Crop Damage Agrowon
कडधान्ये

Pulses : संततधार पावसाने कडधान्य पिकांना शेतातच मोड

जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात संततधार पावसासह अनेक भागात अतिवृष्टीने दाणादाण उडवली आहे. त्यामुळे काढणीस आलेल्या कडधान्य पिकांचे नुकसान झाले आहे.

टीम ॲग्रोवन

नाशिक : जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात संततधार पावसासह अनेक भागात अतिवृष्टीने (Wet Drought) दाणादाण उडवली आहे. त्यामुळे काढणीस आलेल्या कडधान्य पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले आहे. एकीकडे कडधान्य पिकांचे सरासरी क्षेत्र घटत असल्याची माहिती कृषी विभागाच्या (Agriculture Department Report) अहवालानुसार समोर आली आहे.

त्यातच काढणीच्या अवस्थेत मूग, उडीद या पिकांच्या पक्व झालेल्या दाण्यांना शेतातच मोड आल्याने पिके हातातून गेली. उत्पादनावर परिणाम झाला असून नुकसान सोसण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कृषी विभागाच्या अंतिम पेरणी अहवालानुसार जिल्ह्यात कडधान्य पिकांचे सरासरी क्षेत्र ३५,८७७.६५ हेक्टर आहे. त्यापैकी ३२४७९.६१ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली असून

टक्केवारी ९०.५३ असून एकीकडे पेरणी १० टक्क्यांनी घटली आहे. असे असताना ऑगस्ट महिन्यात पिके पक्वता अवस्थेपर्यंत जोमदार होती; मात्र सप्टेंबरमध्ये सलग पंधरा दिवस पावसाने झड लावल्याने शिवारात पाणी साचून होते. त्यामुळे कामात व्यत्यय येऊन सोंगण्या वेळेवर होऊ शकल्या नाहीत.

कडधान्य पिकांमध्ये प्रामुख्याने मूग, उडीद या पिकांच्या तयार शेंगा पावसात भिजल्याने शेतातच त्यांना मोड आले आहेत. त्यामुळे पिके मातीमोल झाल्याची एकंदरीत स्थिती आहे. चालू वर्षी मूग लागवडी सरासरीच्या थोड्याफार पुढे गेलेल्या आहेत. त्यामध्ये नांदगाव व येवला तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र वाढले. यासह मालेगाव व देवळा तालुक्यातील लागवडी पेरण्या मोठ्या प्रमाणावर होत्या.

त्यामध्ये सटाणा, निफाड, सिन्नर तालुक्यात सततच्या पावसामुळे काढणीच्या अवस्थेत आलेले पीक बाधित झाले आहे.

उडीद पिकाच्या लागवडी सरासरीपेक्षा कमी आहेत. याही पिकाला पावसाचा मोठा फटका बसला आहे. काळ्याभोर झालेल्या शेंगा सततच्या पावसामुळे खराब झाल्या आहेत. दाण्यांना पाणी लागून मोड आल्याची स्थिती आहे.

त्यामुळे उत्पादन हातीच येणार नाही, असेही शेतकऱ्यांनी सांगितले. प्राथमिक अहवालात कडधान्याचे नुकसान दाखवलेच नाही जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी व संततधार पावसामुळे पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने नुकसानीचा प्राथमिक अहवाल जाहीर केला;

मात्र कडधान्य पिकांचा पेरा झालेल्या क्षेत्रावर नुकसान त्यात दाखवलेले नाही. त्यामुळे पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे; मात्र प्राथमिक अहवालातच माहिती वास्तविक नसल्याची स्थिती आहे. असे असेल तर शेतकऱ्यांच्या शेतात झालेल्या नुकसानीचे पंचनामे होणार की नाही, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

पिके सर्वसाधारण क्षेत्र पेरणी टक्केवारी

तूर ८६६०.८७ ५६७३.३५ ६५.५१

मूग १६०६५.११ १८८५० ११७.३३

उडीद ८८२८.७७ ५८१२.५९ ६५.८५

इतर कडधान्य पिके २३२२.८६ २१४३.६७ ९२.२९

एकूण कडधान्य पिके ३५८७७.६५ ३२४७९.६१ ९०.५३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural University Vacancy: कृषी विद्यापीठांत ५७ टक्के जागा रिक्त

PM Suryaghar Yojana: ‘सूर्यघर’चा साडेपंधरा हजार ग्राहकांनी घेतला लाभ

Drip Irrigation Subsidy: ठिबक अनुदानाचे २० हजार अर्ज गायब

Rural Development: शेतकऱ्यांची स्थिती सुधारली तरच भारत प्रगत होईल

Onion Storage Facility: कांदा-लसूण साठवणूक गृहासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

SCROLL FOR NEXT