value added products of ginger
value added products of ginger 
कृषी प्रक्रिया

आलेपासून प्रक्रियायुक्त पदार्थ निर्मिती

चंद्रकला सोनवणे

आले ही कंदवर्गीय वनस्पती असून बहुऔषधी म्हणून ओळखली जाते. आल्यामध्ये अनेक औषधी तत्व असल्यामुळे आयुर्वेदिक औषधांमध्ये त्याचा वापर होतो. थंडीच्या दिवसांत होणाऱ्या संक्रमणापासून बचावासाठी आले रस आणि आलेयुक्त चहा फायदेशीर ठरतो. आले सुकवून त्याचा सुंठ म्हणून वापर केला जातो. औषधी गुणधर्म

  • मळमळ, उलटीच्या त्रासावर गुणकारी मानले जाते.
  • भूक लागत नसेल तर आल्याचे नियमित सेवन करावे त्याने पोट साफ होते व भूकही लागते- पचनासंबंधी पोटातील समस्या दूर करते.
  • पावसाळ्याच्या दिवसांत आले रसाचे नियमित सेवन केल्यास, कफ, सर्दी-खोकल्यापासून बचाव होतो.
  • थंडीच्या दिवसांत रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी मदत करते. सांधेदुखीवर आले गुणकारी मानले जाते.
  • प्रक्रियायुक्त पदार्थ  सरबत व स्क्वॅश प्रथम आले स्वच्छ धुऊन त्यावरील साल काढून टाकावी. त्याचे लहान तुकडे करावेत. आवश्यकतेनुसार पाणी टाकून मिक्‍सरच्या साह्याने ज्यूस तयार करून घ्यावा. ज्यूस गाळून घ्यावा. तयार रसाचा वापर सरबत किंवा अन्य मिक्स पेय तयार करण्यासाठी होतो. आल्याच्या रसात ४० ते ४५ टक्के साखर टाकावी. सरबत करायचे असेल तर त्यामध्ये २५० मिलि रसात १.३० ग्रॅम साखर ३० ग्रॅम सायट्रिक आम्ल आणि ८ लिटर पाणी टाकावे. अशा प्रकारे तयार झालेला स्क्वॅश आणि सरबत निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरून हवाबंद करून कोरड्या जागी साठवावे. पेस्ट  घरगुती पदार्थ बनविण्यासाठी आले पेस्ट मोठ्या प्रमाणात वापरली जाते. यासाठी प्रथम आल्याचे बारीक तुकडे करून कुकरमध्ये १०-१५ मिनिटे शिजवून घ्यावे. तुकडे थंड करून त्यात पाणी टाकून पेस्ट तयार करावी. आम्लता नियंत्रित करण्यासाठी सायट्रिक आम्लाचा वापर करावा. तयार केलेली पेस्ट ८० अंश सेल्सिअस तापमानास गरम करून निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरावे. पेस्टची गुणवत्ता आणि साठवणक्षमता वाढवण्यासाठी सोडिअम बेंजोएट या संरक्षण रसायनाचा वापर करावा. लोणचे  फायदे  १) हे लोणचे नियमित खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. २) रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. ३) सांधेदुखी आणि सर्दी-खोकला यासारख्या आजारांपासून बचाव होतो. ४) मधुमेहींसाठी आले आणि लसणाचे लोणचे अत्यंत फायदेशीर ठरते. ५) थंडीच्या दिवसांत रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. साहित्य  अर्धा किलो आले, लसूण १५० ग्रॅम, हळद १० ग्रॅम, लाल तिखट १० ग्रॅम, हिंग १० ग्रॅम, मीठ ७० ग्रॅम, गरजेनुसार तेल. कृती  प्रथम आले स्वच्छ धुऊन कोरडे करून घ्यावे. सोललेल्या लसणाची बारीक पेस्ट तयार करून घ्यावी. बेडगी मिरची आणि वरील सर्व सामग्री एकत्रित करून कढईमध्ये तेलात शिजवून घ्यावे. थंड झाल्यावर तयार लोणचे निर्जंतुक बाटलीमध्ये भरावे. सुंठनिर्मिती  आल्यापासून सुंठ तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. सुंठ निर्मितीसाठी उत्तम प्रतीचे आले निवडावे. आले स्वच्छ करून ८-१० तास पाण्यात भिजत ठेवावे. भिजलेल्या आल्याची साल काढून २ टक्के चुन्याच्या द्रावणात ६-७ तास भिजत ठेवावे. नंतर एका छोट्या बंद खोलीत आले कंद पसरून १२ तास गंधकाची (प्रमाणः १० ग्रॅम) धुरी द्यावी. कंद बाहेर काढून पुन्हा २ टक्के चुन्याच्या द्रावणात ६-७ तास भिजत ठेवून १२ तास गंधकाची धुरी द्यावी. अशाप्रकारे ही प्रक्रिया तीन वेळा करावी. त्यामुळे आल्याच्या कंदास पांढरा शुभ्र रंग येतो. प्रक्रिया केलेले आले सूर्यप्रकाशात १० टक्के पाण्याचा अंश राहीपर्यंत वाळवावे. तयार सुंठ स्वच्छ करून विक्री करावी. आल्याचा मुरंबा पूर्व प्रक्रिया केलेले आल्याचे तुकडे कुकरमध्ये १० ते १५ मिनिटे शिजवून घ्यावेत. समप्रमाणात साखर आणि पाणी घेऊन पाक (७० अंश ब्रिक्स) करावा. एक किलो आल्यासाठी दीड किलो साखर वापरावी. शिजवलेले आले पाकामध्ये २ तास ठेवावे. थंड झाल्यावर निर्जंतुक बाटलीमध्ये मुरंबा भरून कोरड्या जागी साठवून ठेवावे. - चंद्रकला सोनवणे, ७९७२९९९४६४ (के.एस.के. अन्नतंत्र महाविद्यालय, बीड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Kadavanchi Watershed Project : कडवंची ‘वॉटर बजेट’द्वारे समृद्धी

    Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

    Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

    Food Grains : भरडधान्येच तारतील; आर्थिक आधार देतील

    River Pollution : नदी प्रदूषणमुक्त करणारा ‘महाड पॅटर्न’

    SCROLL FOR NEXT