प्रक्रिया उद्योगात नारळाला मागणी 
कृषी प्रक्रिया

प्रक्रिया उद्योगात नारळाला मागणी

डॉ. दिलीप नागवेकर

नारळाचा प्रत्येक भागाचा उपयोग प्रक्रिया उद्योगासाठी अत्यंत उपयुक्त आहे. प्रक्रियेसाठी तंत्रज्ञान आणि काही प्रमाणात अनुदान नारळ विकास मंडळाकडे उपलब्ध आहे. वाढती मागणी लक्षात घेता सहकारी तत्त्वावर किंवा गावपातळीवर नारळ प्रक्रिया उद्योग यशस्वी ठरू शकतो.

नारळ हा आरोग्यदायी अन्न तसेच पेय पुरविण्याबरोबरच निवारा, संपत्ती आणि सौंदर्य देणारा वृक्ष आहे. याच्या प्रत्येक भागाचा उपयोग खाद्य पदार्थ तसेच प्रक्रिया उद्योगात केला जातो. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्याची आर्थिक प्रगती ही नारळ प्रक्रिया उद्योग आणि पर्यटनातूनच होत आहे. त्यासाठी नारळ उत्पादन वाढविण्यावर या राज्यातील बागायतदारांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. कोकणात देखील प्रक्रिया आणि पर्यटन उद्योग वाढविण्यासाठी नारळ लागवड, योग्य व्यवस्थापन आणि प्रक्रिया उद्योगावर भर दिला पाहिजे. कोकणात नारळाखालील क्षेत्र हे विखुरलेल्या स्वरुपात असल्याने सहकारी तत्त्वावर किंवा गावपातळीवर लघू उद्योग यशस्वी ठरू शकतात. त्याचबरोबर एकात्मिक कारखानदारीचा विचार करण्याची गरज आहे. पूरक उद्योगांना संधी १) अखंड नारळ खरेदी करून त्याच्या प्रत्येक भागाचा उपयोग करून स्वतंत्र उद्योग उभारणे शक्य आहे. नारळाचा प्रत्येक भागाचा उपयोग विविध उत्पादने तयार करण्यासाठी होऊ शकतो. यासाठी तंत्रज्ञान आणि काही प्रमाणात अनुदान नारळ विकास मंडळाकडे उपलब्ध आहे. २) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये सन २००७ मध्ये भारतातील पहिले नारळ प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. ३) नारळ विकास मंडळामार्फत महाराष्ट्रासाठीचे कार्यालय ठाणे येथे सुरू करण्यात आले आहे. त्याचा लाभ नारळ बागायतदारांनी घेतला पाहिजे. प्रक्रिया उद्योगांना संधी काथ्या उद्योग :

  • अखंड नारळ सोलल्यानंतर सोडणे उपलब्ध होतात. या सोडणापासून काथ्या काढला जातो. त्यापासून अनेक वस्तू तयार केल्या जातात. त्यापैकी सुंभ, दोरखंड, पायपुसण्याला चांगली मागणी आहे.
  • सोडण भुसा (क्वायर पीथ) ७० टक्के उपलब्ध होतो. याचा उपयोग जमिनीची प्रत सुधारणे, मुळे फुटण्यासाठी माध्यम आणि आच्छादनासाठी होतो. त्याचबरोबर उत्तम प्रकारचे सेंद्रिय खत तयार करता येते. त्याच्यामध्ये त्याच्या वजनाच्या दहा पट पाणी धरून ठेवण्याची क्षमता असल्याने त्याचा वापर पाणी कमतरता असलेल्या विभागात पिकासाठी चांगला होतो.
  • नारळ पाण्यापासून व्हिनेगर : पक्व नारळ सोलून फोडल्यानंतर त्यांच्या मधून जे पाणी उपलब्ध होते त्यापासून व्हिनेगर तयार करता येते. नारळ पाण्यापासून नाता-डी-कोको, सॉस, सरबत निर्मितीला वाव आहे. खोबरे : सुके खोबरे, खोबरेल तेल, नारळ खोबरे दूध, शुध्द खोबरेल तेल (व्हर्जिन कोकोनट ऑईल), नारळ खोबरे मलई, दूध पावडर, नारळ चीप्स्, खोबरे पीठ या पदार्थांना प्रक्रिया उद्योगात चांगली मागणी आहे. करवंटी : करवंटीपासून कोळसा तयार करतात. त्यापासून ॲक्टिव्हेटेड कार्बन तयार करता येतो. याचा उपयोग वनस्पती तेल शुद्ध करणे, पाण्याचे शुद्धीकरण, द्रावकाचा उतारा, सोन्याचा उतारा, विषारी वायूपासून संरक्षणासाठी वापरण्यात येणारा गॅस मास्कमध्ये केला जातो. परदेशात करवंटी कोळश्याला चांगली मागणी आहे. शहाळे विक्री :

  • पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील बागायतदार शहाळ्याची विक्री करतात. बागायदार व्यापाऱ्यांना वार्षिक कराराने नारळाची झाडे देतात. त्यामुळे पाडप ते विक्रीचे नियोजन व्यापारी पहातात. त्यामुळे शहाळे विक्री हा चांगला व्यवसाय आहे. पालघरमध्ये सहकारी संस्थामार्फत शहाळयाची विक्री होते. तेथेही शहाळे पाडप ते विक्री संस्थेमार्फत केली जाते.
  • कोकणात पर्यटकांची संख्या वाढत असल्याने शहाळयाचा तुटवडा भासत असून शहाळी वेळप्रसंगी कर्नाटकातून आणावी लागतात. सध्या शहाळी काढणारे लोक उपलब्ध नसल्याने बागायतदारांच्यासमोर मजुरांची अडचण आहे.
  • नारळ करवंटी, काथ्यापासून शोभेच्या वस्तू : करवंटी तसेच काथ्यापासून विविध शोभेच्या वस्तू तयार केल्या जातात. याला देश-परदेशात चांगली मागणी आहे. संपर्क ः डॉ. दिलीप नागवेकर, ९४२११३७७६९ (लेखक प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी येथे कार्यरत होते. )

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

    Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

    Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

    Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

    Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

    SCROLL FOR NEXT