Jalgaon News: जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे सरसकट पंचनामे होऊन जळगाव जिल्ह्यासाठी २९९ कोटींची मदत जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे ७० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर ‘डीबीटी’द्वारे मदत अनुदान वितरित झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे..वितरणात रावेर, चाळीसगावसह भडगाव आदी तालुक्यांनी आघाडी घेतली आहे. यात फार्मर आयडी अथवा ई-केवायसीनुसार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट डीबीटी अंतर्गत अन्य तालुक्यात देखील अनुदान वितरण होत आहे. या उलट यावल तालुक्यात १०० टक्के वितरण अनुदान असले तरी ई केवायसी अथवा फार्मर आयडी शेतकरी ओळखपत्र नसल्याने ३ शेतकऱ्यांना मदत मिळण्यास अडथळे येत असल्याचे दिसून आले आहे. .Ativrushti Madat: अतिवृष्टी, महापूर नुकसानीचे ४०९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा.सप्टेंबर मॉन्सूनदरम्यान जिल्ह्यात सुमारे सव्वातीन लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या अडीच लाखाहून अधिक हेक्टरवरील खरीप शेत पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसान अनुदान मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे म्हटले होते. त्यानुसार ऑक्टोबरच्या शेवटच्या सप्ताहात जिल्हा प्रशासनाला २९९ कोटी ९४ लाख ४६ हजार ६१८ रुपये निधी प्राप्त झाला आहे..Ativrushti Madat: नांदेडला हेक्टरी दहा हजार प्रमाणे ७२८ कोटींचा निधी मंजूर.त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील ७०.६५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे अनुदान मंजूर होऊन वितरित झाले आहे. काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत, तर काहींच्या नोंदींमध्ये त्रुटी आहेत. काही ठिकाणी एकापेक्षा जास्त खाती असल्याचे दिसून आले. या सर्व बाबी तपासून उर्वरित १० टक्के शेतकऱ्यांपर्यंतही तातडीने मदत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कुणीही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये व अपात्र खातेधारकांच्या खात्यावर निधी जावू नये, यासाठी ई-केवायसी केली जात आहे..तालुका शेतकरी वितरण (टक्के)मुक्ताईनगर १८,९१८ ५१.५५बोदवड ८,५१० ६१.८९पाचोरा ५२,६८५ ६४.७०जळगाव ५,६१९ ६९.२६पारोळा १३,९६९ ६७.५०.धरणगाव ३७,५७४ ६९.७३एरंडोल २७,४५९ ६७.७४भुसावळ १५,९७१ ७३.८८जामनेर ४१,९७० ७२.०४.भडगाव ३३,८१५ ७३.६१चाळीसगाव ७७,६१ ७८.७८रावेर ६४३ ९५.३२यावल ०३ १००एकूण ३,२५,३५९ ७०.६५.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.