Amla Processing  Agrowon
कृषी प्रक्रिया

Amla Processing : आवळा कॅन्डी कशी तयार कराल?

शहरी भागात आरोग्याच्या बाबतीत जागरुक असलेल्या ग्राहकांकडून आवळ्या पासून बनविलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांना मागणी वाढत आहे.

Team Agrowon

आवळा (Amla) हे फळ बर्‍याच औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. म्हणूनच आवळ्याला अमृतफळ असं ही म्हणतात. आवळ्यापासून कॅन्डी, चूर्ण, सुपारी, ज्यूस, पेठा, पाक, लोणचे असे पदार्थ बनवता येतात. उद्देश एकच की ह्या ना त्या प्रकारे आवळा खाल्ला जावा. तुरट चवीमुळे सहसा आवळा खाल्ला जात नाही. शहरी भागात आरोग्याच्या बाबतीत जागरुक असलेल्या ग्राहकांकडून आवळ्या पासून बनविलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांना (Amla Processing) मागणी वाढत आहे. या पदार्थांपैकी आवळा कॅन्डीला जास्त मागणी आहे. आवळा कॅन्डी व्यवसाय सुरु करणे अवघड नाही. तसेच त्यासाठी गुंतवणूकही जास्त लागत नाही. थोड्या भांडवलात व्यवसायाला सुरुवात करता येते. तसेच स्थानिक स्तरावर मार्केट ही लगेच उपलब्ध होते.

आवळा कॅन्डी तयार करण्याची पद्धत

आवळा कॅन्डी करताना पूर्ण पिकलेली मोठी किंवा मध्यम आकाराची रसदार फळे निवडावी. फळांना उकळत्या पाण्याची ८ ते १० मिनिटांसाठी प्रक्रिया देऊन त्यामधील बिया व काप वेगळे करावेत. अर्धवट शिजलेल्या फळांवर बोटाचा दाब दिल्यावर पाकळ्या बियांपासून सहजपणे वेगळ्या करता येतात. वेगळे केलेले काप प्रथम ५० डिग्री ब्रिक्स असलेल्या साखरेच्या पाकात २४ तास ठेवावेत. त्यासाठी १ लिटर पाण्यात १ किलो साखर मिसळावी. दुसऱ्या दिवशी पाकातील ब्रिक्सचे प्रमाण साधारणपणे २५ ते ३० डिग्री ब्रिक्स एवढे कमी होते. त्यामध्ये ३५० ते ४०० ग्रॅम साखर मिसळून त्याचा ब्रिक्स ६० करावा. तिसऱ्या दिवशी त्याच पाकात ५०० ते ६०० ग्रॅम साखर मिसळून ब्रिक्स ७० डिग्री कायम ठेवावा. पाचव्या दिवशी त्याच पाकात १५० ते २०० ग्रॅम साखर घालावी आणि सातव्या किंवा आठव्या दिवशी पाकात मुरलेल्या पाकळ्या बाहेर काढाव्यात. पाकात २% आल्याचा रस किवा विलायची पूड मिसळल्यास चव चांगली येते. कॅन्डी तयार झाल्यावर पाण्यात धुवून घ्यावी किंवा कापडाने पुसून घ्यावी आणि ३ ते ४ दिवस सुकवून घ्यावी. सुकलेली कॅन्डी प्लॅस्टिक पिशवीत भरून हवा बंद करावी.

जास्त फळांवर प्रक्रिया करण्यासाठी काही हस्तचलित आणि विजेवर चालणारी यंत्रे उपलब्ध आहेत. ज्यामुळे मोठ्या प्रमाणातील आवळ्यावर जलदपणे प्रक्रिया करणे शक्य होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT