अननसापासून जॅम, स्क्वॅश, मुरंब्बा
अननसापासून जॅम, स्क्वॅश, मुरंब्बा 
कृषी प्रक्रिया

अननसापासून जॅम, स्क्वॅश, मुरंब्बा

शैलेंद्र कटके, हेमंत देशपांडे, डॉ. अरविंद सावते

अननसाच्या गरामधे तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असल्यामुळे  शरीराची पचनक्रिया व्यवस्थित राहते. यामध्ये मँगेनीजचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हाडांची मजबुती वाढते. शरीरातील चयापचय क्रिया वेगवान होतात. या फळापासून विविध पदार्थ तयार करता येतात. अननस लागवड मलेशिया, फिलिपाइन्स, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि भारतात मोठ्या प्रमाणात आहे. भारतात केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, आसाम व त्रिपुरा या राज्यांत व्यापारी स्तरावर लागवड केली जाते. महाराष्ट्रात कोकणामध्ये तुरळक प्रमाणात अननसाची लागवड होते. फळ रसाळ, किरमिजी रंगाचे व चवीला आंबट गोड असते. औषधी गुणधर्म 

  • ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते.
  • अननसामध्ये ८७ टक्के सायट्रिक आम्ल व १३ टक्के मॅलिक आम्ल असते. ही दोन्ही आम्ले शरीरास पोषक असतात. ही आम्ले शरीरात शोषली जाऊन उष्णता व ऊर्जा निर्माण करतात.
  • गरामधे तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असल्यामुळे शरीराची पचनक्रिया व्यवस्थित राहते.
  • ब्रोमेलिन नावाचे एन्झाइम असते. ते शरीराचा दाह आणि सूज कमी करते. अन्नाचे पचन करण्यास मदत करते.
  • मँगेनीजचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हाडांची मजबुती वाढते.
  • बिटा कॅरोटीनचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे शरीराची झीज होण्याचा वेग कमी होतो. शरीरातील चयापचय क्रिया वेगवान होतात.
  • पिकलेला अननस मधुर आंबट, मूत्रल, कृमिघ्न, पित्तशामक व उत्तम पाचक असतो. यामुळे उष्णतेचे विकार व ऊन लागल्याने होणारे विकार कमी होण्यास मदत होते.
  • पानांपासून काढलेल्या धाग्यांपासून हातविणीचे कापड तयार करतात. हे कापड रेशमासारखे दिसते. धाग्यांपासून दोराही तयार करतात.
  • प्रक्रिया पदार्थ जॅम  

  • सर्वप्रथम अननसाची साल काढून त्याचे तुकडे करून मिक्सरमधून बारीक करून घ्यावा. 
  • एका पातेल्यात १ किलो साखर आणि १ किलो  गर शिजवण्यास ठेवावा. सर्व घटकपदार्थ एकत्र मिसळून ठराविक घट्टपणा (६८.५ डिग्री ब्रिक्‍स) येईपर्यंत शिजवावे.
  • शिजवताना मिश्रण पळीने हलवावे. त्यात २ ग्रॅम सायट्रिक ॲसिड मिसळावे. मिश्रण सारखे ढवळत राहावे. 
  • मिश्रण गरम असताना निर्जंतुक केलेल्या काचेच्या बरणीत भरावे. त्यानंतर पॅरिफिन वॅक्सने सील करावे.
  • स्क्वॅश

  • गरापासून स्क्वॅश बनविण्यासाठी गराचे प्रमाण ४५ टक्के, टी. एस. एस. ५० टक्के व आम्लता १ टक्के ठेवावी.
  • एका मोठ्या पातेल्यात १ लिटर पाणी घ्यावे. त्यामध्ये २० ग्रॅम सायट्रिक ॲसिड व १.७५० ग्रॅम साखर मिसळून पूर्ण विरघळून घ्यावे. हे द्रावण पातळ मलमल कापडातून दुसऱ्या पातेल्यात गाळून घ्यावे. त्यामध्ये १ किलो अननसाचा गर मिसळून एकजीव करावे. हे द्रावण थोडे गरम करून घ्यावे. 
  • थंड झाल्यावर एका ग्लास मध्ये थोडा स्क्वॅश घेऊन त्यात २ ग्रॅम पोटॅशियम मेटाबायसल्फाईट मिसळून चांगले विरघळून घ्यावे. 
  • निर्जतुकीकरण करून घेतेलेल्या स्वच्छ बाटलीत भरून हवाबंद कराव्यात. 
  • वापर करताना एका पेल्यासाठी तीन पेले पाणी या प्रमाणात मिसळून ते सरबतासारखे वापरावे.
  • मुरंब्बा  

  • पूर्णपणे पिकलेला अननस घेऊन त्याची साल काढून घ्यावी. मोठे काप करून मधील दांडा काढून घ्यावा. 
  • पूर्ण कापांचे वजन करून तेवढीच साखर असे प्रमाण ठेवावे. पातेल्यात पाणी घेऊन त्यात साखर व २ ग्रॅम सायट्रिक ॲसिड मिसळून तीन तारी पाक तयार करावा. 
  • त्यामध्ये अननसाचे काप, वेलची पूड मिसळून पाकातल्या फोडी मंद आचेवर शिजताना पाकाला मधासारखा दाटपणा आल्यावर मुरंब्बा झाला असे समजावे. गार झाल्यावर बरणीत भरून ठेवावे.
  •  ः शैलेंद्र कटके, ९९७०९९६२८२ (अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

    Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

    Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

    Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

    Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

    SCROLL FOR NEXT