use of IT in agriculture on March 9-10 
कृषी प्रक्रिया

कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या वापरासाठी जागतिक परिषद 

टीम अॅग्रोवन

कृषी क्षेत्रातील माहिती तंत्रज्ञानाचा (Information Technology)अंगीकार या विषयावर ९ व १० मार्च दरम्यान दोन दिवशीय जागतिक परिषद व्हर्च्युअल पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. ICTforAg 2022 असे या परिषदेचे नाव असून अल्प आणि माध्यम उत्पन्न गटातील देशांचे कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत. 

कृषी (Agriculture) आणि खाद्य (Food) क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्याच्या हेतूने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. डीएआय (DAI )आणि इंटेलीकॅपच्या ( Intellecap) वतीने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.  

व्हिडीओ पहा- 

कृषी (Agriculture) व तंत्रज्ञान (Technology) क्षेत्रातील अभ्यासक, संशोधक, विविध देशांचे सरकारी प्रतिनिधी, कृषी-तंत्रज्ञान उदयोजक, गुंतवणूकदार आणि डिजिटल ॲग्रीकल्चर क्षेत्रात सक्रिय सामाजिक संस्थांचे प्रतिनिधीही या परिषदेत हजर राहणार असल्याची माहिती इंटेलीकॅपचे (Intellecap) सहाय्यक संचालक मुकुंद प्रसाद यांनी दिली आहे.     

कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा आविष्कार (Technology In Agriculture)करण्याची प्रक्रिया सुरु असणाऱ्या १०० देशांचे २५०० प्रतिनिधी या परिषदेला हजर असणार आहेत. या परिषदेत संबंधित प्रतिनिधी आपापल्या देशातील कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अंगीकार करताना येणाऱ्या समस्या सांगणार आहेत, परिषदेत सहभागी संशोधकांकडून त्यावरही उपाय सांगितले जाणार असल्याचेही इंटेलिकॅपच्या ऊर्जा आणि हवामान बदल विभागाचे संचालक संतोष सिंग यांनी सांगितलं आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Udgir APMC : शेतकरी म्हणून निवडून आलेले सभापती हुडेंसह पाच जण अपात्र

Irrigation Scheme : बेलकुंड उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाला मंजुरी

Crop Damage Survey : पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण

Grape Pruning : सांगली जिल्ह्यात द्राक्षफळ छाटणीची तयारी सुरू

E-Peek Pahani : ई-पीक पाहणीबाबत महत्वाची अपडेट; ई-पीक पाहणीसाठी आठ दिवसांची मुदतवाढ

SCROLL FOR NEXT