वाढत्या तापमानामुळे शरीराचे तापमान वाढते, चारा खाण्याचे प्रमाण कमी होऊन, पाणी पिण्याचे प्रमाण वाढते. दूध उत्पादनात घट दिसून येते.
जनावरांची प्रजननक्रिया इतर सर्व शरीरक्रियांवर अवलंबून असते. उन्हाळ्यात जगण्यासाठी आवश्यक त्याच शरीरक्रियांचाच जनावरांना ताण असतो. त्यामुळे प्रजननाची क्रिया मंदावते.
उन्हाळ्यात गाभण जनावरांची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण जन्माला येणाऱ्या वासराची प्रजननक्षमता ही त्याची गर्भाशयातील पोषणावर अवलंबून असते.
जनावरांना दिवसभरात लागणारा चारा एकाचवेळी न देता, विभागणी करून तीन ते चार वेळा द्यावा. चाऱ्याची नासाडी टाळण्यासाठी त्याची बारीक कुट्टी करावी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.