प्रोबायोटिक्स पदार्थापासून मानवी शरीराला अनेक फायदे होतात, असे संशोधनातून अाढळून अाले अाहे. 
कृषी प्रक्रिया

चांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स पदार्थ

समीर भागवत, डॉ. संगीता गांगुली

प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक हजारपेक्षा विविध सूक्ष्मजीवांचे प्रकार मानवी शरीरामध्ये असतात. प्रोबायोटिक सूक्ष्मजीव हे नैसर्गिक आणि मित्रवर्गीय सूक्ष्मजीव आहेत, जे आपल्या शरीरातील सूक्ष्मजीवांचा समतोल राखण्यासाठी मदत करतात.

  • प्रोबायोटिक सूक्ष्मजीवांच्या पुरवठ्यासाठी दूध आणि दूध उत्पादने उत्तम स्रोत आहेत.
  • विशेषतः किण्वन केलेले दुग्धपदार्थ हा प्रोबायोटिक सूक्ष्मजीवांसाठी उत्तम स्रोत आहे.
  • प्रोबायोटिक्‍स दुग्धपदार्थातून घेणाऱ्यास दुग्धशर्कऱ्याची कमतरता, अतिसार, आतड्याचे आजार, कर्करोग यावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येते.
  • वय वाढत असताना रोगप्रतिकारक क्षमता कमी होते हे स्वाभाविक असून, उतरत्या वयात प्रोबायोटिकचा वापर करणे अतिशय महत्त्वाचे आहे.
  • प्रोबायोटिक्समधील विशिष्ट रोगप्रतिकारक शक्तीला वाढविण्यास मदत करतात व इतर आजारांपासूनसुद्धा बचाव होतो.
  • उपयुक्त सूक्ष्मजीव आणि काही दुग्ध उत्पादने

  • पदार्थ ः वापरले जाणारे सूक्ष्मजीव
  • प्रोबायोटिक दूध ः लॅक्टोबॅसिलस एसिडोफिलस, बिफिडोबॅक्टीरियम लॉन्गम इ.
  • प्रोबायोटिक दही ः लॅक्टोबॅसिलस केजी, लॅक्टोबॅसिलस एसिडोफिलस इ.
  • योगर्ट ः लॅक्टोबॅसिलस बल्गारीरिकस आणि स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस इ.
  • प्रोबायोटिक श्रीखंड ः लॅक्टोबॅसिलस केजी, लॅक्टोबॅसिलस एसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस बल्गारीरिकस आणि स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस इ.
  • प्रोबायोटिक कुल्फी ः लॅक्टोबॅसिलस रमनसोस, केफिर लॅक्टोबॅसिलस हेल्व्टिकस, लॅक्टोबॅसिलस केफेरनोफाएसीन, लॅक्टोबॅसिलस एसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस बल्गारीरिकस इ.
  • प्रोबायोटिक पदार्थांचे फायदे

  • दुग्धशर्कऱ्याची कमतरता सुधारण्यासाठी.
  • अतिसारापासून बचावासाठी.
  • रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी.
  • पोटाचे, आतड्याचे आजार कमी करण्यासाठी.
  • ताणतणाव, रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
  • इतर फायदे : ॲलर्जी, मूत्रमार्गाचे, आतड्याचे आजार इ. बाबींवर प्रोबायोटिक्स उपयोगी ठरते. प्रोबायोटिक्समुळे पौष्टिकता वाढते. मानसिक तणाव दूर होतो. वयस्क व्यक्तींमध्ये हाडांची झीज कमी होते.   संपर्क ः समीर भागवत, ९८९०३८३२६५ (राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, कर्नाल, हरियाना.

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Uddhav Thackeray: शिवसैनिक खचला नाही, पेटून उठलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

    Women SHGs: महिला बचत गटांना २५ कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट

    Below Average Rainfall: परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ७३ मंडलांत सरासरीहून कमी पाऊस

    CM Samruddha Panchayat Raj: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राजमधील ३३ गावांची होणार फेरतपासणी

    Water Conservation: अबिटघरमध्ये जलसंधारणाला गती

    SCROLL FOR NEXT