Quinoa  
कृषी प्रक्रिया

पौष्टिक आहारासाठी क्विनोआ

क्विनोआ हा धान्याचा एक प्रकार असून एखाद्या डाळीप्रमाणे दिसतो. इतर धान्यांच्या क्विनोआ तुलनेत क्विनोआ हे अधिक पौष्टिक आणि रुचकर असते. क्विनोआमध्ये कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे ब आणि क, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस व पोटॅशिअम असे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात.

ज्ञानेश्‍वर शिंदे, डॉ. संदीप प्रसाद

क्विनोआ हा धान्याचा एक प्रकार असून एखाद्या डाळीप्रमाणे दिसतो. इतर धान्यांच्या क्विनोआ तुलनेत क्विनोआ हे अधिक पौष्टिक आणि रुचकर असते. क्विनोआमध्ये कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे ब आणि क, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस व पोटॅशिअम असे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. क्विनोआ हे कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेच्या पातळीचे नियंत्रण करू शकते, त्यामुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. भारतामध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. पौष्टिक घटक आणि उत्तम चवीमुळे अल्पावधीतच क्विनोआची मागणी वाढत आहे. क्विनोआचे प्रकार  क्विनोआचे रंगावरून काळे, पांढरे आणि लाल असे तीन प्रकार पडतात. पांढरा क्विनोआ  या क्विनोआचे जगभरात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. पांढरा क्विनोआ बाजारात सहज उपलब्ध होतो. इतर रंगांच्या क्विनोआच्या तुलनेत पांढरा क्विनोआ कमी वेळेत शिजतो. लाल क्विनोआ 

  • या प्रकारातील क्विनोआ दाण्याचा रंग लाल असून शिजवल्यानंतरही रंग लालच राहतो.
  • लाल रंगामुळे हा क्विनोआचा सॅलेडमध्ये जास्त वापर होतो.
  • इतर रंगांच्या क्विनोआच्या तुलनेत शिजताना याचा आकार सर्वांत जास्त बदलतो
  • काळा क्विनोआ 

  • हा गोडसर चवीचा असून दाण्याचा रंग हलका तपकिरी ते काळसर रंगाचा असतो. शिजवल्यानंतर याचा मूळ आकार आणि रंग बदलत नाही.
  • हा क्विनोआ इतर धान्याच्या तुलनेत गोड असतो.
  • काळ्या रंगाच्या क्विनोआला शिजण्यास थोडा जास्त वेळ लागतो. त्यामुळे लाल आणि पांढऱ्या क्विनोआच्या तुलनेत याचा वापर कमी होतो.
  • आरोग्यदायी फायदे 

  • क्विनोआचा आहारात समावेश केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे हृदयासंबंधीचे आजार होण्याची शक्यता कमी होते.
  • इतर धान्यांच्या तुलनेत क्विनोआमध्ये सगळ्यात कमी स्निग्ध पदार्थ असतात. ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
  • मधुमेहावर क्विनोआ गुणकारी मानले जाते. क्विनोआमधील कर्बोदके आणि तंतुमय पदार्थ रक्तातील साखर नियंत्रित ठेवतात.
  • काही लोकांच्या शरीरावर सूज येते. अशा लोकांसाठी क्विनोआ सेवन फायदेशीर ठरते.
  • आहारात क्विनोआचा समावेश केल्याने चयापचय सुधारते. यामध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असल्याने पचनक्रिया सुरळीत होते.
  • यामध्ये जीवनसत्त्व 'ब’ मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे क्विनोआ सेवन केल्याने त्वचेवरील काळे किंवा पांढरे चट्टे कमी होतात. तसेच चेहऱ्यावरील मुरूम किंवा फोड्या वाढीस प्रतिबंध केला जातो. आहारात नियमित क्विनोआचा वापर केल्यास त्वचा उजळण्यास मदत होते.
  • क्विनोआतील मॅग्नेशिअम हाडांच्या निर्मितीसाठी लाभदायी ठरते. हाडे मजबूत राहण्यास मदत होते. क्विनोआ नियमित सेवन केल्यास हाडांशी संबंधित आजार जसे, अस्थिमृदुता व अस्थिभंगापासून बचाव होतो.
  • केसांच्या आरोग्यासाठी क्विनोआ फायदेशीर आहे. क्विनोआमधील हायड्रोलाईज्ड प्रथिनांमुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि केस जलद वाढण्यास मदत होते. केस मजबूत व चमकदार होतात.
  • क्विनोआमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असतात. जे कर्करोगास प्रतिबंध करतात.
  • क्विनोआचे मूल्यवर्धन  मिलिंग किंवा दळणे  तांदळाप्रमाणे क्विनोआचे बाह्य आवरण काढून ते पॉलिश केले जाते. त्यानंतर दळण यंत्रातून दळून घेतले जाते. असे पॉलिश केलेले अख्खे किंवा पिठाच्या स्वरूपात क्विनोआ बाजारात उपलब्ध असते. भाजणे किंवा शिजवणे 

  • क्विनोआचे दाणे भाजून, बारीक करून गव्हाच्या पिठासोबत वापरून त्यापासून विविध पदार्थ बनवले जातात. जसे, बिस्कीट, कुकीज, रोटी, केक, थालिपीठ, पुलाव, डोसा, सलाड, पराठा, खाकरा इत्यादी.
  • जाडसर बारीक केलेल्या क्विनोआपासून उपमा बनवता येतो. तसेच इडली मिक्स, अप्पे मिक्स सारख्या पिठामध्ये वापर केला जातो.
  • अख्खे क्विनोआ भात शिजवतो त्याप्रमाणे शिजवता येतो.
  • प्रक्रियायुक्त पदार्थ  खाकरा साहित्य क्विनोआ पीठ १५० ग्रॅम, ओट्स पीठ ५० ग्रॅम, गहू पीठ ५० ग्रॅम, लसूण पेस्ट, तीळ, मीठ, तेल इत्यादी. कृती सर्वप्रथम क्विनोआ, ओट्स, गहू यांचे पीठ एकत्र करून घ्यावेत. त्यानंतर या पिठांमध्ये अर्धा चमचा मीठ आणि पाणी टाकून कणीक बनवून घ्यावी. तयार कणकेचे एकसमान गोळे बनवून पातळ पोळ्या लाटाव्यात. मंद आचेवर तवा ठेवून त्यावर पोळ्या दोन्ही बाजूंनी अर्ध्या कच्च्या स्वरूपात भाजून घ्याव्यात. अशाप्रकारे सर्व पोळ्या भाजून घ्याव्यात. भाजताना पोळ्या फुगणार नाहीत याची काळजी घ्यावी. पोळ्या पापडासारखा कुरकूर आवाज येईपर्यंत भाजून घ्याव्या. तयार खाकरा पौष्टिक असून चवीला उत्तम लागतो. -  ज्ञानेश्‍वर शिंदे, ७५८८१७९५८० (आचार्य पदवीचे विद्यार्थी, अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, सॅम हिगिनबॉटम कृषी तंत्रज्ञान आणि विज्ञान विद्यापीठ, प्रयागराज,उत्तर प्रदेश)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Farmer Issue: नियतीनेच तोडला थुट्टे कुटुंबाचा ‘भरवसा’

    Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर वाढला

    Kharif Sowing: खरीप पेरण्यांत बारामती उपविभाग अव्वल

    Maharashtra Agriculture Minister: कृषिमंत्री कोकाटे खानदेश दौरा अर्धवट सोडून परतले

    Agri Officers Support: कृषिमंत्र्यांच्या समर्थनासाठी कृषी अधिकारी सरसावले

    SCROLL FOR NEXT