garlic 
कृषी प्रक्रिया

आरोग्यदायी लसूण

आपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण होय. विविध भाज्या व पदार्थांमध्ये वापरण्यात येणाऱ्या मसाल्यांमध्ये लसूण अग्रस्थानी असतो. असा हा सर्वांना परिचित असलेला लसूण आरोग्यदायी आहे. लसूण हा वातशामक म्हणून कार्य करतो. सांधेदुखी, सायरीका, पाठदुखी अशी वाताची लक्षणे असतील तर आहारात लसणाचे वापर जरूर करावा. वातामुळे भुकेवर परिणाम होऊन भूक मंदावते, तोंडाला चव नसते, पोटात दुखते, छातीतून चमका येणे अशा वेळी तुपात तळलेल्या लसणाचे जरूर सेवन करावे.

डॉ. विनिता कुलकर्णी

आपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण होय. विविध भाज्या व पदार्थांमध्ये वापरण्यात येणाऱ्या मसाल्यांमध्ये लसूण अग्रस्थानी असतो. असा हा सर्वांना परिचित असलेला लसूण आरोग्यदायी आहे. लसूण हा वातशामक म्हणून कार्य करतो. सांधेदुखी, सायरीका, पाठदुखी अशी वाताची लक्षणे असतील तर आहारात लसणाचे वापर जरूर करावा. वातामुळे भुकेवर परिणाम होऊन भूक मंदावते, तोंडाला चव नसते, पोटात दुखते, छातीतून चमका येणे अशा वेळी तुपात तळलेल्या लसणाचे जरूर सेवन करावे.

  • सर्दी, खोकला, श्‍वास अशा कफ विकारात लसूण पिंपळी चूर्णाचा उपयोग करावा. ह्रदयरोग, दमा, कफाचा खोकला असे त्रास जाणवत असल्यास, आहारात तुपात तळलेला लसणाचे सेवन करावे.
  • अतिसार, आर पडणे यामध्ये पोटात मुरडा येतो. अशा वेळी लसणापासून तयार केलेली ‘लसूनादी वटी’ योग्य मात्रेत तुपात कालवून घेतल्यास मुरडा कमी होतो.
  • अन्नपचन नीट झाले नसेल तर, पोटात जडपणा जाणवतो. शिवाय अंग दुखते. विशेषतः व्ह्रमॅटॉईड आर्थायरीस मध्ये ताप, पचनशक्ती बिघडणे, सांधे धरणे या तक्रारी असतात. त्यावेळी इतर औषधांच्या जोडीला लसूण जरूर वापरावा.
  • लसूण उत्तम जंतूनाशक म्हणून ओळखला जातो. त्यामुळे लहान मुलांच्या आहारातून लसणाचा वापर जरूर करावा.
  • श्‍वास विकार, फुफ्फसाचे विकार, क्षय इत्यादी आजारांमध्ये लसूण तुपात लालसर तळून दिला जातो. त्यामुळे कफाची दुर्गंधी, कफातील दोष कमी होण्यास मदत होते. तसेच इतर औषधांचा वापरही करावा.
  • गर्भवती स्त्रियांना लसूण अति प्रमाणात देऊ नये. त्यामुळे उष्णता वाढते. उष्णता वाढली तर धने उकडून द्यावेत.
  • पथ्य

  • तिखट, तेलकट, तुपकट पदार्थांचे सेवन करणे टाळावे. वांगी, सिमला मिरचीचे आहारातील प्रमाण कमी करावे.
  • जास्त उन्हात काम करणे टाळावे.
  • काळजी

  • श्‍वास किंवा ह्रदय विकारांत नियमित तपासणी आणि योग्य औषधोपचार जरूर करावेत. संतुलित आहार व व्यायाम आवश्‍यक आहे.
  • पचनाच्या तक्रारींमध्ये जेवणाच्या वेळा, पथ्य सांभाळणे गरजेचे आहे. तेव्हाच लसणाचा उपयोग होतो.
  • रोजच्या आहारात लसूण योग्य प्रमाणात वापरावा.
  • संपर्क- डॉ. विनिता कुलकर्णी, ९४२२३१०३७७

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Jackfruit Farming : कोकणात प्रक्रियेतून फणसाला मिळतेय नवी झळाळी

    AI In Sugar cane: ऊस लागवडीत ‘एआय’ तंत्र वापरणार

    Local Self Government : स्थानिक स्वराज्य संस्थांचे बळकटीकरण

    Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

    Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

    SCROLL FOR NEXT