटर पाणी)

  • क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के एससी) ०.४ मिलि किंवा
  • क्लोरपायरिफॉस (२०टक्के एससी) मिलि किंवा
  • टीप :  वरील सर्व कीटकनाशकांसाठी लेबल क्लेम आहेत. - डॉ. कैलास डाखोरे, (मुख्‍य प्रकल्‍प समन्‍वयक) ९४०९५४८२०२ प्रा. डी. डी. पटाईत, (कीटकशास्‍त्र विभाग) ७५८८०८२०४० (ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agriculture Innovation: काळानुरूप नवीन वाण, तंत्रज्ञान वापर, मार्केटिंगसह नव्या संधींचा शोध गरजेचा

    Ai in Agriculture: साताऱ्यातील दोन हजार शेतकरी होणार टेक्नोसॅव्ही

    Farmer Deaths: यवतमाळ जिल्ह्यात ३३४ दिवसांत ३४२ आत्महत्या

    Onion Cultivation: कांदा रोपलागवड स्थिर राहणार

    Sharad Pawar: साखरप्रश्‍नी शहा यांच्यासोबत बैठक घेणार

    SCROLL FOR NEXT